पिस्ता

पिस्त्यावरील भुंगा

Chaetoptelius vestitus

किडा

थोडक्यात

  • कळ्या आणि फांद्यांवर नुकसान होते ज्यामुळे कोमजणे आणि मर होते.
  • फांद्या आणि खोडात प्रजोत्पादक बोगदे असतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
पिस्ता

पिस्ता

लक्षणे

प्रौढ भुंगे फुटव्यांमधुन खाण्याचे बोगदे पोखरतात आणि फुटवे नष्ट करतात ज्यामुळे फळधारणेवर परिणाम होतो. खोडात किंवा फांद्यांतील बोगद्यांमुळेही रसाभिसरण होत नाही, पाणी आणि अन्नद्रव्य वरील फांद्यांपर्यंत पोचत नाही. प्रौढ गटद तपकिरी, सुमारे २.५-३.५ मि.मी. लांबीचे असतात, पंख गडद असुन त्यावर ताठ केस असतात. अळ्या बहुधा पांढर्‍या असुन डोका तपकिरी असतो. हे संधीसाधू किडे प्रामुख्याने कमकुवत झाडांवरच हल्ला करतात आणि म्हणुनच फांद्या वाळून तुटतात. हिव्याळ्यात, जोपर्यंत तापमान +५ अंशाखाली जात नाही तोपर्यंत सालीतील भुंगे खाणे थांबवितात. योग्य परिस्थितीत, हे पिस्त्याच्या झाडास खूप हानीकारक आहेत.

शिफारशी

जैविक नियंत्रण

सालीतील भुंग्याचे नियंत्रण करण्यासाठी झाडे जोमदार, निरोगी राखणे महत्वाचे आहे आणि आजुबाजुच्या बागांसह सर्वांनी मिळुन प्रतिबंधक उपाय करण्याची खात्री करावी. काही परजीवी वॅस्पस तसेच अनेक भक्षक भुंगे आणि कोळीही ह्या भुंग्याचे भक्षक आहेत. त्यांचा एकुन नियंत्रण प्रभाव हा अंदाचे कीडीच्या लोकसंख्येच्या १०% आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या किडी आत रहात असल्याने साध्या रसायनिक नियंत्रणास, जरी त्यासह खनिज तेले वापरली, जी किड्यांपर्यंत पोचण्यात मदत करतात, तरीही उपयोग होत नाही. म्हणुन ह्यांचा प्रसार टाळण्यासाठी प्रतिबंधक उपायांची आवश्यकता असते. प्रतिबंधक उपायांचा वापर त्या भागातील सर्वांनीच करायला हवा म्हणजे किडे प्रभावित बागातुन निरोगी बागेत जाणार नाहीत. सालीतील भुंगे हे प्रामुख्याने कमकुवत झाडावरच हल्ला करतात म्हणुन हे आवश्यक आहे कि झाड निरोगी (खते, सिंचन, छाटणी, किडी आणि रोग नियंत्रण) राखणे.

कशामुळे झाले

वेटोप्टेलियस व्हेस्टिटस नावाच्या भुंग्यामूळे जे स्कोलिटिडे कुटुंबातील आहेत, नुकसान उद्भवते. एप्रिल-मे मध्ये जेव्हा तापमान २५ अंशावर जाते तेव्हा प्रौढ बाहेर येतात. माद्या उडुन निरोगी झाडांच्या कोवळ्या फांद्यांत शिरतात, तिथुन त्या छोटे बोगदे पोखरुन फुटव्यात किंवा फुलांच्या कळ्यात शिरतात आणि त्यांचा नाश करतात. नंतर त्या कोवळ्या कोंबाना आणि फांद्यांनाही खातात, ते कोंब आणि फांद्या नुकसानामुळे तातडीने वाळतात. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात भुंगे पिस्त्याच्या काटक्यातच विश्रांती घेतात. हिवाळ्याच्या शेवटी माद्या कमकुवत किंवा तुटलेल्या फांद्या शोधतात ज्यात त्या पुनरुत्पादक बोगदे पोखरतात आणि सुमारे ८०-८५ अंडी घालतात.


प्रतिबंधक उपाय

  • ताण टाळण्यासाठी वेळापत्रकाप्रमाणे सिंचन करा, खासकरुन कोरड्या हवामानात.
  • किडींनी लागण केल्याने वाळलेल्या आणि कमकुवत फांद्या छाटुन जाळा.
  • बागेतुन तण आणि वाळलेल्या फांद्या काढुन टाका.
  • छाटणी केलेली लाकडे सालीतील भुंग्याच्या, अळ्यांच्या किंवा त्यांच्या फक्त बोगद्यांच्या उपस्थितीसाठी तपासा.
  • प्रौढांना कमकुवत, वाळलेल्या फांद्यांकडे आकर्षित करण्यासाठी लाकडी सापळे पूर्ण शेतभर पसरुन लावता येतात, नंतर त्यातुन किडे वेचुन जाळुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा