Toxotrypana curvicauda
किडा
माद्या कोवळ्या फळांमध्ये अंडी घालतात. सालींत अळ्यांनी केलेल्या छिद्रातुन पांढरा चिकट चीक गळतो जो फळांच्या गडद हिरव्या पार्श्र्वभूमीवर उठुन दिसतो. अंडी उबुन अळ्या बाहेर येतात आणि फळाच्या गरातुन बिया खाण्यासाठी तिथपर्यंत पोचण्यासाठी बोगदे करतात. फळांच्या पृष्ठभागावर बाहेर निघण्याची छिद्रे स्पष्ट दिसतात. खूप बोगदे झाल्याने फळांचा गर सडु लागतो जो तपकिरीसर दिसु लागतो आणि जसे सडणे वाढत जाते तसे त्यावर काळे व्रणही दिसु शकतात. फळांतुन घाणेरडा वास येतो आणि रसासारखा पदार्थ झिरपतो. फळाची साल पिवळी पडुन खपली धरल्यासारखी किंवा खोलगट दिसु लागते. फ़ळे अकाली पिकतात आणि गळतात.
डोरिक्टोब्रॅकोन टोक्सोट्रिपॅने नावाच्या परजीवी वॅस्पच्या वापरात नियंत्रणाचा संभव दिसतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या माशीविरुद्ध कोणतेही कीटनाशक परिणामकारक दिसत नाही. सापळ्यात लावलेले कीटनाशक (उदा. मॅलेथियॉन, किंवा डेल्टामेथ्रिन) बरोबर खास अमिष (नर किंवा मादीसाठी) ची चाचणी सुरु आहे. फळांना एथिलिन ब्रोमाइडच्या गरम वाफेचे उपचार दिल्यास पपयीवरील फळमाशी मरते.
टोक्सोटरिपाना करव्हिकौडा नावाच्या माशीमुळे ही लक्षणे उद्भवतात जी छोट्या कवळ्या हिरव्या पपयात अंडी घालते. प्रौढांना बहुधा वॅस्प समजले जाऊ शकते कारण त्यांचा आकार, रंग आणि वागणे तसेच असते. त्यांचे शरीर पिवळसर असुन छातीवर काळे डाग समान अंतरावर असतात. माद्यांचे ओटीपोट लांबट, अरुंद असते आणि टोकाशी अंडी घालण्यासाठी वक्राकार भाग असतो ज्याची लांबी शरीराच्या लांबीपेक्षाही जास्त असते. अळ्या पांढर्या आणि सडपातळ, साधारण १३-१५ मि.मी. लांबीच्या असतात. प्रत्येक फळांत भरपूर संख्येने अळ्या असु शकतात आणि त्यांची लक्षणे पीक घेतल्यानंतर दिसतात. फळांचे सगळ्यात जास्त नुकसान होते ते पावसाळा संपल्यानंतर. पपयीवरील फळमाशी ही उष्ण कटिबंधात आणि अमेरिका खंडाच्या आजुबाजुच्या प्रदेशात सगळ्यात मोठा उपद्रव आहे.