Colaspis hypochlora
किडा
प्रौढ भुंगे विविध तणांना तसेच केळीच्या कोवळ्या न उमललेल्या पान, फांद्या आणि मुळांना खातात. ते कोवळी फळे देखील खातात आणि सालीवर व्रण तसेच ठिपके निर्माण करतात ज्यामुळे ती विकृत आकाराची होतात आणि विक्रीयोग्य रहात नाहीत. फळाच्या बुडाजवळच सर्वात जास्त व्रण दिसतात, त्यावरुन असे लक्षात येते कि भुंगे खाण्यासाठी सर्वात चांगली निवार्याची (उदा. पुष्पकोषांखाली) जागा शोधतात. व्रण बहुधा आकाराने अंडाकृती असतात आणि फळांवर व्रण करणार्या मेलिपोना अॅमाल्थे नावाच्या मधमाशांशी गल्लत होऊ शकते. संधीसाधु जंतुंनी पेशींमध्ये घर केल्याने जास्तच नुकसान होते. अळ्या कोवळ्या मुळांवर उपद्रव करतात आणि जुन्या मुळांमध्ये बोगदे करुन आतील भाग फस्त करतात. पावसाळ्यात यांचा उपद्रव सर्वात जास्त असतो.
आजपर्यंत तरी या उपद्रवावर कोणतेही जैविक उपचार उपलब्ध नाहीत. यांचे संक्रमण थांबविण्यासाठी उत्कृष्ट प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे चोखपणे तण नियंत्रण योजना करणे आहे.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रसायनिक नियंत्रणाची बहुधा शिफारस केली जात नाही कारण चोखपणे तण नियंत्रण वगैरे केल्यास यांची संख्या इतकी कमी होते की कीटकनाशकांची गरज लागत नाही. उपद्रवाच्या तीव्रतेनुसार आलटुनपालटुन कीटकनाशके फवारा. तरीपण, जोपर्यंत भुंगे गंभीर आर्थिक नुकसान करत नाहीत तो पर्यंत कीटकनाशकांचा वापर टाळला पाहिजे.
कोलॅस्पिस हायपोक्लोरा नावाच्या केळीच्या फळांना ओरबाडणार्या भुंग्यामुळे नुकसान होते. प्रौढांचे पुढचे पंख तपकिरी असुन त्यावर विशेष छोट्या बारीक ठिपक्यांच्या ओळी असतात. ते चांगले उडु शकतात. माद्या फिकट लिंबासारख्या पिवळ्या रंगाची अंडी एकेकटी किंवा ५ ते ४५ सारख्या विविध संखेच्या पुंजक्याने घालतात. शेंड्याजवळच्या पर्णकोषात चावुन केलेल्या पोकळीत किंवा जमिनीत मूळ थोडे बाहेर येऊन झालेल्या खड्ड्यात अंडी घातली जातात. ७ ते ९ दिवसांनी, ऊबलेल्या अळ्या कोवळ्या मुळांना खायला सुरवात करतात किंवा जुन्या मुळांत बोगदे करुन आतील मऊ भाग खातात. त्यांचे शरीर पांढरे, सडपातळ आणि केसाळ असते आणि डोके काहीसा पिवळसर रंगाचा असतो. कोष मातकट पिवळ्या रंगाचे असतात आणि जसजसे आतील प्रौढ वयात येतात तसतसे कोषाचा रंग गडद होत जातो.