इतर

घेवड्याचा शेंडा पोखरणारी अळी

Epinotia aporema

किडा

थोडक्यात

  • पानांवर, कोंबांवर, कळ्या आणि फुलांवर खाल्ल्याने झालेले नुकसान दिसते.
  • वाढ खुंटते.
  • अळ्या पिवळसर ते फिकट हिरव्या शरीराच्या असुन डोके काळे असते आणि पोट, छाती मान एकत्रच असते.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

एपिनोशिया अपोरेमाच्या अळ्या रोपाच्या वनस्पतीचा भाग खातात ज्यामुळे बहुधा कोवळ्या पानांवर खाल्ल्याचे नुकसान दिसते आणि वाढ कमी होते. अळ्यांच्या खाण्यामुळे फुलांच्या कळ्यांवर गंभीर परिणाम होतो आणि बिया तयार होत नाहीत जो फोरेज लेग्युमस अल्फाल्फा आणि कमळातील महत्वाचा घटक आहे.

शिफारशी

जैविक नियंत्रण

उपलब्ध आणि प्रमाणित असल्यास एपिनोशिया अपोरेमा ग्रॅन्युलोव्हिरस (EpapGV) जैव नियंत्रणासाठी वापरा. जर अळ्यांनी ह्या विषाणूंना खाल्ले तर प्रसृत संक्रमण यजमानांच्या भागात होते. किंवा बॅसिलस थुरिंगिएनसिसना अळ्यांविरुद्ध वापरा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सर्वसामान्य कीटकनाशक वापरुन अळ्यांच्या संख्येवर नियंत्रण करा. विविध सक्रिय घटक अदलुनबदलुन वापरा आणि शेतीच्या चांगल्या सवयी बाळगा.

कशामुळे झाले

रोप उगवल्यापासुन पक्व होईपर्यंत हे किडे उपस्थित असतात. अळ्या बहुधा वनस्पतीच्या टप्प्यावर येतात, पेरणीनंतर सुमारे ३० दिवसांनी. त्या पिवळसर ते फिकट हिरव्या रंगाच्या आणि डोके काळे आणि ओटीपोटाचा वरचा भाग काळा असतो. पाठीचे कणे छोटे आणि त्वचेतुन वर आलेले दिसतात. त्यांना ३०-४० गुंफलेले पाय असतात. हवामान आणि पर्यावरण परिस्थितीप्रमाणे पूर्ण जीवनचक्र ३३-४६ दिवसांचे असते. उष्ण भागात ३१-३४ डिग्री सेल्शियस तापमान असलेल्या भागात हे किडे पूर्ण वर्षभर कार्यरत असतात जिथे ह्यांच्या ५-६ पिढ्या ह्या काळात होतात.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या रोपांचे नियमित निरीक्षण करा आणि जर खूप रोपांवर लक्षणे दिसत असली तर रोग व्यवस्थापनाचे उपाय करा.
  • कामगंध सापळे वापरा.
  • यजमान नसलेल्या पिकांबरोबर फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा