केळी

एरंडीवरील केसाळ अळी

Pericallia ricini

किडा

थोडक्यात

  • पानांचे भाग हरितद्रव्यविरहित, फिकट तपकिरी दिसण्यातुन खरवडल्याचे नुकसान दृष्य होते.
  • न उमललेल्या पानांवर खाल्ल्याने खिडक्यांसारख्या संरचनेमुळे झालेले नुकसान दिसते.
  • जास्त संक्रमण झाल्यास पानगळ देखील होऊ शकते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

केळी

लक्षणे

अळ्यांमुळे नुकसान होते. अळ्या पानातील हरीतद्रव्य खात असल्याने सुरवातीची लक्षणे पानांवर खरवडल्यासारखी दिसतात. कालांतराने पानांना खाल्ल्याने त्यांवर खिडक्यांसारखी संरचना आणि मोठे फिकट तपकिरी, अर्धपारदर्शक भाग दिसतात. गंभीर संक्रमणात पानगळ होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

निंबोळी अर्कचे वापर अळ्या विकसित होण्याच्या सुरवातीच्या टप्प्यावर केल्यास संक्रमणाचे नियंत्रण करण्यात मदत मिळते. म्हणुन ५% निंबोळी अर्क १ ली. पाण्यात मिसळावे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर कीटनाशकांची गरज भासलीच तर क्लोरपायरीफॉस असणार्‍या उत्पादांना फवारणी द्वारे वापरले जाऊ शकते. कृपया हे ध्यानात ठेवा कि वर नमूद केलेल्या रसायनांचा मानवी स्वास्थ्यावर तसेच सस्तन प्राणी, मधमाशी, मासा आणि पक्षांवर देखील विषारी परिणाम होऊ शकतो.

कशामुळे झाले

एरंडीवरील केसाळ अळी ही निशाचर पतंगाची प्रजाती आहे. म्हणुन प्रौढ फक्त संध्याकाळी उशीरा आणि रात्रीच दिसतात. गुबगुबीत प्रौढांचे पुढचे पंख राखाडी असुन त्यावर गडद ठिपके असतात आणि पाठचे पंख गुलाबीसर असतात. अळ्या काळ्या असुन डोके तपकिरी असतो आणि पूर्ण शरीरावर तपकिरी लांब केस असतात.


प्रतिबंधक उपाय

  • उपद्रवासाठी झाड किंवा बागेचे निरीक्षण करा.
  • संक्रमणाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी अंड्यांचे पुंजके, अळ्या, संक्रमित झाड किंवा त्यांचे भाग हाताने वेचुन काढा.
  • प्रकाश सापळे वापरुन प्रौढ किड्यांना पकडुन मारा.
  • मोठ्या संख्येने पकडण्यासाठी पलिते (मशाल) वापरुन लहान किड्यांना आकर्षित करा.
  • संक्रमित झाड काढुन जाळुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा