Bucculatrix thurberiella
किडा
सर्वाधिक नुकसान झाडाच्या वरील तृतियांश भागात होते. सगळ्यात लहान सुरवंट पानांना आतुन पोकळ करतात, ज्यामुळे पांढरे किंवा राखाडी लहान लहान सर्पाकृती बोगदे तयार होतात. जसे सुरवंट मोठे होतात तसे ते ह्या बोगद्यातुन बाहेर पडून पानाच्या पृष्ठभागावर रहातात आणि त्यांना वरच्या किंवा खालच्या बाजुने खातात. यामुळे हलक्या तपकिरी रंगाची खिडक्यासारखी छिद्रे तयार होतात, तो भाग काही वेळा वाळतो आणि गळुन पडतो व तिथे एक आकारहीन छिद्र रहाते. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पानगळीमुळे बोंडे अकालीच उघडतात किंवा पाते आणि बारीक बोंडे गळुन पडतात.
भक्षक जसे कि ओरियसच्या काही प्रजातींची पिल्ले, क्रिसोपाच्या अळ्या आणि कोलॉप्स आणि हिप्पोडामियाचे प्रौढ हे शेतात पाने पोखरणाऱ्या अळ्यांना खाताना आढळले आहेत. प्रयोगशाळेत, इतर भक्षक जसे कि जिनेरा जिओकॉरिस, सिनिया आणि झिलसचे प्रौढ आणि जिनस नोबिसचे प्रौढ आणि पिल्ला या अळ्यांना खाताना आढऴले आहेत. या फायदेशीर किड्यांची संख्या राखण्यासाठी कीटकनाशकांचा वापर मर्यादित करणे महत्वाचे आहे. स्पिनोसॅड सेंद्रीय पद्धतीने वाढविलेल्या कपाशीवरसुद्धा वापरले जाऊ शकते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पुष्कळशी कीटनाशकांची मिश्रणे कपाशीवरील पाने पोखरणार्या अळी विरुद्ध वापरली जाऊ शकतात आणि उपचार हे अळ्यांच्या पुढच्या टप्प्यावर केंद्रित करुन केले गेले पाहिजेत कारण पहिल्या टप्प्यातील अळ्या पानांच्या आत सुरक्षित असतात. मॅलेथियॉन, डायमिथोएट आणि विविध घटकांचे मिश्रण असे काही सक्रिय घटक आहेत.
ब्युक्युलाट्रिक्स थुर्बेरिएला नावाच्या कपाशीवरील पाने पोखरणाऱ्या अळ्यांमुळे ही लक्षणे दिसतात. पतंगांचे पंख ७-९ मि.मी. लांबीचे असतात. पुढचे पंख पांढरे, पण कडांकडुन ते मध्याच्या थोडे पुढपर्यंत काळसर असतात. पाठचे पंख फिकट पांढरे असतात. अळ्या आणि त्यांच्यासारखे इतर नातेवाईक उदा. थुर्बेरिया थेस्पेसिऑइडस किडे कपाशीच्या पानांवर उपद्रव करतात. पहिल्या टप्प्यातील अळ्या ह्या चपट्या व पिवळ्या ते नारंगी रंगाच्या असतात व पानांना पोखरून वरील आणि खालील थरांच्या मध्ये बोगदे तयार करतात. प्रौढ अळ्या बाहेर येऊन पानांचा वरील किंवा खालील पृष्ठभाग खातात. जेव्हा ह्या टप्प्यावरील खाण्याचे काम संपते तेव्हा पानाच्या खालच्या बाजुच्या कोणत्याही खोलगट भागात अळ्या स्वत:भोवती लहानसा रेशमी कोश विणतात. गंभीर प्रदुर्भावात, पानांचे फक्त सांगाडे उरतात आणि पानगळही होते.