Lampides boeticus
किडा
झाडाला सर्वात जास्त नुकसान अळ्या करतात. अळ्या झाडाचे आतील भाग आणि शेंगांतील दाणे खातात. अळ्या उबुन बाहेर आल्यानंतर सुरवातीची लक्षणे म्हणजे कळ्या, फुले आणि हिरव्या शेंगांवर बारीक छिद्र दिसतात. शेंगांवरील नुकसानाची वैशिष्ट्यपूर्ण खूण म्हणजे शेंगांच्या टोकाला अळ्यांनी आत प्रवेश करण्यासाठी केलेली गोल छिद्रे विष्ठेने भरलेली निदर्शनात येतात. मधाळ स्त्राव झरणे आणि काळ्या मुंग्या त्या छिद्राच्या आजुबाजुला फिरताना दिसतात. काळी रंगहीनता शेंग किडल्याचे दर्शविते. अळ्या थेट शेंगांवर हल्ला करीत असल्याने, या उपद्रवाने उत्पादनात मोठी घट होते.
नैसर्गिक शत्रुंना शेतात सोडल्याने ह्या उपद्रवाचे परिणामकारक नियंत्रण केले जाऊ शकते. अंडी आणि अळ्यांवरील परजीवी जसे कि ट्रायकोग्रॅमा चिलोट्राए, ट्रायकोग्रॅमाटॉइडा बॅक्ट्री, कोटेशिया स्पेक्युलॅरिस, हायपरएनसिरटस ल्युकोएनेफिला आणि लिट्रोड्रोमस क्रॅसिपसचा चांगला परिणाम होऊ शकतो. उपद्रवाचे नियंत्रण करण्यासाठी जैव कीटनाशक ज्यात प्यासिलोमायसेस लिलॅसिनस आणि वेरटीसिलियम लेकानी आहे त्यांची फवारणी केली जाऊ शकते. अळ्यांच्या नियंत्रणासाठी एनएसकेइ ५% दोनदा फवारा, नंतर नीम तेल २%दराने वापरा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जैविक उपचार पद्धती जर उपलब्ध असली तर वापर करा. जर यांच्या नैसर्गिक शत्रुंना राखण्यात आले तर रसायनिक उपचारांची गरज लागणार नाही. जर कीटनाशकांची गरज लागलीच तर उत्पाद ज्यात लांब्डा-सिहॅलोथ्रिन, डेल्टामेथ्रिन आहेत त्यांची फवारणी केल्यास चवळी आणि मुगातील नियंत्रण ८० ते ९०% पर्यंत होते. इतर सक्रिय घटकात येतात इमॅमेक्टिन ५% एसजी (२२०ग्रॅ/हेक्टर) आणि इंडोक्साकार्ब १५.८% एससी (३३३ मि.ली./हेक्टर). लक्षात ठेवा कि वाटाण्यावरील निळे भुंगेरे या रसायनांविरुद्ध प्रतिकार निर्माण करु शकतील.
लँम्पिडेस बोटिकस अळ्यांनी झाडाचे मुख्यत: नुकसान होते. प्रौढ काळसर ते गडद निळ्या रंगाचे असतात आणि शरीर निळसर राखाडी लांबुळ्के असुन त्यावर निळे केस असतात. मागील पंखांच्या खालच्या बाजुला काळे ठिपके शरीराला समांतर दिसतात. पंखांच्या खालच्या बाजूला बरेच अनियमित पांढरे व तपकिरी पट्टे असून त्यांच्या कडेला तपकिरी ठिपके असतात. माद्या फिकट निळी किंवा पांढऱ्या रंगाची गोल एकेरी अंडी कळ्या, फुले, अपक्व शेंगा, वाढणारे कोंब आणि पानांवर घालतात. अळ्या फिकट हिरव्या ते तपकिरी रंगाच्या असून थोड्याशा लठ्ठ आणि दिसायला गोगलगायीसारख्या असतात. तापमानावर अवलंबून अळ्यांचा काळ २-४ अठवडे चालतो.