केळी

केळीवरील तांबडे फुलकिडे

Chaetanaphothrips signipennis

किडा

थोडक्यात

  • रसशोषण केल्यामुळे फळांवर पाणी शोषल्यासारखे भाग दिसतात.
  • डाग तांबट खडबडीत डागात बदलतात जे गडद लाल ते गडद तपकिरी होऊन पूर्ण सालीवर पसरतात.
  • जास्त विकसित फळांत भेगा पडु शकतात किंवा ते चिरू शकतात.
  • प्रौढ सडपातळ, पिवळे ते तपकिरी रंगाचे, सुमारे १.३ मि.मी.
  • आकाराचे असुन अरुंद पंख झालरीसारखे असतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

केळी

लक्षणे

वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर संक्रमण होऊ शकते आणि पान, फांद्या आणि फळांवर दिसते. प्रौढ आणि अळ्या बहुधा पर्णकोषाच्या बुडाला रहातात. पिल्ले फार खादाड असतात आणि त्यांच्या सोंडेने झाडाचे रस शोषण करतात. फळांवर पाणी शोषल्यासारखे भाग दिसणे ही सुरवातीची लक्षणे आहेत. कालांतराने हे भाग फळांना वैशिष्ट्यपूर्ण लालसर पैलु देतात ज्यामुळे सालीचा रंग गडद लाल ते गडद तपकिरी होतो. बहुधा फक्त सालीवरच नुकसान दिसते पण जर संक्रमण गंभीर असेल तर पूर्ण फळावर नुकसानीची लक्षणे दिसतात. जास्त पिकलेल्या फळांवर, भेगा दिसतात. काहीवेळा फळे चिरू शकतात. वाढीच्या सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव झाल्यास फळांच्या घडास खूप नुकसान होऊ शकते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

क्रायसोपिडे कुटुंबातील प्रजाती आणि लेडीबग बीटल प्रजातीच्या परजीवी किड्यांना वापरुन उपद्रवाचे नियंत्रण केले जाऊ शकते. मुंग्यांच्या काही प्रजाती देखील परिणामकारक असतात. त्या जमिनीतील कोषांवर हल्ला करतात. जर लागवडीची सामग्री निरोगी स्त्रोतापासुन आहेत कि नाही याची खात्री नसल्यास गरम पाण्याचे उपचार केल्यास संक्रमणाची जोखिम कमी होण्यात मदत मिळु शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर कीटकनाशकांची गरज भासलीच तर जमिनीत वापर करुन कोषांचे तसेच झाड आणि फळांवर वापर करुन प्रौढांचे नियंत्रण करावे. परत प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन हाच एकमात्र उपाय आहे.

कशामुळे झाले

चेटॅनाफोथ्रिप्स सिग्निपेनिस नावाच्या फुलकिड्यांमुळे लक्षणे उद्भवतात पण इतर काही प्रजातीही (हेलियोनोथ्रिप्स कडालिफिलियस) गुंतलेल्या असु शकतात. संक्रमित कंद, मुनवे किंवा रोपांचे वहन केल्याने यांचे वहन होते किंवा काही कमी प्रमाणात एका झाडावरून दुसऱ्या झाडावर फिरणार्‍या फुलकिड्यांद्वारे होते. प्रौढ सडपातळ, पिवळे ते तपकिरी, सुमारे १.३ मि.मी. लांबीचे असून अरुंद झालरवाले पंखांचे असतात आणि दोन गडद भाग पुढच्या पंखांवर दिसतात. माद्या बारीक अंडी (साध्या डोळ्यांना न दिसणारी) पर्णकोषाच्या खाली आणि जिथे फळे झाडाला स्पर्श करतात तिथे घालतात. सुमारे ७ दिवसात पंखहीन, पांढर्‍या ते दुधाळ रंगाच्या अळ्या ऊबुन बाहेर येतात. त्या सुमारे ७ दिवसात प्रौढांच्या मापाच्या होतात. मग त्या जमिनीत जाऊन कोषात जातात. सुमारे ७-१० दिवसात प्रौढ फूलकिड्यांची नविन पिढी बाहेर येते. प्रतिवर्षी यांच्या अनेक पिढ्या होऊ शकतात. उष्ण आणि दमट हवामानात त्यांची संख्या सर्वात जास्त असते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोताकडुन सदृढ रोप, कंद किंवा मुनवे घ्या.
  • स्वयंभू रोपे काढुन टाका आणि मुख्य बागेच्या आजुबाजुला यजमान झाडांची लागवड करु नका.
  • या किडींच्या उपद्रवासाठी नियमितपणे बागेचे निरीक्षण करत चला.
  • वाढीच्या सुरवातीच्या टप्प्यावर घडांवर आवरण घालुन झाडे वाचवा.
  • संक्रमित झाड काढुन जाळुन नष्ट करा.
  • बागेतील दुर्लक्षित झाडे काढून टाका कारण हे कीड पसरविण्यासाठी स्त्रोत म्हणून काम करू शकतात.

प्लँटिक्स डाऊनलोड करा