Phyllocnistis citrella
किडा
वाढीच्या कोणत्याही काळात उपद्रव होऊ शकतो आणि तो मुख्यत: नविन पानांवर दिसतो. सुरवातीची लक्षणे म्हणजे पाने विकृत, वेडीवाकडी किंवा मुडपलेली होत असतात तरीपण ती हिरवीच राहतात. नीट पाहिल्यास पांढर्या सर्पाकृती किंवा राखाडी बोगद्यांच्या खुणा पानांच्या दोन्ही बाजुंमध्ये दिसतात. एक पातळ गडद रेष किंवा ठिपकेदार गडद रेष जी अळ्यांच्या विष्ठेशी संबंधित असते, ती बोगद्यात जास्त करुन पानांच्या खालच्या बाजुने दिसते. अळ्या ह्या बर्याचदा या बोगद्यांच्या शेवटी आढळतात आणि दर पानांवर त्या एकापेक्षा खूप जास्त असु शकतात. पानांना होणारे नुकसान हे संधीसाधु बुरशी किंवा जीवाणूचे संक्रमण होण्याचा एक स्रोत असू शकतो. अधिक संक्रमणात प्रकाश संश्र्लेषण क्रियेचा दर कमी होतो, ज्यामुळे वाढ खुंटते, फळे लहान आकाराची येतात व त्यांची प्रत कमी भरते. लिंबूवर्गीय पिकावरील पाने पोखरणारी अळीचे गंभीर संक्रमण झाल्यास पूर्ण झाडाची पानगळ होते व नवीन रोपांमध्ये मर होते.
भक्षकांमध्ये न्युरोप्टोरा जिनसच्या हिरव्या रंगाचे लेसविंग समाविष्ट आहे. परजीवी वॅस्प्सचेही खूप प्रकार जसे कि टेट्रास्टिचस आहेत जे लिंबूवर्गीय पिकावरील पाने पोखरणार्या अळ्यांवर हल्ला करुन त्यांना खातात. जैव कीटनाशक ज्यात स्पिनोसॅड, माशाचे तेल असणारा रेसिन साबण आणि पोंगामिया तेल पानांवरील फवारणीसाठी वापरले जाते ज्यामुळे ह्या लिंबूवर्गीय पिकावरील पाने पोखरणार्या अळीच्या उपद्रवावर नियंत्रण करता येते. नीम तेलही पतंगाना पानांवर अंडी घ्यालण्यापासुन परावृत करते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. लिंबूवर्गीय पिकावरील पाने पोखरणार्या अळीवर कीटनाशके पूर्णत: परिणामकारक नाहीत कारण अळ्या पानांच्या त्वचेने (थराने) संरक्षित असतात. जर कीटनाशकांची गरज भासलीच तर अंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य उत्पाद जेव्हा प्रौढ कार्यरत असतात तेव्हा वापरले जावे. अॅबामेक्टिन, टेब्युफेनोझाइड, अॅसेटामिप्रिड, डिफ्ल्युबेनझ्युरॉन किंवा स्पिनेटोरॅम असणारे असे बरेच उत्पाद बाजारात उपलब्ध आहेत. ह्या उपद्रवासाठी सिंथेटिक पायरेथ्रॉइड कुटुंबातील कीटनाशकेही वापरली जातात.
फिलोक्नीस्टिस सिट्रेला ह्या लिंबूवर्गीय पिकावरील पाने पोखरणार्या अळ्यांच्या खाण्यामुळे लक्षणे दिसतात. प्रौढ हे छोटे, तपकिरीसर किंवा राखाडी पतंग असतात ज्यांच्या पंखांना झालर असते आणि पुढच्या पंखांवर वैशिष्ट्यपूर्ण गडद ठिपके असतात. ते बहुधा थंड तापमानात म्हणजे पहाटे आणि संध्याकाळी, सकाळी लवकर आणि रात्रीच्या वेळी जास्त कार्यरत असतात. वसंत ऋतुमध्ये माद्या पानांच्या खालच्या बाजुला अंडी घालतात. निघणार्या अळ्या हिरवट, किंवा पिवळ्या असतात आणि जरी त्या काही वेळा फळांवरही हल्ला करतात तरी मुख्यत: पाने खातात. त्या पानांच्या दोन बाजुंमध्ये बोगदे बनवितात, जे विशिष्ट रुपेरी रंगाचे सर्पाकृती असतात. अळ्यांच्या शेवटच्या टप्प्यावर त्या बोगद्यातुन बाहेर येतात व पानांना स्वत:भोवती गुंडाळुन घेऊन कोषावस्थेत जातात. हा लिंबूवर्गीय पिकांना होणारा सर्वात मोठा उपद्रव आहे, आणि बहुतेक सर्व लिंबूवर्गीय उत्पादक भागात सापडतो. ह्यामुळे इतर रोगांची जसे कि जंतुजन्य कँकरची संवेदनशीलता वाढते.