आंबा

काजुवरील नागअळी

Acrocercops syngramma

किडा

थोडक्यात

  • आंब्याच्या पानांचे पृष्ठभाग आणि कोवळे कोंब पोखरले जातात.
  • ताज्या पानांवर भाजल्यासारखी चिन्हे दिसतात.
  • पानांवर राखाडीसर पांढरे फोडासारखे डाग दिसतात जे नंतर मोठ्या छिद्रात बदलतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

आंबा

लक्षणे

कोवळ्या पानांना अळ्यांनी पोखरलेले दिसणे हे हल्ल्याचे सुरवातीचे लक्षण आहे. अळ्या पानाचे पृष्ठभाग सोडुन आतील सर्व भाग खातात. पानावर जिथे अनेक खाल्लेल्या जागा एकमेकात मिसळतात तिथे पांढुरट, फोडासारखे डाग पानांच्या पृष्ठभागावर दिसतात. जुन्या आणि पक्व पानांवर मोठ्या छिद्रांच्या रुपात नुकसान दिसते. ह्यामुळे पाने वाळतात आणि पोखरलेल्या जागा चुरगळतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

डिग्लिफस इसे सारख्या परजीवी भुंग्यांचा वापर करावा जे नागअळीच्या अळ्यांवर परजीवीपणा करुन कोषात जाण्यापूर्वीच त्यांना मारतात. झाडांचे स्वास्थ्य राखण्यासाठी सेंद्रीय खते वापरा. फ्लोटिंग ओळींवरील आच्छादन वापरुन प्रौढ किड्यांना अंडी घालण्यापासुन प्रतिबंधित करा. पिवळे किंवा निळे चिकट सापळे लावून अंडी घालणार्‍या प्रौढांना पकडता येते. संक्रमित झाडांखालील जमीन प्लास्टिक आच्छादनाने झाका जेणेकरुन अळ्या जमिनीवर पडुन कोषात जाऊ शकणार नाहीत. नीम तेल आणि सायपेरमेथ्रिनची कडक फवारणी केल्याने देखील किडींची वाढ आणि विकास व्यवस्थित होत नाही.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मोनोक्रोफॉस ३६ डब्ल्युएससी ०.०५% (०.५ मि.ली. प्रति ली. याप्रमाणे) फवारणी करा. जलदगतीने काम करणारी बोटॅनिकल कीटकनाशके शेवटचे अस्त्र म्हणुनच वापरावीत.

कशामुळे झाले

नागअळीच्या अळ्यांमुळे नुकसान होते. कोवळ्या पानांवर रुपेरी राखाडी प्रौढ पतंगाद्वारे अंडी घातली जातात. वयात येण्यापूर्वी अळ्या बहुधा निस्तेज पांढर्‍या रंगाच्या असतात आणि नंतर गुलाबीसर किंवा लालसर तपकिरी रंगाच्या होतात. कोषात जाण्यासाठी अळ्या जमिनीवर पडतात आणि ७-९ दिवसांनी प्रौढ म्हणुन बाहेर येतात. एकुण जीवनचक्र २०-४० दिवसांचे असते. नुकसानामुळे झाडांची प्रकाशसंश्र्लेषण क्षमता कमी होते ज्यामुळे पाने वाळुन गळतात आणि उत्पादनात खूप मोठी घट होते.


प्रतिबंधक उपाय

  • हंगामाच्या सुरवातीपासुनच पानांचे निरीक्षण करीत चला म्हणजे लवकर उपाय करता येतील.
  • छोट्या बागेतुन गंभीर संक्रमित पाने काढुन नष्ट करा.
  • झाडाच्या नुकसानीचा सामना करण्यासाठी योग्य पाणी देऊन झाडांची प्रतिकारशक्ती वाढवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा