Cnaphalocrocis medinalis
किडा
पाने गुंडाळणारा म्हणुनही ओळखला जातो. प्रौढ पतंग मानवी नखाच्या लांबीचे असतात आणि तपकिरीसर नागमोडी रेषा पंखांवर दिसतात. अंडी बहुधा पानांच्या टोकांवर घातली जातात. सुरवंट पानांना स्वत:भोवती गुंफून घेतो आणि रेशमी धाग्यांनी पानाच्या कडांना विणतो. ते गुंडाळलेल्या पानाला आतुन खातात ज्यामुळे पानांच्या पात्यांवर लांब पारदर्शक पांढुरक्या ओळी येतात. काही वेळा पाने टोकापासुन देठापर्यंत गुंडाळली जातात. गोलाकार चपटी अंडी एकेकटी किंवा विष्ठेसकट सापडणे हे ही संक्रमणाचेच लक्षण आहे.
पेरणीनंतर १५ दिवसांनी सुरु करुन ट्रायकोग्रामा चिलोनिस (१००,००० प्रौढ/हे) यांना ५ ते ६ वेळा शेतात सोडल्यास प्रभावी आणि स्वस्तात नियंत्रण मिळते. तसेच नैसर्गिक शत्रु जसे अंडी खाणारा परजीवी वॅस्प (ट्रायकोग्रामाटिडे), कोळी, भक्षक भुंगे, बेडुक आणि ड्रेगॉन फ्लाइज, पॅथोजेनिक बुरशी किंवा जीवाणू आणि काही विषाणूंना किड्यांची लोकसंख्या कमी करण्यासाठी शेतात सोडा. नीमची पाने शेतात पसरली असता प्रौढांना अंडी घालण्यास प्रतिबंध होतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पीक पोटरीवर येण्याच्या सुमारास, प्रादुर्भाव खूप जास्त झाल्यास (>५०%) फ्ल्युबेन्डियामाइड ०.१ मि.ली. किंवा क्लोरान्ट्रोनिलप्रोल ०.३ मि.ली. प्रति लीटर पाण्यात मिसळुन फवारणी करा. क्लोरपायरिफॉस, क्लोरँनिलिप्रोल, इनडोक्झाकार्ब, अॅझाडिरॅकटिन, गॅमा- किंवा लँब्डा सायहॅलोथ्रिन वर आधारीत इतर कीटनाशकेही मदत करु शकतील. अळ्यांच्या नियंत्रणासाठी अल्फासायपरमेथ्रिन, अॅबामेक्टिन २% हे काही इतर कीटनाशकात येतात. ज्या रसायनांनी किड्यांचे पुनरुत्थापन होऊ शकते ती न वापरण्याची काळजी घ्या.
भातावरील पाने गुंडाळणारी अळी सर्व प्रकारच्या भातशेतीत उद्भवते आणि पावसाळी हंगामात अधिक मुबलक प्रमाणात आढळते. उच्च आद्रता, शेतात जास्त सावली आणि भातशेतात तसेच आजुबाजुला गवतवर्गीय तण असणे हे उपद्रवाच्या वाढीस अनुकूल आहेत. सिंचित भातशेतीचा वाढीव भाग, एकापेक्षा जास्तवेळा भाताचे पीक घेणे आणि कीटनाशकांनी प्रेरित परत डोके वर काढणे हे किड्यांची संख्या जास्त होण्यातील महत्वाचे घटक आहेत. खतांचा जास्त उपयोग किड्यांची संख्या जलद गतीने वाढण्यात प्रोत्साहन देतो. उष्णकटिबंधातील भाताच्या शेतीत ते पूर्ण वर्षभर कार्यरत असतात तर समशीतोष्ण देशात ते मे पासुन ऑक्टोबरपर्यंत कार्यरत असतात. २५-२९ डिग्री सेल्शियसचे तापमान आणि ८०% आद्रता त्यांना अनुकूल असते. कोवळ्या आणि हिरव्या भाताच्या रोपांना गंभीर प्रादुर्भाव होतो.