Scirtothrips dorsalis
किडा
पिल्ले आणि प्रौढ दोन्ही पानांच्या खालच्या बाजुला खातात आणि रोपाचे इतर भागांचा पृष्ठभाग खरवडुन आणि त्यातुन गळणारा रस पितात. संक्रमित भागात फिकट तपकिरी ते रुपेरी डाग येतात आणि पाने विकृत होतात आणि टोकाच्या बाबतीत रोपाची अकालीच पूर्ण पानगळ होते. फुले खाल्ल्याने पाकळ्यांवर छटा येतात आणि सुकणे आणि गळणे होते तसेच फळांवरील, डाग, विकृती आणि व्रणांमुळे बाजारमूल्य कमी होते. जरी संक्रमण वर्षभर होत असले तरी कोरड्या महिन्यात आणि जास्त नत्रयुक्त खते दिलेल्या जमिनीत टोकाचे होते.
ओरियस जातीचे छोटे पायरेट बग्ज आणि फितोसेइड माइटस नियोसेलस कुकुमेरिस आणि अँम्ब्लिसेयस स्विर्स्किसारखे विविध जैव नियंत्रक एजंटस डाळिंबावरील फुलकिड्यांचे परिणामकारक नियंत्रण करतात असा अहवाल आहे. युसेयस सोजेन्सिस, इ. हिबिस्कि आणि इ. ट्युलारेन्सिस सारखे शिकारी कोळीही मिरची/मिरी आणि द्राक्षासारख्या पर्यायी यजमानांवरील लोकसंख्या नियंत्रणासाठी परिणामकारकपणे वापरले गेले आहेत. डायाटोमॅस्युअस माती रोपाच्या बुडाशी आणि पानांवर संध्याकाळी पसरा ज्यामुळे फुलकिडे आणि अळ्या कोरड्या होतील. नीम तेल, स्पिनेटोराम किंवा स्पिनोसॅड पानांच्या दोन्ही बाजुला आणि रोपाच्या बुडाशी वापरा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मॅलेथियॉन असणार्या पानांवरील फवार्यांची शिफारस फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी केली जाते. इतर कीटनाशकांचा वापरही एस. डॉरसालिसची लोकसंख्या नियंत्रणासाठी परिणामकारक आहे. उदा. अबॅमेक्टिन, मिथोमिल आणि डायमिथोएट हे सामान्यपणे फुलकिड्यांविरुद्ध परिणामकारक आहेत.
स्किर्टोथ्रिप्स डॉरसालिस आणि र्हिफिफोरोथ्रिप क्रुएनटाटस नावाच्या फुलकिड्यांच्या दोन जातींमुळे लक्षणे उद्भवतात. स्किर्टोथ्रिप्स डॉरसालिसचे प्रौढ फिक्या पिवळ्या रंगाचे असतात. माद्या सुमारे ५० राखाडीसर पांढरी बीनच्या आकाराची अंडी, कोवळ्या पानांच्या आणि कळ्यांच्या आत घालतात. जशी लोकसंख्या वाढते, ते जुन्या पानांच्या पात्यांचे पृष्ठभागही निवडतात. ३-८ दिवसात अंडी ऊबतात. नविन ऊबलेली पिल्ले फार छोटी, लालसर शरीराची जे नंतर पिवळसर तपकिरी होते, असतात. पिल्ले रुपांतरीत होण्यासाठी खाली जमिनीवर पडतात आणि मग त्यांचा विकास सैलसर मातीत किंवा यजमानाच्या बुडाशी असलेल्या पाल्यापाचोळ्यात होतो. कोषावस्था सुमारे २-५ दिवस टिकते. आर. क्रुएनटाटसचे प्रौढ फार छोटे, सडपातळ, मऊ शरीराचे किडे असतात आणि पंख खूप झालरवाले, काळसर तपकिरी असतात आणि पिवळसर पंख असतात आणि लांबी सुमारे १.४ मि.मी. असते.