Leptocorisa spp.
किडा
भाताच्या दाण्यांच्या वाढीच्या टप्प्यावर अवलंबून, उपद्रवाचे परिणाम पोकळ दाणे किंवा लहान, आक्रसलेले, ठिपकेदार रंगहीनता असलेले, विकृत आकाराच्या दाण्यांच्या रुपात आढळू शकतात. काही वेळा घाणेरडा वासही येतो. कणस ताठरतात.
सुगंधी (जसे कि लेमनग्रास) साबणाच्या द्रावणाची फवारणी करून भातावरील भुंगेर्यांना पळवुन लावता येते. भातावरील भुंगेरे आकर्षित करण्यासाठी आणि त्यास मारण्यासाठी शेताच्या जवळ "प्रहोक" (कंबोडिया मध्ये स्थानिक 'चीज') वापरा. पहाटे किंवा संध्याकाळी भुंगेर्यांना जाळीच्या मदतीने पकडून ठेचून पाण्यात मिश्रित करून फवारणी करा म्हणजे भातावरील भुंगेरे पळुन जातील. जैव नियंत्रक घटकांना प्रोत्साहन द्या: काही वॅस्पस, ग्रासहॉपर्स आणि कोळी भातावरील भुंगेर्यांवर किंवा त्यांच्या अंड्यांवर हल्ला करतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अॅबामेक्टिन किंवा क्लोरपायरिफॉस सारख्या कीटकनाशकांचा वापर संध्याकाळी, शेताच्या कडेने सुरवात करुन गोलाकार पद्धतीने मध्यापर्यंत करावा. ह्यामुळे किडे मध्यावर गोळा होतात आणि त्यांचा प्रभावीपणे नायनाट करणे शक्य असते. कीटकनाशके वापरण्याच्या फायद्यांची तुलना स्वास्थ्य आणि पर्यावरणाला असणार्या जोखिमींशी केली पाहिजे. क्लोरपायरिफॉस ५० इसी २.५ मि.ली + डायक्लोर्व्होस १ मि.ली./ली प्रमाणे संध्याकाळच्या वेळी शेताच्या बांधापासुन सुरु करुन मध्यापर्यंत गोलाकार फवारावे. ह्यामुळे किडे मध्यावर गोळा होतात आणि त्यांचा प्रभावीपणे नायनाट करता येते. वैकल्पिकरीत्या आपण अॅबामेक्टिनचाही वापर करु शकता. किटनाशकांचा अवास्तव वापर केल्याने नैसर्गिक जैव नियंत्रण बिघडते ज्यामुळे किडींचा उपद्रव परत डोके वर काढतो.
भातावरील भुंगेरे दाणे भरण्याच्या वेळेसच क्वचितच उद्भवतात आणि संध्याकाळच्या वेळी घाणेरडा वास सोडतात. ते भातशेतीतील सर्व वातावरणात आढळतात. भाताच्या शेताजवळील तणांचे भाग, जंगले, कालव्याच्या बाजुचे जंगली गवत आणि स्टॅगर्ड भाताची लागवड या भुंगेर्यांच्या संख्या वाढीला अनुकूल आहे. पावसाळ्यात पाऊस सुरु झाला कि हे फारच सक्रिय होतात. उबदार हवामान, ढगाळ वातावरण आणि वारंवार रिमझिम पाऊस ह्यांच्या लोकसंख्यावाढीस पूरक असतो. कोरड्या मोसमात ते कमी सक्रिय असतात. जंतुजन्य कणसावरील करप्याच्या नुकसानासारखीच ह्याची लक्षणेही दिसतात.