कॅनोला

रेप बीटल

Brassicogethes aeneus

किडा

थोडक्यात

  • कोबी किंवा कॅनोलाच्या फुलांच्या आसपास चकचकीत काळे बीटल्स दिसतात.
  • कळ्यांमध्ये छिद्रे असतात.
  • गंभीर परिस्थितीत शेंगांशिवाय नुसतेच खोड असते.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
कोबी
कॅनोला

कॅनोला

लक्षणे

यजमान रोपाच्या फुलांच्या आसपास रांगणारे चकचकीत काळे बीटल्स उपस्थित असणे हे हल्ल्याचे फारच स्पष्ट लक्षण आहे. कळ्यांमधील छिद्रे संकेत देतात कि ह्या जागी प्रौढांनी खाल्ले आहे किंवा कळ्यांमध्ये अंडी घातली आहेत. कळ्यांना झालेल्या गंभीर नुकसानामुळे कळ्या गळतात आणि शेंगाविरहित खोड शिल्लक रहातात. फुलांना खाणे हे फक्त पोलन असणार्‍या पुंकेसरांपर्यंतच मर्यादित आहे आणि फारच थोडी लक्षणे दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

बी. एनेयसविरुद्ध बॅसिलस थुरिंगिएनसिसच्या द्रावणांचा वापरही काही सफलतेसह केला गेला आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ब्रॉकोली आणि कॉलिफ्लॉवरच्या रोपांना सापळा पिके म्हणुन, कीटनाशकांचीण बहुधा डेल्टामेथ्रिनची, फवारणी करुन वापरले जाऊ शकते. काही चाचण्यात असे दिसुन आले आहे कि जवळ-जवळ पूर्ण नियंत्रण शक्य होते, पण हे तेव्हाच शक्य होते जेव्हा सापळा पिकाची फुलधारणा ही मुख्य पिकाच्या फुलधारणेपूर्वी होते ज्याची वेळ साधणे कठिण असते. जर रसायनांच्या प्रतिकाराच्या घटना माहितीत नसल्यास बी. एनेयसचे नियंत्रण करण्यासाठी पायरेथ्रॉइड कीटनाशकांचा वापरही केला गेला आहे. तरीही पायरेथ्रॉइड कीटनाशकांचा प्रभाव भक्षक किड्यांवरही पडतो. नियोनिकोटिनॉइडस , इन्डॉक्साकार्ब किंवा पायमेट्रोझाइन चा पायरेथ्रॉइडना पर्याय म्हणुन विचार करा. फुलधारणा सुरु झाल्यानंतर फवारणी करु नका.

कशामुळे झाले

ओसाड आसर्‍याच्या जागी आणि लाकडी भागात विश्रांती घेतल्यानंतर वसंत ऋतुत प्रौढ बाहेर येतात. जेव्हा तापमान १२-१५ अंश सेल्शियस असते तेव्हा ते सक्रियपणे उडतात आणि त्यांचे प्रजनन यजमान सापडेपर्यंत उपलब्ध असलेल्या फुलांतील केसर खात रहातात. किमान ३ मि.मी. लांबीच्या कळ्यांमध्येआंडी घातली जातात. अळ्या फुलांतील केसर खातात, आणि अळी अवस्थेचे दोन टप्पे पूर्ण करण्यास त्यांना ९-१३ दिवस लागतात. पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीवर पडुन स्वत:स मातीत गाडुन घेते. नंतर त्यातुन नविन प्रौढ बाहेर येतात आणि परत त्यांचे विश्रांतीचे स्थान सापडेपर्यंत उपलब्ध असलेल्या फुलांतील केसर खात रहातात. बी. एनेयसचे हवेतुन पिकांवर येणे हे फार गुंतागुंतीेचे आणि अनियमित आहे.


प्रतिबंधक उपाय

  • खोल नांगरणे टाळा ज्यामुळे बी.
  • एनेयसचे भक्षक मारले जातील.
  • कळ्यांमधील छिद्र किंवा बीटल्सच्या उपस्थितीसाठी नियमितपणे रोपांचे निरीक्षण करीत चला.
  • फुलधारणा सुरु झाल्यानंतर कीटनाशके फवारु नका; पोलन बीटल्स कळ्यांपासुन उघडलेल्या फुलांवर स्थलांतरीत होतात, आणि उपद्रवाऐवजी पोलिनेटर बनतात.
  • आमिषाचे सापळे किंवा ऑनलाईनवरील पोलन बीटल्स स्थलांतराचे अंदाज वापरा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा