इतर

लिंबूवर्गीय पिकावरील काळा मावा

Toxoptera aurantii

किडा

थोडक्यात

  • फांद्या आणि फुले विद्रुप होतात.
  • पाने पिवळी पडुन मरगळतात.
  • मधाळ रसामुळे काळसर बुरशी वाढते.
  • फळांची प्रत खालावते.
  • पंखासह किंवा पंखाविना असलेले तपकिरी ते काळे मावे.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

लिंबुवर्गीय झाडाच्या वाढीच्या कोणत्याही काळात हा उपद्रव होऊ शकतो. रसशोषणासाठी माव्याची लांब सोंड असते जी वापरुन ते कोंबाच्या टोकातुन आणि नविन पालवीतुन रस शोषतात, ज्यामुळे फांद्या, फुलांचा आकार विकृत होतो, पाने मुडपतात, गोळा होतात किंवा दुमडतात. ते झाडाचा गोड रस शोषत असल्याने जास्त साखर मधाळ रसाच्या रुपाने बाहेर टाकतात. जेव्हा हा मधाळ रस पानांवर पडतो तेव्हा त्याच्यासाठी काळसर बुरशी टपुनच राहिलेली असते आणि त्यामुळे पाने काळी पडतात. हे प्रकाश संश्र्लेषण क्रिया मर्यादित करते आणि झाडाचा जोम आणि फळांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. लिंबुवर्गीय झाडांना नुकसान ट्रीस्टेझा विषाणूंमुळे देखील होऊ शकते ज्यांचे वहन हे मावे करतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

भक्षकांमध्ये हॉवरफ्लाइज, लेसविंग्ज आणि लेडीबर्डच्या बर्‍याचशा प्रजाती येतात ज्या माव्यावर त्यांच्या विकासाच्या सर्व टप्प्यांवर हल्ला करतात. दोन कॉसिनेलिडस आहेत सायक्लोनेडा सानगिनिया आणि हिप्पोडामिया कॉनव्हर्जनसचे प्रौढ आणि अळ्या या कीटकांविरुद्ध सामान्यत: वापरले जातात. काही परजीवी वॅस्पच्या खास प्रजातीसुद्धा लिंबुवर्गीय पिकांसाठी प्रयत्न करण्यास उपलब्ध असु शकतात. दमट वातावरणात नियोझायगाइटस फ्रेसेन्सी बुरशी माव्याच्या संख्येवर आळा घालतात. मुंग्यांना उकळत्या पाण्याने किंवा नैसर्गिक पायरेथ्रिनच्या द्रावणाने मारले जाऊ शकते. कीटकनाशक द्रावण उदा. साबण, डिटरजंट साबण, नीम किंवा मिरचीच्या अर्काचे द्रावण देखील माव्यांसाठी वापरले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. माव्याच्या नियंत्रणासाठी विविध कीटकनाशके वापरली जाऊ शकतात पण त्यांचा परिणाम चांगला होण्यासाठी योग्य वेळी उदा. पाने गुंडाळण्याआधी किंवा संख्या खूप जास्त होण्याआधी वापर करायला हवा. व्यावसायिक उत्पाद ज्यात पेट्रोलियम तेल आहे त्यांची फवारणी पानांच्या खालच्या बाजुला केली जाऊ शकते ज्यामुळे ते थेट माव्याच्या संपर्कात येईल. सिंथेटिक पायरेथ्रॉइडससुद्धा मावा, मुंग्यांविरुद्ध परिणामकारक आहेत पण त्यांच्या नैसर्गिक शत्रुंवर देखील विपरित परिणाम होतो.

कशामुळे झाले

लिंबूवर्गीय पिकावरील काळा मावा टोक्झोप्टेरा औरान्टीच्या पिल्ले आणि प्रौढांमुळे लक्षणे दिसतात. ते बहुधा लिंबूवर्गीय व इतर पिकांना माव्याच्या टोक्झोप्टेरा सिट्रिसिडा या प्रजातीबरोबर उपद्रव करतात ज्याला सामान्यत: ब्राऊन सिट्रस अॅफिड म्हणुन ओळखले जाते. प्रौढ पंखाचे व पंखविरहित असे दोन प्रकारचे असतात. पंखाची प्रजाती ३० कि.मी. च्या अंतरापर्यंत उडु शकते आणि तेव्हाच सापडतात जेव्हा त्यांची संख्या खूप वाढलेली असते किंवा खायला कमी असते. त्यांचे शरीर निस्तेज तपकिरी ते काळ्या रंगाचे असते आणि लांबी सुमारे १.५ मि.मी ची असते. कळ्या माव्याचे जीवन चक्र फार साधे असते अणि त्यांचा प्रजोत्पादन दर खूप उच्च असतो ज्यामुळे प्रादुर्भाव झटकन पसरतो आणि गंभीर रुप धारण करतो. माव्याचा विकास, जगण्याचे आणि पुनरुत्पादनाचे तपमान ९.४ आणि ३०.४ अंश सेल्शियसच्या दरम्यान असते. मधाळ रसाने मुंग्या आकर्षित होतात ज्या माव्याला नैसर्गिक शत्रुंपासुन संरक्षण देतात. काळ्या माव्याला ट्रीस्टेझा विषाणू रोग आणि झुकिनी पिवळे मोजाईक विषाणू रोगाचे वाहक मानले जाते.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासुन धरलेली किंवा प्रमाणित स्रोतांकडील बियाणे वापरा.
  • शक्य असल्यास, या किडीपासुन मुक्त क्षेत्रामध्ये, आणि भौगोलिकदृष्ट्या वेगळ्या ठिकाणी लागवड करा.
  • रोगाच्या किंवा उपद्रवाच्या घटनांची गंभीरता ठरविण्यासाठी आणि मूल्यांकन करण्यासाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • झाडांवरुन माव्यांना हाताने उचलुन काढा किंवा संक्रमित रोपांचे भाग खुडा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण तपासा.
  • जास्त पाणी किंवा खते देऊ नका.
  • माव्यांना संरक्षण देणार्‍या मुंग्याची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी चिकट पट्ट्या किंवा जाळी वापरा.
  • लिंबुवर्गीय झाडांच्या सामग्रीचे एका बागेतून दुसऱ्या बागेत परिवहन करणे टाळा.
  • कीटनाशकांचा वापर नियंत्रित ठेवा जेणेकरून मित्रकिडींच्या संख्येवर विपरित परिणाम होणार नाही.
  • झाडीत हवा खेळण्यासाठी फांद्या छाटा किंवा खालची पाने काढा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा