डाळिंब

डाळिंबावरील खोडकिडे

Cerosterna scabrator

किडा

थोडक्यात

  • अळ्या खोडाच्या आतील भाग खाण्यासाठी सालीत छिद्रेकरतात.
  • प्रौढ किडे कोवळ्या कोंबांच्या हिरव्या साली चावतात.
  • सुक्या भुकटीसारखी विष्ठा रोपाच्या बुडाशी दिसते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

डाळिंब

लक्षणे

अळ्या खोडाच्या आतील भाग खाण्यासाठी सालीत छिद्रे करतात. प्रौढ किडे दिवसा सक्रिय असतात आणि कोवळ्या कोंबांच्या हिरव्या साली चावतात. खोडाच्या सालीतील छिद्रांवर विष्ठा आणि कोरड्या भुकटीसारखी सामग्री रोपाच्या बुडाशी दिसते. कोलोस्टर्ना स्पिनेटर हा डाळिंबाच्या झाडावरील खास उपद्रव नाही. पॉलिफॅगस उपद्रवाचा हा प्रकार फारच थोडे नुकसान करतो. ह्यांचे प्रजोत्पादन मृत लाकडात होते पण जिवंत फांद्यावरही हल्ला करतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

डॅमसेल बग्ज, एल्म लीफ बीटल, काही कोळी, मोठ्या डोळ्यांचा किडा (जियोकोरिस जात), परजीवी टाचिनिड माशा किंवा ब्रॅकोनिड वॅस्पस हे सगळे खोडकिड्याचे नैसर्गिक शत्रु आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. छिद्रात योग्य प्रकारच्या कीटनाशकाचे इंजेक्शन द्या आणि मातीने बुजवा. क्लोरपायरिफॉस (०.०५%) चा वापर फवारणीतुन केला असताही खोडकिड्यांची लोकसंख्या कमी करण्यात मदत होते.

कशामुळे झाले

कोलोस्टर्ना स्पिनेटर आणि झ्युझेरा जातीच्या पुष्कळ प्रजातींच्या अळ्यांमुळे वर्णन केलेली लक्षणे उद्भवतात. प्रौढ बीटल्स सालीला गोल छिद्रात चावुन बाहेर येतात. ते फिकट पिवळसर तपकिरी आणि सुमारे ३० ते ३५ मि.मी. लांबीचे असतात. त्यांचे पंख फिकट राखाडी असुन विविध आकाराचे भरपूर संख्येने काळे ठिपके त्यांवर असतात आणि पाय निळसर लांब असतात. माद्या सुमारे २०-४० अंडी कोवळ्या फांदीच्या सालीतील फटीत घालते. सुमारे दोन अठवड्यानंतर अंडी ऊबुन अळ्या त्यांच्या आजुबाजुच्या मऊ भागांना खातात आणि खोडात तसेच मुळात पोखरतात. अळ्यांचा जीवनटप्पा सुमारे नऊ किंवा दहा महिन्यांचा असतो.


प्रतिबंधक उपाय

  • वेळेत लागवड केल्यास खोड्यकिड्यांची उच्च लोकसंख्या टाळता येते.
  • रोपांमध्ये योग्य अंतर ठेवा किंवा मध्यम अथवा भारी छाटणी करा.
  • सुकणार्‍या फांद्यांसाठी लक्ष ठेऊन संसर्गास लवकर ओळखा.
  • संसर्गित फांद्या जमा करुन नष्ट करा.
  • उन्हाळ्यात खोल नांगरुन सुप्तावस्थेतील किड्यांना शिकार्‍यांसाठी किंवा उन्हाने करपण्यासाठी उघड्यावर आणा.
  • प्लास्टिकच्या आच्छादनाचा वापर उपद्रव आणि तण कमी करण्यात मदत करतो.
  • संसर्गित झाडे काढुन जाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा