Orseolia oryzae
किडा
भातावरील गादमाशी कांड्याच्या बुडाजवळ नळकांडीसारख्या गाठींची रचना तयार करते ज्यातून चंदेरी लांबट पर्णकोष येतात ज्याला कांद्याची पात किंवा चंदेरी कोंब (सुमारे १ सें.मी. रुंद आणि १०-३० सें.मी लांब) असेही म्हणतात. प्रभावित कांड्याच्या पानांची वाढ खुंटते आणि ओंब्या येत नाहीत. रोपाची वाढ खुंटणे आणि पानांची विकृती, मरगळणे आणि गुंडाळणे हे दुष्काळ, पालाश कमतरता, क्षार आणि भातावरील फुलकिड्यामुळेही होते. समस्येचे निदान करण्यासाठी किडे आहेत का ते पहा. खासकरुन, लांबट नळीसारखी अंडी आणि मॅगॉटसारख्या अळ्या विकसित होणार्या कळ्यांमध्ये दिसतात का ते पहा.
प्लाटिगॅस्टेरिड, युपेल्मिड आणि तेरोमॅलिड वॅस्पस (जे अळ्या खातात),फिटोसिड माइटस (जे अंडी खातात), कोळी (जे प्रौढांना खातात) सारख्या परजीवींचा वापर यशस्वीपणे केला गेला आहे. किटकांना आकर्षित करणारी, भरपूर फुले येणार्या झाडांना भातशेतीच्या आजुबाजुला लावण्यानेही फायदा होतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. गादमाशीच्या उद्रेकावर नियंत्रण करण्यासाठी योग्य वेळी म्हणजे किटक बाहेर येण्याच्या वेळेस कीटकनाशक फवारणी करा. क्लोरपायरीफॉसचा वापर भातावरील आशियाई गादमाशीची लोकसंख्या नियंत्रणासाठी केला जाऊ शकतो.
भातावरील आशियाई गादमाशा सिंचन केलेल्या किंवा कोरडवाहू पाणथळ भातशेतीच्या वातावरणात कांडे येण्याच्या सुमारास भातशेतीत सापडतात. या डोंगर उतारावर आणि पाण्याने भरलेल्या भातशेतातही पहायला मिळतात. कोषावस्थेत हे कीटक विश्रांती घेतात आणि जेव्हा पावसाळ्यानंतर कळ्या वाढु लागतात तेव्हा सक्रिय होतात. प्रौढ गादमाशी रात्री सक्रिय असते आणि रोपला आतुन खाते म्हणुनच हिचा शोध घेणे कठिण असते. ह्यांची लोकसंख्या वाढण्यास ढगाळ किंवा पावसाळी वातावरण, जास्त फुटवे (कांडे) येणार्या वाणांची लागवड. चांगल्याच मानवतात. प्रगत व्यवस्थापन पद्धती वापरा. पिवळ्या खोडकिड्याप्रमाणेच नुकसान दिसते.