लिंबूवर्गीय

लिंबुवर्गीय पिकांवरील हिरवा मावा

Aphis spiraecola

किडा

थोडक्यात

  • गंभीर, वैशिष्ट्यपूर्ण आतल्याबाजुने वळलेली नवीन पाने आणि फांद्या विकृत होतात.
  • मोठ्या प्रमाणात प्रमाणात मधाळ रस, जो खालच्या पानांवर देखील पडतो आणि त्यात काजळी बुरशी घर करते.
  • कोवळी झाडे खासकरुन या उपद्रवाला संवेदनशील असतात आणि त्यामुळे त्यांची वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते

6 पिके
सफरचंद
गाजर
लिंबूवर्गीय
लेट्यूस
अधिक

लिंबूवर्गीय

लक्षणे

गंभीर, वैशिष्ट्यपूर्ण आतल्याबाजुने वळलेली नवीन पाने आणि फांद्या विकृत होणे यासारखी वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसतात. प्रभावित फुले आणि कोवळी फळे अकाली गळतात, खासकरुन जर फळांची साल पातळ असेल तर या नुकसानाला ती जास्त संवेदनशील असतात. याव्यतिरिक्त, कीड मुबलक प्रमाणात मधाळ रस उत्पन्न करते, जो खाली असलेल्या पानांवर गळतो. या मधाळ रसातील गोड सामग्रीमुळे काळी काजळी बुरशी सहजपणे घर करते. मुंग्यासुद्धा मधाळ रसाला खातात आणि त्या बदल्यात माव्यांचे संरक्षण करतात. माव्याच्या सततच्या उपद्रवामुळे आणि पानांवरील काळ्या काजळी बुरसीमुळे प्रकाश संश्र्लेषण क्रियेचा दर कमी झाल्यामुळे झाड कमकुवत होते. कोवळी झाडे खासकरुन या उपद्रवाला संवेदनशील असतात ज्यामुळे त्यांची वाढ खुंटते. जितक्या लवकर यजमान पिकांवर हल्ला होतो, लक्षणे तितकी जास्त गंभीर असतात. फळांची प्रत देखील प्रभावित होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

माशांच्या बरेच प्रजाती, लेसविंग्ज, लेडीबर्डस आणि हॉवरफ्लाइज स्पिरे अॅफिडच्या भक्षकात येतात. अॅफिडिडे कुटुंबातील काही परजीवी वॅस्पस देखील या माव्यावर हल्ला करतात पण क्वचितच त्यांचे जीवनचक्र अळीच्या टप्प्याच्या पुढे सरकते ज्यामुळे त्यांवर भरवसा ठेवता येत नाही. बर्‍याचशा जंतुजन्य बुरशी देखील माव्याला संक्रमित करतात पण कोणाचाही उपयोग अजुनपर्यंत तरी उपद्रवाचे नुकसान कमी करण्यासाठी केला गेला नाही.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कोवळी रोपे या उपद्रवाला जास्त संवेदनशील असल्याने नुकसान कमी करण्यासाठीचे उपचार त्याच्याशी सीमित असतात. उच्च तापमान आणि कमी आर्द्रता असताना फवारणी करणे टाळा. कार्बामेटस, काही ऑर्गॅनोफॉस्फेटस, अॅसेटामिप्रिड, पिरिमिकार्ब आणि इमिडोक्लोरिडचा वापर स्पिरे अॅफिडच्या नियंत्रणासाठी केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

पॉलिफॅगस अॅफिड अॅफिस स्पिरेकोला ज्याला स्पिरे अॅफिड म्हणुनही ओळखले जाते त्या माव्यांच्या उपद्रवामुळे ही लक्षणे उद्भवतात. सफरचंद, लिंबुवर्गीय आणि पपई व्यतिरिक्त, हे इतर महत्वाच्या पिकांमध्ये दुय्यम यजमान म्हणुन देखील उपद्रव करतात. क्राटेगस (हॉथॉर्न) आणि स्पेरे कुटुंबातील बर्‍याच प्रजाती जंगली यजमानात येतात. याचे शरीर पिवळे ते फिकट हिरवे आणि सुमारे २ मि.मी. लांबीची असते. ओटीपोटाच्या खाली तीन काळ्या बाहेर दिसणार्‍या गाठींसारखे भाग असतात. प्रौढ आणि पिल्ले पाने आणि फांद्यांचे अधाशासारखे रससोषण करतात आणि मोठ्या प्रमाणात मधाळ रस तयार करतात. या मधाळ रसात नंतर काजळी बुरशी घर करते. तापमानाचा यांच्या जीवनचक्रावर मोठा परिणाम होतो. उदा. २५ डिग्री सेल्शियसच्या तापमानात यांची एक पिढी ७-१० दिवसात पूर्ण होते तथापी उच्च तापमान आणि कमी सापेक्ष आर्द्रता या उपद्रवाला मानवत नाहीत. माव्याला थंडी देखील बर्‍यापैकी सहन होते, यावरुन सौम्य थंडीनंतर वसंत ऋतुच्या सुरवातीला यांचे अचानक प्रादुर्भाव लिंबुवर्गीय पिकात का होते ते कळते. शेवटी हे ट्रिस्टेझा विषाणू आणि इतर विषाणूंचे वहन विविध यजमानात करतात.


प्रतिबंधक उपाय

  • माव्याच्या लक्षणांसाठी बागेचे नियमित निरीक्षण करा.
  • अडथळे घालुन मुंग्याची हालचाल थांबवा.
  • मधाळ रसाच्या उपस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी जलरोधक कागदासारख्या निरीक्षण प्रक्रियेचा वापर करा.
  • चिकट सापळे वापरुन मुंग्यांना थांबवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा