भात

भाताच्या सुरळीतील अळी

Parapoynx stagnalis

किडा

थोडक्यात

  • पाने काटकोनात कातरली जातात.
  • शिडीसारखी रचना दिसते.अळ्या हिरव्या असुन डोके पिवळे असते.
  • प्रौढ पांढरे पतंग असतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

पी. स्टॅनगॅलिसच्या कोवळ्या अळ्या पानांना आडवे खातात. अळ्या पानांच्या टोकांना काटकोनात कापुन पानांच्या सुरळ्या तयार करतात. सुरळीतील अळ्यांचे वैशिष्ट्य आहे कि त्या पानांना काटकोनात कात्रीने कापल्यासारख्या फाडतात आणि पानांच्या सुरळ्या करुन पाण्यावर तरंगतात. अळ्या पानांचे भाग खरवडुन खातात आणि पानाचा कागदासारखा थर सोडतात. जी पाने खाल्ली जातात त्यावर कडक तंतूंची शिडीसारखी रचना सोडतात. नुकसानीची लक्षणे इतर पानगळ करविणार्‍या किड्यांसारखी समजली जाऊ शकतात. सुरळीतील अळीची पुष्टी करण्यासाठी १) पानांवर शिडीसारखी रचना, २) काटकोनात फाटलेली पाने, ३) पर्णकोषांशी जुडलेल्या पानांच्या सुरळ्या आणि पाण्यावर त्यांचे तरंगणे अशी लक्षणे पाहून खात्री करावी.

शिफारशी

जैविक नियंत्रण

जैव नियंत्रक एजंटस जसे गोगलगाय (जी अंडी खाते), हायड्रोफिलिड आणि डिटिस्किड पाण्यातील बीटल्स (जे अळ्या खातात), कोळी, नाकतोडे आणि पक्षी (जे प्रौढांना खातात) यांना प्रोत्साहन द्या. जिथे किडे आढळतात तिथे राख किंवा निंबोळी अर्काचा वापर करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अधिकृत कार्बामेट कीटनाशकांची पानांवर फवारणी करा पण पायरेथ्रॉइडचा वापर टाळा कारण हे किडे त्याला सहनशील झालेले आहेत.

कशामुळे झाले

पाणी भरलेल्या, पाणथळ आणि सिंचित पद्धतीतही पाणी भरलेल्या शेतात कीडे बहुधा सापडतात. हे तणात आणि शेतातील जंगली भातरोपात आणि जवळपासच्या भागात रहातात आणि जेव्हा परिस्थिती अनुकूल असते तेव्हा नविन भातपिकांना संक्रमित करतात. कोवळ्या रोपांची लागवड या किड्याच्या विकासासाठी अनुकूल असतात. चांगली तयारी न करता केलेली लागवड आणि जस्ताची कमतरता असणार्‍या जमिनींमुळे पिके ह्या रोगास बळी पडतात. तरीपण भातशेतीत हे किडे बहुधा कमी संख्येत आढळतात.


प्रतिबंधक उपाय

  • लवकर लागवड केल्याने या अळीचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • लागवडीचे अंतर जास्त (३० × २० सें.मी.) ठेवा.
  • जास्त कालावधीची रोप लागवड करा आणि शक्य तेवढी राहीलेली अंडी नष्ट करा.
  • शेतातुन पाण्याचा निचरा करा आणि २-३ दिवसानंतर परत पाणी देताना जाळ्या वापरुन किड्यांना पकडा.
  • खताचा वापर शिफारशीप्रमाणे करा, जास्त खत देणे टाळा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण आणि जंगली भातरोपे जे पर्यायी यजमानांचे काम करतात, त्यांना काढा.
  • पुरेसे पलाश वापरण्याची काळजी घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा