भात

भातावरील हिरवे तुडतुडे

Nephotettix spp.

किडा

थोडक्यात

  • हिरवे तुडतुडे हे सर्वसाधारणपणे भातशेतीत सापडणारे किडे आहेत.
  • ते कोरडवाहू आणि सिंचन केलेल्या ओल्या वातावरणात फोफावतात आणि टंग्रो नावाचा विषाणूजन्य रोग पसरवतात.
  • पानाच्या टोकाची रंगहीनता, कमी फुटवे (कांडे) येणे आणि रोपाची वाढ खुंटणे ही सर्वसामान्य लक्षणे आहेत.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

भाताच्या शेतीत हिरवे तुडतुडे हे सर्वसामान्य कीटक आहेत आणि विषाणूजन्य रोग टंग्रोची लागण करतात. या विषाणूमुळे पानाची टोक रंगहीन होतात, कमी फुटवे येतात आणि रोपाची वाढ खुंटुन जोमही कमी रहातो आणि अतिगंभीर बाबतीत रोपे वाळतात. नत्र कमतरता किंवा लोहाच्या विषासक्ततेच्या लक्षणांपासुन टँग्रोची लक्षणे वेगळी समजण्यासाठी, किड्यांच्या उपस्थितीचे निरीक्षण करा: पांढरी किंवा फिकट पिवळी अंडी पर्णकोषात किंवा मध्य शिरेत; पिवळी ते फिकट हिरवी पिल्ले काळ्या चिन्हांसकट किंवा चिन्हांशिवाय; फिकट हिरवे प्रौढ काळ्या चिन्हांसकट किंवा चिन्हांशिवाय आणि वैशिष्ट्यपूर्ण तिरक्या हालचालींचे.

शिफारशी

जैविक नियंत्रण

जैव नियंत्रणात बारीक वॅस्पस (जे अंडी खातात), मिरिड बग्ज; स्ट्रेप्सिटेरान्स, प्युपिनक्युलिड माशा आणि सुत्रकृमी (जे पिल्ले आणि प्रौढांना खातात), अॅक्वाटिक व्हेलिड बग्ज, नॅबिड बग्ज, एम्पिड माशा, डॅम्सेल्फ्लाइज, नाकतोडे आणि कोळी किंवा बुरशीचे जंतु येतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. या कीटकांविरुद्ध बाजारात भरपूर कीटनाशके उपलब्ध आहेत. आपल्या क्षेत्रिय दुकानदाराकडे शेतातील परिस्थितीवर सर्वात जास्त चांगले उपाय कोणते ते विचारा. ब्युप्रोफेझिन किंवा पयमेट्रोझाइनचे आलटुनपालटुन केलेले उपचारही काम करतात. क्लोरपायरिफॉस, लँब्डा सायहॅलोथ्रिन किंवा इतर कृत्रिम पायरेथ्रॉइड संयुगे ज्यांचा प्रतिकार किड्यांमध्ये निर्माण होईल, ती वापरणे टाळा.

कशामुळे झाले

कोरडवाहू किंवा सिंचनाच्या पाणथळ वातावरणात हिरवे तुडतुडे हे सर्वसामान्य आहेत. ते डोंगरउतारावरच्या भातशेतीत जास्त सापडत नाहीत. पिल्ल आणि प्रौढ आडव्या पर्णकोषाऐवजी पानाच्या बुडाशी आणि मधल्या भागातून रससोषण करतात. त्यांना नत्र भरपूर दिलेली रोपे अनुकूल असतात. हा उपद्रव बहुधा चिंतेची बाब नसतो, फक्त तो आरटीव्हीचे संक्रमण करतो तेव्हा चिंताजनक असतो.


प्रतिबंधक उपाय

  • तुडतुडे आणि टंग्रोला (उदा.
  • सीआर-१००९) प्रतिकारक वाण लावा.
  • वर्षातुन फक्त दोन भातपीके घ्या.
  • क्षेत्रातील सर्व लागवडी एकाच वेळी होतील असे नियोजन करा.
  • लागवड शक्यतो लवकर खासकरुन कोरड्या वातावरणात करा.
  • कोरड्या मोसमात भाताशिवाय इतर कोणत्याही पीकाबरोबर पीक फेरपालट करा.
  • प्रकाश सापळे वापरुन किड्यांची संख्या बघता येते किंवा कमी करता येते.
  • नत्रचा वापर शिफारशीप्रमाणे करा.
  • शेतात आणि आजुबाजुला तण नियंत्रणात ठेवा ज्याने पर्यायी यजमान कमी होतील.

प्लँटिक्स डाऊनलोड करा