Pectinophora gossypiella
किडा
गुलाबी बोंडअळीमुळे कळ्या उमलत नाहीत, बोंड गळतात, कापुस खराब होतो आणि बियाणे मिळत नाहीत. उन्हाळ्याच्या सुरवातीला अळ्यांची पहिली पिढी पात्यांमध्ये उपद्रव करते जी वाढते आणि फुलते. प्रदुर्भावित फुलांच्या पाकळ्या अळ्यांच्या रेशमी धाग्यांनी एकत्र बांधलेल्या असतात. दुसरी पिढी बोंड आणि कापसामध्ये शिरून बीपर्यंत पोहचून त्यांना खाते. कापुस तुटतो आणि डागाळतो, ज्यामुळे प्रत चांगलीच खालवते. बोंडावरही खराबी दिसुन येते जसे कि बोंडाच्या आतल्या भिंतीला चामखीळ येतात. याव्यतिरिक्त, बोंडअळी प्रमाणे ही अळी बोंडाला पोकळ करत नाहीत व विष्ठा सुद्धा बाहेर सोडत नाहीत. बोंडकुज बुरशी सारखे संधिसाधू जीवजंतू, अळ्यांनी तयार केलेल्या आत आणि बाहेर जाण्याच्या मार्गांचा उपयोग करुन संक्रमण करू शकतात.
पेक्टिनोफोरा गॉसिपिएलामधुन काढलेल्या कामगंध अर्काला संसर्गित शेतात फवारले जाऊ शकते. ह्याने नर किड्यांची मादी शोधुन संभोग करण्याची क्षमता दुर्बल होते. स्पिनोसॅड किंवा बॅसिलस थुरिंजिएनसिस चे मिश्रणही जर वेळेत फवारले तरी परिणामकारक ठरते. पेरणीनंतर ४५ दिवसांनी किंवा फुलोर्याच्या टप्प्यावर कामगंध सापळे ( ८ प्रति एकर) लावुन शेवटच्या काढणीपर्यंत राहू द्यावे. सापळ्यातील आमिष दर २१ दिवसांनी बदलावे.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जर उपलब्ध असली तर जैविक उपचार पद्धतीही वापरा. कीटनाशक मिश्रणांचे पानांवरील फवारे, ज्यात क्लोरपायरिफॉस, एसफेनवॅलरेट किंवा इनडॉक्साकार्ब आहेत त्यांची फवारणी करून गुलाबी बोंडअळीच्या पाकोळींना मारता येते. इतर सक्रिय तत्वात येते गॅमा आणि लांब्डा-सायहॅलोथ्रीन आणि बायफेनथ्रीन. अळीच्या विरूद्ध कुठल्याही उपचारांची शिफारस केली जात नाही कारण ते सामान्यतः झाडांच्या ऊतींमध्ये आढळतात. पेरणीनंतर ४५ दिवसांनी किंवा फुलोर्याच्या टप्प्यावर कामगंध सापळे लावले जाऊ शकतात आणि काढणीपर्यंत राहू द्यावेत.
कपाशीच्या पाते व बोंडाला होणारे नुकसान पेक्टिनोफोरा गॉसिपिएला या गुलाबी बोंडअळीमुळे होते. प्रौढ रंग आणि आकाराने वेगवेगळे असतात परंतु सहसा ते चिखली राखाडी ते राखाडी तपकिरी असतात. ते लांबुळके, सडपातळ व तपकिरीसर शरीराचे असून त्यांचे पंख अंडाकृती व त्यांच्या कडा चांगल्याच झालरवाल्या असतात. माद्या एक-एकेटी अंडी पात्यांमध्ये किंवा हिरव्या बोंडाच्या खालच्या वर्तुळकार पानाखाली घालतात. अंडी साधारणपणे ४-५ दिवसात उबतात आणि पात्यात किंवा बोंडात खूप लवकर आत शिरतात. बारीक अळ्यांना गडद तपकिरी डोके आणि पांढरे शरीर असते व त्यांच्या पाठीवर मोठे गुलाबी पट्टे असतात. जसे त्यांचे वय वाढते, त्या हळुहळु गुलाबीसर होतात. जेव्हा बोंडे उघडतात तेव्हा बोंडाच्या आत त्यांना खाताना पाहता येते. अळ्या १० ते १४ दिवस उपद्रव करून जमिनीत कोषावस्थेत जातात. गुलाबी बोंडअळीच्या वाढीस मध्यम ते उच्च तापमान चांगले असते. तथापि, जेव्हा तापमान ३७.५ डिग्री सेंटिग्रेडच्यावर जाते तेव्हा मृत्युदर वाढीस लागतो.