Dicladispa armigera
किडा
प्रौढ भुंगेरे पानांच्या वरचे हिरवट भाग खातात ज्यामुळे मध्य शिरेच्या बाजुने वैशिष्ट्यपूर्ण पांढरे, समांतर पट्टे दिसतात. गंभीर प्रादुर्भाव झाल्यास शिरांवरही परिणाम होतो, ज्यामुळे मोठे पांढरे धब्बे दिसतात. भुंगेरे नुकसान झालेल्या पानांवर वरच्या बाजुला उपस्थित असतात. अळ्या पानाच्या दोन बाजुच्या सालीमधील भाग मध्य शिरेच्या बाजुने बोगदे करुन खातात ज्यामुळे पांढरे धब्बे दिसतात. प्रादुर्भावग्रस्त पान जर प्रकाशासमोर धरले असता किंवा बोगद्यावरुन बोट फिरविले असता या अळ्यांना पाहता येते. प्रभावित पाने वाळतात आणि शेतात पांढरी क्षेत्र दिसतात. दुरुन पाहिल्यास गंभीर नुकसान झालेली शेते करपल्यासारखी दिसतात.
ह्या उपद्रवावरील जैविक उपचारांचे अभ्यास चालू आहेत. अळ्या खाणारा परजीवी युलोफस फेमोरॅलिसला बांगलादेशात आणि भारतात शेतात सोडल्याने या भागातील हिस्पा किडीची समस्या थोडी कमी झालेली दिसते. स्थानिक नैसर्गिक शत्रुंची राखणही ह्या उपद्रवाच्या व्यवस्थापनात महत्वाची भूमिका निभावते. उदा. काही छोटे वॅस्पस अंडी आणि अळ्यांवर हल्ला करतात आणि रिड्युविड बग जे प्रौढांना खातात. बुरशीचेही तीन प्रकारचे जंतु आहेत जे प्रौढांवर हल्ला करतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. गंभीर लागण झाल्यास, बरीचशी रसायनिक द्रावणे ज्यात खाली दिलेले सक्रिय घटक आहे, त्यांचा वापर करुन किड्यांच्या संख्येचे नियंत्रण केले जाऊ शकते: क्लोरोपायरिफॉस, मॅलेथियॉन, सायपरमेथ्रिन, फेनथोएट.
डिक्लॅडिस्पा आर्मिगेरा नावाच्या भातावरील करपा किडीच्या प्रौढ आणि अळ्यांमुळे नुकसान होते. प्रौढ भुंगेरे पानांच्या पातीच्या वरचा पृष्ठभाग खरवडतात आणि फक्त खालचे थर शिल्लक ठेवतात. अंडी कोवळ्या पानांवरील बहुधा टोकांवरील बारीक चिरात घातली जातात. पिल्ले पांढरी पिवळट आणि चपटी असतात. ती पानांच्या मध्य शिरांना समांतर बोगदे करुन आतील भाग खातात आणि आतच कोषात जातात. प्रौढ भुंगेरे काहीशा चौकोनी आकाराचे, साधारण ३-५ मि.मी. लांबी आणि रुंदीचे असतात. त्यांचा रंग गडद निळा किंवा काळसर असतो आणि शरीरभर काटे पसरलेले असतात. गवती तण, खतांचा जास्त वापर, जास्त पाऊस आणि सापेक्ष उच्च आद्रता भातावरील हिस्पा किडीच्या उपद्रवास अनुकूल असतात.