इतर

कलिंगडावरील फळमाशी

Zeugodacus cucurbitae

किडा

थोडक्यात

  • अळ्या फळांमध्ये खाऊन बोगदे करीत असल्याने फळे कुजतात आणि अकाली गळतात.
  • फळावर बारीक रंगहीन धब्बे येतात.
  • कोवळी रोप, मूळ, फांद्या आणि कळ्यांवर देखील अळ्या हल्ला करतात.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

झेड. कुकुरबिटे नावाच्या फळमाशीच्या माद्या अंडी घालण्यासाठी फळांच्या सालीला पोखरून आत प्रवेश करतात. गरामध्ये खूप नुकसान (विष्ठेची दूषितता, कूज) होते. फळांच्या सालीवर जिथे अंडी घातली गेली आहेत तिथे बारीक रंगहीन धब्बे दिसतात. अंडी घालण्यासाठी केलेले व्रण फळांना बुरशी आणि जंतुंच्या दुय्यम संक्रमाणासाठी संवेदनशील करतात. प्रभावित फळे कुजतात आणि वेलीवरुन अकाली गळतात. अळ्या कलिंगडाचे कोवळे रोप, कोवळे सोटमूळ आणि काकडी, स्क्वॅश तसेच इतर यजमान वेलींच्या फांद्या आणि कळ्यांवर देखील हल्ला करतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

काढणीनंतर फळांना उष्ण उपचार (गरम वाफ किंवा पाणी) किंवा थंड उपचार केल्यास साठवणीत आणि वहनात संक्रमणाची जोखिम टाळता येते. वाढणार्‍या फळाला सुरक्षा आच्छादन घाला किंवा कामगंध अथवा प्रोटिन (उदा. मिथिल युजेनॉल जे नर माशांना आकर्षित करते)सापळे वापरा. ऑसिमम सँक्टम (होली बेसिल/तुळस)चा अर्क ज्यात युजेनॉल, बिटा- कॅरिओफायलीन आणि बिटा-एलिमेन असते ते कापसावर लावल्यास माशांना ०.८ कि.मी अंतरावरुन देखील आकर्षित करते. या घटकांना स्पिनोसॅडसह मिसळून वापरल्यास बागेतील माशांचे नियंत्रण चांगले होईल. निंबोळी अर्क देखील अंडी घालण्यास प्रतिबंधक म्हणुन वापरता येतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मॅलेथियॉन असणारी कीटकनाशके फळमाशीवर मध्यम परिणाम करतात. फवारणीत प्रोटिन आमिष मिसळल्यास ठराविक भागात माशा आकर्षित होतात.

कशामुळे झाले

कोवळ्या फळाच्या सालीखाली अंडी पुंजक्याने घातली जातात. अळ्या पूर्ण वाढ झाल्यानंतर १०-१२ मि.मी. लांबीचे असतात आणि फळाच्या गराला पोखरुन नुकसान करतात. कोषावस्था १० दिवस टिकते व शक्यतो जमिनीत होते पण काहीवेळा फळात देखील होऊ शकते. कोष अंडाकृती तपकिरी आणि ६-८ मि.मी. लांबीच्या घरट्यात विकसित होतात. कोरड्या भागातील कोष सुप्तावस्थेत जातात. प्रौढ ८-१० मि.मी. लांबीचे आणि गडद तपकिरी डोक्याचे असतात आणि तीन ठळक पिवळे पट्टे पाठीवर असतात. हे फुल, संक्रमित फळ आणि झाडातील रससोषण करतात. पंख १२-१५ मि.मी. लांबीचे पारदर्शक असुन त्यांच्या टोकावर गडद तपकिरी पट्टे असतात. फळमाशीचे जीवनचक्र ३-४ अठवड्याचे असते आणि वर्षातुन यांच्या बऱ्याच पिढ्या होतात.


प्रतिबंधक उपाय

  • काढणी न केलेली सर्व फळे खड्डा करून किमान ०.५ मी.
  • खोल पुरा म्हणजे अळ्यांची पूर्ण लोकसंख्या नष्ट होईल.
  • जमिनीची नियमितपणे मशागत करून कोषांना उन्हात उघडे पाडा किंवा खोल पुरा.
  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • सापळे वापरुन शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • सापळे वापरुन प्रौढ माशांचे निरीक्षण करा किंवा मोठ्या संख्येने पकडा.
  • संक्रमित फळांचे वहन इतरत्र करणे टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा