Scarabaeidae sp.
किडा
अळ्या आणि प्रौढ हे दोघेही रोपांना किंवा झाडांना खाऊन नुकसान करतात. अळ्या मुळे खातात ज्यामुळे रोपे मरगळतात आणि झाडी पिवळी पडते. भुईमुगाच्या बाबतीत शेंगांवरही हल्ला करुन नुकसान पोचवितात. गंभीर बाबतीत रोपे मरतात आणि जमिनीतुन सहज उपटता येतात. हल्ला होऊनही पिकांबर लक्षणे लगेच दिसत नाहीत. दीर्घ काळात त्यांचा जीवनकाळ कमी होतो आणि उत्पन्न कमीकमी होत जाते. बारमाही रोपात, रोपाचे अचानक मरगळणे हे सगळ्यात लवकर दिसणारे लक्षण आहे नंतर अकाली पानगळ होते. बाधीत रोपे पिवळसर आणि मरगळलेली दिसतात आणि शेतातील काही भागात पूर्ण मरतात.
सोलॅनम सुराटेन्स किंवा नीमच्या पानांचे अर्क बियाणांच्या उपचारांसाठी वापरावेत. मित्र सूत्रकृमी (उदा. हेटेरोहाब्डिटिस प्रजाती)चे द्रव सस्पेंशन फवारणी १.५ बिलियन सूत्रकृमी प्रति हेक्टरच्या मापाने मोसमात लवकर करावी. न्यूक्लियर पॉलिहेड्रॉइस विषाणू किंवा हिरवी मस्कार्डाइन नावाच्या बुरशीवर आधारीत कीटनाशकेही चांगले काम करतात. पेरणीपूर्वी दाण्यांना रॉकेल (एक ली. प्रति ७५ किलो बियाणे) लावावे. ब्रॅकोनिडस, ड्रॅगॉन फ्लाइज, ट्रिकोग्रामाटिडसना राखावे. ब्रॅकोनिडस, ड्रेगॉन फ्लाइज, ट्रिकोग्रामाटिडस कुटुंबातील किड्यांचे संरक्षण करा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जमिनीतुन बाहेर आल्यानंतर प्रौढ जवळपासच्या काही ठराविक रोपांच्या पाल्यापाचोळ्याला खातात. ह्या रोपांवर रात्रीच्या वेळी जर कीटनाशकांची फवारणी केली तर अंडी घालण्यापुर्वीच प्रौढांची लोकसंख्या कमी होईल. क्लोरपायरिफॉस २०% इसीला ११२५मि.ली./हे. दराने ह्या कारणासाठी वापरले जाऊ शकते. ह्या किड्यांचा विकास होऊ नये म्हणुन बियाणांवरील उपचारांसाठी क्लोरपारिफॉसला ६.५ मि.ली./किलो बियाणे दराने वापरावे.
होलोट्रिचिया नावाच्या प्रजातींच्या हुमणींमुळे लक्षणे उद्भवतात. प्रौढ गडद तपकिरी आणि साधारण २० मि.मी. लांब आणि ८ मि.मी. रुंद असतात. पावसाळा सुरु झाल्यापासुन तीन ते चार दिवसात ते मातीतुन बाहेर येतात छोट्या अंतरांपर्यंत उडतात आणि आजुबाजुच्या रोपांना खातात. खाल्यानंतर ते परत जमिनीत लपण्यासाठी जातात आणि अंडी घालतात. माद्या २०-८० सफेद गोलसर आकाराची एकेकटी अंडी जमिनीत ५-८ सें.मी. खोलीत घालते. अळ्या पांढुरक्या पिवळ्या, अर्धपारदर्शक आणि साधारण ५ मि.मी. लांब असतात. पूर्ण वाढलेले हुमणी जाडजुड असतात आणि त्यांचा खालचा जबडा मजबुत असतो. त्यांचे डोके पिवळसर आणि शरीर सफेद मांसल आणि 'C' आकाराचे असते. ते जैव बाबींना काही अठवडे खातात आणि मग मुळांच्या तंतुंना आणि शेंगांना खातात. भुईमुगाव्यतिरिक्त हुमणी ऊसाची, मिरचीची, ज्वारीची, मक्याची, लाल चण्यांची किंवा मोती बाजरीची मुळेही खाते.