लिंबूवर्गीय

पार्लाटोरिया काळे खवले किड

Parlatoria ziziphi

किडा

थोडक्यात

  • बारीक काळे खवले किड पान, फळ आणि कोंबांना आच्छादतात.
  • पान आणि फळांवर पिवळी छटा आणि ठिपके दिसतात.
  • गंभीर प्रदुर्भावात पानगळ होते.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

पी. झिझिफीच्या संक्रमणाचे वैशिष्ट्य आहे बारीक काळे किडे कोंब, पाने आणि फळे खाताना दिसतात. जास्त संक्रमण झाले असता, उपआयताकृती न काढता येणारे काळे खवले आणि त्यांची रांगणारी पांढरी पिल्ले फळे, पाने आणि कोंबांना पूर्णपणे आच्छादतात. उपद्रवामुळे झाडातील रसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जोम कमी होतो आणि खाल्ल्या जागी पिवळे ठिपके किंवा रेषा विकसित होतात. प्रादुर्भावामुळे फांदी मर होते आणि फळे विकसित होण्यात गंभीर बाधा येते, तसेच फळे आली तरी विकृत असतात. यामुळे झाडांना अकाली वृद्धत्व येते आणि पाने तसेच फळे देखील अकाली गळतात आणि फळांची प्रत आणि संख्याही खालवते. ही प्रजाती लिंबुवर्गीय पिकांची सर्वात महत्वाची कीड बनली आहे.

शिफारशी

जैविक नियंत्रण

स्कुटेलिस्टा केरुले, डायव्हरसिनेरव्हस एलेगान्स आणि मेटाफिकस हेलव्होलससारखे काही परजीवी वॅस्पस तसेच जिनेरा अॅस्पिडियोटिफॅगस आणि अॅफिटिसच्या काही प्रजातीसुद्धा पी. झिझिफीचे नियंत्रण करण्यात मदत करु शकतात. लेडीबर्डस (चिलोकोरस भायप्युस्टुलॅटस किंवा सी. निग्रिटा, लिन्डोरस लोफानथे आणि ऑर्कस चालिबियस)सारखे काही भक्षक योग्य काळात काळ्या खवल्यांचा नाश करु शकतात. पांढर्‍या तेलातील द्रावणे (उदा. ४ भाग वनस्पती तेल आणि १ भाग भांडी धुण्याचा साबण) काळ्या खवल्यांची संख्या कमी असल्यास वापरले तर पर्यावरणातील इतर महत्वाच्या किड्यांना त्रास न होता परिणामकारक ठरतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. फुलोर्‍यानंतर आणि उन्हाळ्याच्या फवारणीआधी या मधल्या काळात जेव्हा रांगणारी पहिली पिढी बाहेर येते तेव्हाच काळ्या खवल्यांवर उपचार करायला हवेत. क्लोरपायरीफॉस,कार्बारिल, मॅलेथियॉन किंवा डायमेथोएट असणार्‍या तेलांच्या फवारणीची शिफारस करण्यात येते, पण हे उपचार फार काळजीपूर्वक केले गेले पाहिजेत कारण हे भक्षक किडींवर देखील प्रभावी असतात.

कशामुळे झाले

पॅर्लाटोरिया झिझिफी नावाच्या खवल्यांमुळे ही लक्षणे उद्भवतात, ज्याचे मुख्य यजमान लिंबुवर्गीय पिके आहेत. जरी पानांवर त्यांना रहाणे आवडत असले तरी ते फळ आणि फांद्यावर देखील रहातात आणि उपद्रव करतात. साधारणत: वर्षातुन त्यांच्या दोन ते सात पिढ्या विविध काळात होतात त्यामुळे पूर्ण वर्षभर त्यांच्या सर्व जीवनटप्प्यांना झाडांवर पाहता येते. ही पिढ्यांची संख्या लिंबूवर्गीय पिके वाढणाऱ्या भागावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. सिसिली या देशामध्ये अनुकूल हवामानात एक जीवनचक्र पूर्ण होण्यास सुमारे ३०-४० दिवस लागतात तर ट्युनिशियामधील सापेक्ष ऊबदार हवामानात ७०-८० दिवस लागतात आणि थंड हवामान असल्यास १६० दिवसांपर्यंतही लागु शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • खवल्यांच्या संक्रमणांच्या लक्षणांसाठी झाडाचे नियमित निरीक्षण करा.
  • संक्रमण कमी असल्यास किड्यांना चिरडुन मारणे किंवा झाडाचे भाग हाताने काढुन टाकणे परिणामकारक असते.
  • झाडाचे संक्रमित भाग काढुन जाळा किंवा बागेपासुन दूर अंतरावर खोल पुरा.
  • झाडांच्या दरम्यान पूल प्रतिबंध करण्यासाठी आणि झाडीत हवा चांगली खेळती रहाण्यासाठी पर्याप्तपणे छाटणी करा.
  • संभावित संक्रमित सामग्रीचे वहन टाळा.
  • नैसर्गिक स्थानीय शत्रुंना जोपासण्यासाठी विस्तृत श्रेणी कीटकनाशकांचा वापर टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा