Nilaparvata lugens
किडा
पिल्ले आणि प्रौढ, रोपाच्या बुडाशी आसरा घेतात आणि खोडातुन तसेच पानातुन रस शोषण करतात. रोप मरगळतात आणि पिवळी पडतात. उच्च संख्या झाल्यास ते पानांना सुरवातीला नारिंगी पिवळे करतात जी कालांतराने तपकिरी होऊन वाळतात आणि अखेरीस झाडांची मर होते. शेतात सुरवातीला लक्षणे फक्त छोट्या भागातच दिसतात पण तुडतुड्यांमुळे ती फार झपाट्याने वाढु शकतात. माद्या पानांच्या मध्य शिरेत आणि खोडात अंडी घालुन अजुन नुकसान करतात. मधाळ रसाच्या निर्मितीमुळे काळी बुरशी विकसित होते. ओंबी बारीक पडते आणि त्यातील दाणे कमी संख्येने पक्व होतात आणि दाण्यांचे वजन देखील कमी भरते.
तुडतुड्यांची संख्या कमी असल्यास जैविक उपचार केले जाऊ शकतात. वॉटर स्ट्रायडर्स, मिरीड बग्ज, कोळी आणि अंडी खाणारे विविध परजीवी वॅस्पस आणि माशा हे तपकिरी तुडतुड्यांच्या नैसर्गिक भक्षकात येतात. किड्यांचे नियंत्रण बियाणे पेरलेल्या गादी वाफ्यांवर एक पूर्ण दिवस फक्त रोपांचे शेंडे दिसतील अशा प्रकारे (बुडवुन) पाणी भरुन केले जाऊ शकते. किंवा लहान गादी वाफ्यांवर जाळीच्या सह्याने किड्यांना पकडा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर संख्या खूपच जास्त असली किंवा नैसर्गिक शत्रुंपेक्षा तुडतुड्यांची संख्या जास्त असली तरच कीटकनाशकांची शिफारस केली जाते. या उपद्रवाविरुद्ध ब्युप्रोफेझिन, पायरोमेट्रोझिन किंवा इटोफ़ेनप्रोक्स, यांची आलटुन पालटुन केलेली संयुगे यासारखी कीटनाशके वापरली जाऊ शकतात. किड्यात प्रतिकार निर्माण करण्यास आणि त्यांच्या पुनरुत्थानास अनुकूल असलेली क्लोरपायरिफॉस किंवा लँब्डा सायहॅलोथ्रिन किंवा इतर कृत्रिम पायरेथ्रॉइड संयुगे वापरण्याचे टाळा
नीलपर्वत ल्युगेन्स नावाच्या तपकिरी तुडतुड्यांमुळे नुकसान होते. कोरडवाहू व पाण्याखालील लागवडीत, ज्या शेतात सतत पाणी भरलेले, दाट सावली आणि आर्द्रता असते त्या भागातही यांचा प्रादुर्भाव जास्त होतो. झाडांची घनदाट वाढ, दाट लागवड, नत्राचा अतिरेकी वापर, हंगामाच्या सुरुवातीलाच कीटनाशकांचा केलेला वापर (ज्यामुळे नैसर्गिक शत्रुंचाही नायनाट होतो) हे सर्व किड्यांच्या वाढीसाठी अनुकूल आहे. कोरड्या हवामानात तपकिरी तुडतुड्यांची संख्या ओल्या हवामानापेक्षा जास्त असते. किड्यांचे निरीक्षण झाडांना थोडे वाकवुन केले जाऊ शकते आणि बुडावर हलकी टाच मारून ते पाण्याच्या पृष्ठभागावर पडतात का हे तपासुन केले जाऊ शकतात.