इतर

सोयाबीन खोडावरील टोका / अळी

Sternechus subsignatus

किडा

थोडक्यात

  • कोवळ्या कोंबांना वनस्पती वाढीच्या सुरवातीच्या काळात खाल्ल्याने नुकसान होते.
  • माद्या देठ आणि फांद्यांभोवती अंडी घालण्यासाठी वेढुन कुरतडतात.
  • वेढा घातलेल्या फांदीवरच्या भागात गाठी तयार होतात.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

स्टेर्नेचस सबसिग्नेटसच्या अळ्या आणि प्रौढ कोवळ्या फांदीचे भाग खातात, जास्त करुन वनस्पतीच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात. माद्या पानांचे देठ तोडतात आणि नुकसानीत भागाच्या आजुबाजुला अंडी घालण्यासाठी फांदीला वेढा घालतात आणि अंड्यांना तोडलेल्या तंतुनी आणि भागांनी झाकतात. अळ्या ऊबल्यानंतर फांदीत शिरतात आणि बहुधा एकाच ठिकाणी स्थिर राहून आतील भागांना खातात. जशा त्या मोठ्या होतात आणि फांदीच्या आत नुकसान करतात तसे फांदीला वेढा घातलेल्या जागी गाठी येतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ह्या उपद्रवाविरुद्ध कोणतेही जैव नियंत्रण आजतागायत तपशीलात नाही.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अळ्या खोडात आणि जमिनीत असण्याच्या काळात (३० दिवस) रसायनिक उपचार वापरुन लोकसंख्येचे नियंत्रण करणे शक्य आहे. बियाणे आणि पानांवरील कीटनाशक वापरानेही पीकाचे संरक्षण होते पण ते फक्त थोड्या काळासाठीस असते, कारण प्रौढ सतत बाहेर येत असल्याने पीकावर झटकन पुन:संक्रमण होत रहाते.

कशामुळे झाले

स्टर्नेचस सबसिग्नेटस रोपाच्या वाढीच्या सुरवातीपासुन ते काढणीपर्यंत सक्रिय असतात. किडे मधल्या काळात, (जेव्हा सोयाबीनची रोपे उपलब्ध नसतात) जमिनीत रहातात. काढणीच्या वेळेपूर्वी अळ्या जमिनीवर पडतात आणि मातीच्या कणांनी केलेल्या घरट्यात सुप्तावस्थेत जातात. प्रौढ जमिनीतुन हळुहळु फार काळापर्यंत बाहेर येत रहातात. प्रौढ, अळ्या आणि अंडी या जीवनावस्थांच्या आयुष्यकालामुळे एकाच रोपावर किंवा भागात एकाच वेळी दिसतात.


प्रतिबंधक उपाय

  • किड्यांची लोकसंख्या कमी करण्यासाठी गवती जातीच्या पीकांशी फेरबदल करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा