द्राक्षे

द्राक्ष वेलींवरील भूंगेरा

Altica ampelophaga

किडा

थोडक्यात

  • प्रौढ पानांत सोंडा खुपसुन खातात ज्यामुळे पुष्कळशी छिद्रे पूर्ण पानास व्यापतात.
  • वसंत ॠतुत जेव्हा प्रौढ द्राक्षाच्या कळ्यांना खातात तेव्हा जास्त गंभीर नुकसान होते.
  • अळ्या पानांना वरवर खातात, ज्यामुळे पानांवर सुकलेले भाग रहातात.

मध्ये देखील मिळू शकते


द्राक्षे

लक्षणे

पानांवर प्रौढांमुळे आणि अळ्यांमुळे दिसणारी लक्षणे वेगवेगळी असतात. प्रौढ पानांत सोंडा खुपसुन खातात ज्यामुळे पानांवे भरपूर छोटी छिद्रे दिसतात. अळ्या पानांना वरवर खातात ज्यामुळे खाल्लेल्या जागेच्या विरुद्ध दिशेचा भाग सुकलेला दिसतो. विश्रांती घेत असलेल्या प्रौढांना अनुकूल हवामान परिस्थिती निर्माण झाल्याने लवकर जागे झालेल्या प्रौढांमुळे खूप जास्त नुकसान होते. जर ते वसंत ऋतुत लवकर सक्रिय झाले तर ते फक्त पानेच खात नाहीत तर द्राक्षाच्या नुकत्याच विकसित झालेल्या कळ्याही खातात. संक्रमण जर जास्त असेल तर पानांचे फक्त सांगाडे उरतात आणि कोवळे फुलांचे गुच्छ नष्ट होतात. जास्त आणि मजबुत पानांची वाणे ह्या हल्ल्याचा सामना चांगला करतात आणि जखमा कमी महत्वाच्या होतात. एकदा का कळ्या पुरेशा मोठ्या झाल्या कि मग हे बीटल्स द्राक्षाला मोठे नुकसान करीत नाहीत.

शिफारशी

जैविक नियंत्रण

झिक्रोना कोएरुले (ब्ल्यू बग) हा द्राक्ष वेलींवरील फ्ली बीटल वाहकांचा मुख्य जैव नियंत्रक आहे. उपद्रवाचे नियंत्रण करण्यासाठी इतर शिकारी आणि पॉलिफेगस परजीवीही वापरले जाऊ शकतात. मित्र सूत्रकृमीही जमिनीत सोडल्यास अळ्यांचा नाश करतात आणि प्रौढांची पुढची पिढी न येण्यात मदत करतात. पहिला प्रौढ पाहिला जाताच स्पिनोसॅड किंवा नीम तेलाची द्रावणे फवार्‍याद्वारे वापरल्यासही लोकसंख्या नियंत्रणात मदत मिळते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. द्राक्षवेलींवरील फ्ली बीटल पहिल्यांदा दिसताक्षणीच त्याविरुद्ध शिफारशीत करण्यात आलेले सक्रिय घटकात आहेत क्लोरपायरीफॉस, लँब्डा सायहॅलोथ्रिन द्रावणे ज्यांचे फवारे मारावेत किंवा ते उधळुन झटकावे.

कशामुळे झाले

अल्टिका अॅम्पेलोफागा नावाच्या द्राक्षवेलीवरील फ्ली बीटलमुळे नुकसान होते. हे चकचकीत धातुसारखे दिसणारे बीटल्स वसंत ऋतुत सक्रिय असतात जेव्हा ते नविन उमलणार्‍या पानांवर आणि कोवळ्या कळ्यांवर हल्ला करतात. विविध टप्प्यांचा विकास काळ हा बहुतकरुन पर्यावरण घटकांवर अवलंबुन असतो. माद्या पुंजक्याने अंडी पानांच्या खालच्या बाजुला घालतात, त्यांची जीवनभराची गणती शेकड्यांनी होते. विशेष म्हणजे अंडी घातल्यानंतर १-२ अठवड्यात ऊबतात. मग सुमारे एक महिनाभर अळ्या पानांवर शिरुन खातात, ह्या काळात त्या तीन विकास टप्प्यातुन जातात. मग त्या जमिनीत सुमारे ५ सें.मी खोलीवर जाऊन कोषात जातात आणि १-३ अठवड्यात पुढच्या पिढीचे प्रौढ बाहेर येतात. प्रतिवर्षी ह्यांच्या सुमारे २ आणि काही वेळा ३ पिढ्याही होऊ शकतात. शेवटच्या पिढीचे प्रौढ गळलेल्या पाल्यापाचोळ्यात किंवा इतर निवार्‍यात विश्रांती घेतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रौढांनी किंवा अळ्यांनी मागे सोडलेल्या लक्षणांसाठी मळ्याचे नियमित निरीक्षण करा.
  • जंगलाजवळ किंवा पडीक जमीनीजवळ द्राक्षाचे मळे करु नका.
  • ओळींमधल्या भागात लागवड करुन फ्ली बीटल्सच्या कोषांच्या संख्येचे नियंत्रण करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा