भुईमूग

लाल केसाळ अळी

Amsacta albistriga

किडा

थोडक्यात

  • अळ्या, कळ्या, पाने, देठ आणि रोपाचे इतर भाग खातात.
  • पानांचा रंग अप्राकृतिकपणे बदलतो आणि पाने गळतात.
  • पानगळतीमुळे पिकाचे गंभीर नुकसान होते.

मध्ये देखील मिळू शकते


भुईमूग

लक्षणे

कोवळे सुरवंट मोठ्या संख्येने पावसाळ्यात दिसतात आणि पानांचा खालचा भाग खरवडतात. प्रौढ सुरवंट रोपाचे सगळे भाग, फुले, कळ्या आणि पानांसकट अधाशीपणे खातात. फक्त कठिण भाग जसे कि मधली शिर, शिरा आणि देठच फक्त शिल्लक रहातात. प्रौढ लाल केसाळ सुरवंट गटागटाने शेतांशेतांत फिरतात, ज्यामुळे संपुर्ण भागात खूपच पानगळ होते आणि पिकही फारच कमी येते. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या कोषात जाण्यासाठी बहुधा न उकरलेल्या जमिनीत खळगे करतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

जैव नियंत्रण पद्धतीत ट्रिकोग्रॅमा पॅरासिटॉइड वॅस्पस येतात. हे लाल केसाळ अळ्यांच्या अंड्यांवर आणि कोवळ्या अळ्यांवर परजीवीकरण करतात. न्युक्लियर पॉलिहेड्रोसिस व्हायरस (एनपीव्ही) किंवा बॅसिलस थुरिंजिएनसिसवर आधारित जैव कीटनाशकांची फवारणी केल्यास ह्या उपद्रवाचे परिणामकारकरीत्या व्यवस्थापन होऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धती वापरुन लाल केसाळ अळ्यांची लोकसंख्या नियंत्रणात आणा. रसायनिक उपचारांची गरज लागण्याइतके आर्थिक नुकसान होणार असेल (आठ अंड्यांचे पुंजके प्रति १०० मी. लांबीत किंवा१०% पानांचे नुकसान) तर कीटनाशकांच्या छिडकण्याने कोवळ्या अळ्यांवर नियंत्रण केले जाऊ शकते. इतर कीटनाशकांचा वापर पूर्ण वाढलेल्या किड्यांच्या नियंत्रणासाठी केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

पावसाळ्यातील पावसानंतर लगेचच प्रौढ पतंग जमिनीतुन बाहेर येतात. त्यांचे पुढील पंख तपकिरी असुन त्यावर पांढरे पट्टे असतात आणि बगलेत लांबट पिवळसर पट्टे असतात. पाठचे पंख सफेद असुन त्यावर वैशिष्ट्यपूर्ण असे काळे ठिपके असतात. माद्या साधारणपणे १००० दुधाळ पिवळसर अंडी पुंजक्यांनी पानांच्या खालच्या बाजुला किंवा जमिनीवरील पाल्यापाचोळ्यात घालतात. कोवळ्या अळ्या फिकट तपकिरी रंगाच्या असुन त्यांना केस नसतात आणि त्या पानांवर तुटुन पडतात. प्रौढ अळ्या लालसर तपकिरी असुन त्यांच्या बगलेत काळे पट्टे असतात आणि लांब लालसर केस त्यांच्या शरीरावर असतात. त्या फारच सक्रिय आणि नुकसानदायक असतात. त्या १० ते २० सें.मी. खोल खड्डे झाडांच्या खाली, कुंपणांच्या खाली किंवा सावलीच्या ठिकाणी करतात आणि त्यात प्रौढ म्हणुन बाहेर येण्याआधी जवळपास १० महिने कोषात जातात.


प्रतिबंधक उपाय

  • किड्यांची उच्च लोकसंख्या टाळण्यासाठी लवकर पेरणी करा.
  • अळ्यांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी ३० सें.मी.
  • खोल आणि २५ सें.मी.
  • रुंदीचा खंदक खोदा.
  • भुईमुगाच्या प्रत्येक ६ ओळींमागे अधुनमधुन एरंडाची झाडे लावा.
  • पतंगांना पुष्कळ संख्येने पकडण्यासाठी किंवा नियंत्रण करण्यासाठी प्रकाश सापळे वापरा.
  • ज्वारी, बाजरी किंवा मक्यासारख्या पिकांबरोबर पीक फिरवणी करा.
  • मोसमाच्या मध्यावरील दुष्काळ टाळण्यासाठी आणि पिक घेण्याआधीचे संक्रमण टाळण्यासाठी एकदा पाणी द्या.
  • शेतातील पर्यायी यजमान आणि तण शोधुन काढुन टाका.
  • पिकावरील आणि अधुनमधुन लावलेल्या झाडातुन निरीक्षण करुन, पानांवरुन अंडी आणि अळ्यांना गोळा करुन नष्ट करा.
  • जमिनीतील कोषांचा वातावरणाद्वारे आणि शिकार्‍यांद्वारे नायनाट करण्यासाठी खोल नांगरा ज्याने ते उघड्यावर पडतील.

प्लँटिक्स डाऊनलोड करा