इतर

पारदर्शक खवले किडे

Aspidiotus destructor

किडा

थोडक्यात

  • किडे पाने, खोड आणि फळातुन रसशोषण करतात ज्यामुळे पिवळेपणा येतो आणि भाग विकृत आकाराचे होतात.
  • जास्त संक्रमण झाल्यास, पाने किंवा फळे पूर्णपणे पिवळी ते तपकिरी पडुन गळु शकतात.
  • संपूर्ण झाड खुजे होते किंवा वाळते.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

किडे पानांमधुन रसशोषणकरतात ज्यामुळे पिवळेपणा येतो आणि भाग विकृत आकाराचे होतात. पानांच्या खालील भाग मुख्यतः जास्त प्रभावित होतात पण फांद्या, फुलांचे गुच्छ आणि कोवळी फळे देखील प्रभावित होऊ शकतात. जास्त संक्रमण झाल्यास, पूर्ण पाने पिवळी ते तपकिरी होऊन गळतात. संक्रमणाचे वैशिष्ट्य म्हणजे तळलेल्या छोट्या अंड्यांसारख्या दाट वस्त्या दिसतात. प्रभावित झाडाचे ठळक पिवळे भाग दूरवरुन देखील स्पष्ट दिसतात. फळे रंगहीन होऊन अकाली गळु शकतात. संपूर्ण झाड खुजे होते व काही वेळा वाळते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

४७ आणि ४९ डिग्री सेल्शियस गरम पाण्याचे उपचार १५ आणि १० मिनीटे केल्यास झाडांवरुन खवल्यांना पळविण्यात मदत होते. र्हिडझोबियस लोफान्थे, चिलोकोरस निग्रिटस, टेल्सिमिया निटिडा, स्युडोस्किम्नस अॅनोमालस आणि क्रिप्टोगँथा नोडिसेप्ससारखे लेडीबर्ड बीटल्स, नारळावरील खवल्यांचे भक्षक आहेत. अॅफिटिस मेलिनस, अॅफिटिस लिनग्नानेनसिस आणि कॉम्पेरिएला बिफास्कियाटासारखे परजीवी वॅस्पस बागेत सोडल्यानेही यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविता येते. हे नैसर्गिक शत्रु उपस्थित नसल्यास या किडींच्या उपद्रवाची मोठी साथ येते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रांगणार्‍या पिल्लांचा जीवन टप्पा हा कीटकनाशकांस संवेदनशील असतो. जसजसे त्यांचे मेणचट आवरण विकसित होते तसतसे ते कीटनाशकांस कमी संवेदनक्षम होतात.. पायरिप्रोक्झिफेन आणि थियामेथोक्झॅमच्या उपचारांची शिफारस करण्यात येते. संक्रमण खूप जास्त असल्यास १५-२० दिवसांच्या अंतराने बर्‍याच फवारण्या करण्याची गरज भासु शकते.

कशामुळे झाले

अॅस्पिडियोटस डेसट्रकटर नावाच्या नारळावरील खवले किड्यांमुळे नुकसान होते. नारळाव्यतिरिक्त उष्णकटिबंधातील इतर आर्थिक महत्वाच्या पिकांवर जसे कि आंबा, पाम, पपई, फायकस, अॅव्हाकॅडो आणि लिंबांवर देखील हल्ला करतात. इतर कवचधारी खवल्यांप्रमाणेच हे सुद्धा पानांच्या खालच्या बाजुला वस्ती करुन रहातात आणि त्या वस्त्यांवर मेणचट आवरण असल्याने तळलेल्या लहान अंड्यांसारख्या दिसतात. पानातील रससोषण करताना ते पानात विषारी लाळ सोडतात ज्यामुळे पानांचे भाग विकृत होतात. माद्या त्यांच्या शरीराच्या आजुबाजुला पांढरी अंडी घालतात व गंभीर संक्रमणात संपूर्ण पान व्यापले जाऊ शकतात. पहिल्या टप्प्यातील पिल्लांना पाय असतात ज्यामुळे ती काही अंतरावर (१मी. पर्यंत) जाऊ शकतात. ही रांगणारी पिल्ले वारा, उडणारे किडे आणि पक्षांद्वारे तसेच संक्रमित झाडांची सामग्रीच्या वहनातुनही मोठ्या अंतरावर पसरु शकतात. या किडींचे जीवनचक्र खास करुन फक्त ३२-३४ दिवसांचे असते.


प्रतिबंधक उपाय

  • नत्र जास्त असलेली खते टाळा कारण चांगले पोषण मिळणारी झाडे किड्यांना आवडतात.
  • झाडाची जास्त दाटी टाळण्यासाठी छाटणी करा.
  • रोपवाटिकेत संक्रमित पाने, फांद्या आणि इतर भाग नष्ट केल्यास खवले किड्यांचे नियंत्रण करण्यात मदत मिळते.
  • बागांमध्ये स्वच्छतेची पातळी उच्च ठेवा.
  • भेंडी आणि थुत्तुर भेंडीची पिके आजुबाजुला लावु नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा