तंबाखू

बटाटा पोखरनारा पतंग

Phthorimaea operculella

किडा

थोडक्यात

  • पान, फांद्या, देठ आणि मुख्य म्हणजे कंदांवर अळ्या उपद्रव करतात.
  • हे अळ्या कंदाच्या आतील भाग खातात पण साल तशीच ठेवत असल्यामुळे पारदर्शक फोडासारखे भाग दिसतात.
  • कंदाच्या पृष्ठभागावर अरुंद बोगदे दिसतात.
  • गरात खोल अनियमित भाग पाहिले जाऊ शकतात.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके

तंबाखू

लक्षणे

हे किडे सोलॅनेसियस कुटुंबातील बऱ्याच पिकांवर उपद्रव करतात पण बटाटे हे त्यांचे आवडते पीक आहे. अळ्या बटाट्याचे पान, फांद्या, देठ आणि कंदांवर (शेतात किंवा साठवणीच्या ठिकाणी) हल्ला करतात. ते पानाच्या आतील भाग खातात पण साल तशीच ठेवत असल्यामुळे पारदर्शक फोडासारखे भाग दिसतात. फांद्या कमजोर होतात किंवा तुटतात ज्यामुळे झाडे वाळतात. अळ्या कंदाच्या आतमध्ये त्याच्या डोळ्यातुन शिरतात आणि अरुंद बोगदे पृष्ठभागाला लागुन बनवितात किंवा गाभ्यात खोल खणुन अनियमित भाग तयार करतात. अळ्यांची विष्ठा त्यांच्या आत शिरण्याच्या जागी पाहिली जाऊ शकते आणि ही छिद्रे इतर बुरशी आणि जिवाणूजन्य रोगांसाठी प्रवेशद्वार म्हणून काम करतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

संत्र फळाच्या सालीचा अर्क आणि इतर प्रजातीचे झाड जसेकी पिथुरान्थोस टॉरटोसस किंवा इफियोना स्कॅब्रा जातीचा अर्क अळ्यांचे पुनरुत्पादन कमी करते. ब्रॅकॉन गेलेचिए, कोपिडोसोमा कोएलेरी किंवा ट्रोकोग्रामा प्रजातीचे परजीवी वॅस्पस ह्या उपद्रवाची लोकसंख्या चांगलीच कमी करतात. भक्षकांमध्ये मुंग्या आणि लेडीबर्डस येतात. ग्रॅन्युलोव्हायरस किंवा बॅसिलस थुरिंजिएनसिसच्या वापराने पंधरवड्यातच ८०% मृत्युदर पहायला मिळतो. काही देशात, साठवणीच्या काळातील नुकसान कमी करण्यासाठी गोणींवर निलगिरी किंवा लॅन्टानाची पाने पसरली जातात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ऑर्गॅनोफॉस्फेटच्या गटातील कीटकनाशकांची फवारणी पानांवर केली जाऊ शकते. पायरेथ्रॉइडचा वापर बीज प्रक्रीयेद्वारे करून अळीचा हल्ला रोखता येऊ शकतो.

कशामुळे झाले

प्रौढ पतंगाचे शरीर लांबट राखडी असते आणि मिशा वाढीव असतात, पुढचे पंख अरुंद तपकिरी असुन त्यावर गडद विखुरलेले ठिपके असतात आणि पाठचे पंख फिकट राखाडी असुन त्यांना लांब झालर असते. हा किडा मुख्यतः रात्री व्यवहार करणारा असुन तो प्रकाशाकडे आकर्षित होतो. अंडी एकेकटी किंवा गुच्छाने पानांवर किंवा कोरड्या मातीत कंदाच्या उघड्या पडलेल्या भागांवर घातली जातात. जर तापमान ४ डिग्री सेल्शियसपेक्षा कमी असेल तर अंडी उबत नाहीत. अळ्यांचे डोके गडद तपकिरी असते आणि शरीर फिकट तपकिरी ते गुलाबी असते. त्या देठांत, कोवळ्या कोंबात किंवा पानांच्या शिरात आणि नंतर कंदात खणतात आणि अनियमित भाग तयार करतात. २५ डिग्रीचे तापमान हे ह्यांच्या जीवनचक्राला उत्कृष्ट तापमान आहे पण १५ ते ४० डिग्री सेल्शियसचे तापमान त्या सहन करु शकतात. कोरड्या जमिनीतील भेगा ह्या अळ्यांचे अस्तित्व टिकविण्याकरिता अनुकूल असतात.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडाचे कंदच बियाणे म्हणुन वापरा.
  • प्रतिकारक किंवा सहनशील वाण लावा.
  • कंदाची लागवड करते वेळेस ५ सें.मी.
  • किंवा जास्त खोलवर करा.
  • नियमितपणे अळ्यांसाठी निरीक्षण करा आणि प्रकाश सापळे किंवा कामगंध सापळे वापरुन त्यांना मोठ्या संख्येने पकडा.
  • शेतातील व सभोवतालच्या भागातील तण नियंत्रण चोखपणे करा.
  • जमिनीला तडे जाऊ नयेत म्हणुन नियमितपणे पाणी द्या.
  • बटाटे तयार झाल्याबरोबर शक्य तितक्या लवकर काढणी करा.
  • संक्रमित व नाकारलेल्या कंदांचा ढीग खोल पुरुन टाका किंवा नष्ट करा.
  • शेतातुन झाडांचे अवशेष पूर्णपणे काढुन टाका.
  • साठवणीच्या गोणी आणि इतर वस्तूंमध्ये किडे नाहीत याची खात्री करा.
  • ७ आणि १० डिग्री सेल्शियस तापमानात बटाट्याची साठवण करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा