Etiella zinckenella
किडा
अळ्या हिरवे वाटाणे, पिवळे वाटाणे, फरशी आणि सोयाबीनच्या पेरलेल्या पिकातील शेंगांवर हल्ला करतात. सोयाबीन त्यांचा आवडता यजमान आहे. छोट्या अळ्या नविन फुलांवर आणि कोवळ्या शेंगाना आतुन खातात, ज्यामुळे क्वचित शेंगांची गळ होते. शेंगांना झालेले नुकसान अळ्यांनी दाण्यांच्या आवरणात शिरण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी पाडलेल्या छिद्रांनी समजुन येते. प्रत्येक शेंगेत बहुधा एक किंवा दोन अळ्या सापडतात आणि त्यांच्या जमा झालेल्या विष्ठेमुळे पृष्ठभागावर मऊ तपकिरी सडल्याचे धब्बे दिसतात. दाणे अर्धे किंवा पूर्ण खाल्लेले दिसतात आणि जर फुले आणि शेंगा उपलब्ध नसतील तर अळ्या पानांनाही खातात.
काही मणके असणारे, आर्थ्रोपॉड आणि पक्षी याचे शिकारी आहेत. परजीवी किंवा परजीवांवर गुजराण करणारे ब्रॅकन प्लॅटिनोट, पेरिसिरोला सेल्युलारिस आणि झाट्रोपिस टॉर्ट्रीसिडीस जातीचे वॅस्पस सोनेरी पट्ट्यांच्या एटिएल्ला पतंगांच्या अळ्यांवर हल्ला करतात आणि त्यांच्या लोकसंख्येवर चांगलाच परिणाम करतात. बुरशी आणि जंतुंजन्य रोग वापरुनही ह्या उपद्रवाचा प्रसार नियंत्रणात आणला जाऊ शकतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या पतंगाला शेंगांचा मोठा उपद्रव मानला जात नाही आणि म्हणुन ह्यावर जास्त काम करण्याची गरज नाही. तरीपण काही कीटनाशक द्रावणे पानांवरील फवारे म्हणुन वापरली जाऊ शकतात. मॅलेथियॉन ५ डी (२५ किलो/हे) पेरणीनंतर ४५ दिवसांनी वापरल्यास उपद्रवाचा प्रसार प्रतिबंधित होतो.
जगात सर्वत्र सापडणार्या एटिएल्ला झिकेनेल्ला नावाच्या पतंगांच्या अळ्यांमुळे हे नुकसान होते. प्रौढ पतंग निशाचर असतात आणि त्यांचे शरीर फिकट तपकिरी असुन डोके मोठे असते आणि दोन लांब पुढे आलेल्या मिशा असतात. पुडचे पंख वैशिष्ट्यपूर्ण चकाकीसह राखाडीसर तपकिरी असुन त्यावर पुढच्या किनारीस समांतर पांढरे पट्टे असतात. सोनेरी नारिंगी रंगांचे पट्टे पंखांवर दोन्ही बाजुला दिसतात म्हणुन त्यांचे सर्वसामान्य नाव "सोनेरी पट्ट्यांचा एटिएल्ला पतंग". पाठचे पंख फिकट राखाडी असुन गडद शिवलेल्या झालरीसारखे दिसतात. माद्या त्यांची अंडी फुलात किंवा हिरव्या फळात घालते आणि अळ्या फळांच्या आत रहातात आणि दाणे खातात तसेच एका शेंगेवरुन दुसर्या शेंगेत सहज जातात. त्या फिकट हिरव्या ते हिरव्या रंगाच्या असतात आणि तपकिरीसर झाक असुन डोके नारिंगी रंगाचे असते आणि त्यावर V आकाराचा मुकुटासारखे असुन चार काळे ठिपके असतात. थंडीत अळ्या जमिनीवर पडतात आणि २-५ सें.मी. खोल जाऊन कोषात जातात, नंतर पतंग म्हणुन वसंतात बाहेर येतात.