Gargaphia solani
किडा
दोन्ही प्रौढ आणि पिल्ले वांग्याची पाने खातात. वसंत ऋतुची सुरवात हा चिंताजनक काळ असतो , जेव्हा वांग्याची रोप अगदी छोटी असतात. ह्या काळात सुप्तावस्थेतुन प्रौढ जागे होऊन रोपांना व्यापतात आणि पानांच्या खालच्या बाजुला हिरवट अंडी घालतात ज्यातुन भविष्यात पिल्लांची फौज तिथे तयार होईल. अंडी उबुन पिल्ले बाहेर येतात आणि पानांची खालची बाजु गटागटाने खायला लागतात आणि तपकिरी रंगाची विष्ठा सोडतात. पाने चावल्याच्या परिणामाने पानांच्या वरच्या बाजुला गोल, वेगळ्या रंगाचे धब्बे स्पष्ट दिसतात. जसे ते खात खात कडेला सरकतात, ह्या वाढलेल्या नुकसानाने पान पिवळे पडते आणि अखेरीस आक्रसुन मुडपुन जाते. गंभीर उपद्रवाने पूर्ण रोप मरु शकते किंवा अतिशय अशक्त होते त्यामुळे फळे वाढत नाहीत.
वांग्यातील कलाबुतीच्या पंखाच्या किड्यांचे नैसर्गिक शत्रु आहेत, लेडीबग्ज, कोळी आणि पायरेट बग्ज आणि त्यांचे संगोपन केले पाहिजे. कीटनाशक साबण, पायरेथ्रिन्स आणि कडुलिंबाचे तेल पानांच्या खालच्या बाजुला फवारले जाऊ शकते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जैविक उपचार पद्धती जर उपलब्ध असली तर. मॅलेथियॉन किंवा पायरेथ्रॉइडवर आधारीत विस्तृत श्रेणीची कीटनाशके पानांवरील फवारणीसाठी वापरले जातात पण वापरताना काळजी घ्या कारण ह्यामुळे मित्र किडींनाही नुकसान होऊ शकते.
वांग्यातील कलाबुतीच्या पंखांच्या किड्यांचे प्रौढ रंगाने तपकिरी आणि पांढते असतात आणि त्यांवर पारदर्शक हिरव्या कलाबुतीसारख्या शिरा पंखात असतात. त्यांची लांबी अंदाजे ४ मिलिमीटर असते आणि ते पालापाचोळ्यात अनुकूल परिस्थिती वातावरण निर्माण होईपर्यंत सुप्तावस्थेत रहातात आणि मग बाहेर येऊन अंडी घालतात. अंडी हिरवट असतात आणि पानांच्या खालच्या बाजुला झुपक्याने चिकटतात. पिल्लांना पंख नसतात, ती पिवळसर असुन त्यांच्या ओटीपोटाच्या टोकावर गडद ठिपका असतो. पिल्ले आणि प्रौढ दोन्ही पानांना नुकसान करतात पण पिल्ले जेव्हा ज्या पानांवर उबली ती खात असताना प्रौढ मात्र इतर रोपांवर उडुन शेताला नुकसान करतात. हे किडे अजुनतरी फक्त वांग्यातील किडे म्हणुन ओळखले जात नाहीत. पीकाचे नुकसान कमी असते पण काही खास वेळेस, ते परिणामकारक असु शकते. वांग्याव्यतिरिक्त पर्यायी यजमानात येतात, टोमॅटो, बटाटे, सुर्यफूल, सेज, कापुस, धोतरा आणि तण घोड खाजकुयली.