द्वीदल धान्य

घेवडा पिकाच्या पानांवरील भुंगे

Cerotoma trifurcata

किडा

थोडक्यात

  • मुळे आणि मुळांच्या जोडांवर, पानांवर आणि विकसित होणार्‍या शेंगावर खाल्ल्याने नुकसान दिसते.
  • अळ्यांनी केलेली छोटी छिद्रे पानांवर दिसतात.
  • शेंगाही ओरबडल्यासारख्या दिसतात.
  • उत्पन्न आणि दाण्यांची प्रत कमी भरते.
  • भुंगे गडद पिवळे ते लाल रंगाचे असुन पंखांवर आयताकृती चिन्हे दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते


द्वीदल धान्य

लक्षणे

अळ्या आणि प्रौढ मुळांचे जोड, खोलगट भाग, पाने, (बहुधा खालची बाजू) आणि शेंगा खातात. मुळे आणि वाहक भागांत जखमा झाल्याने नत्राचे केंद्रीकरण कमी होते. पानाच्या पात्यांना झालेले नुकसान छोटी, जवळपास गोलाकार छिद्रे पूर्ण पानावर विखुरलेल्या रुपात दिसते. खाल्लेल्या शेंगा खरचटल्यासारख्या दिसतात. शेंगांना खाल्ल्याने झालेल्या नुकसानामुळे उत्पन्न आणि बियाणांची प्रत कमी होते. नुकसानीत शेंगात बुरशी आणि जंतुंसारखे सूक्ष्म जीव घर करतात. जर चेरोटोमा ट्रिफ्युर्काटा हंगामात लवकर झाला तर अंकुरलेल्या रोपांना जखमा होतात, पानगळ होते आणि बियाणे रंगहीन होतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

सध्यातरी ह्या उपद्रवाचे कोणतेही परिणामकारक जैव नियंत्रण माहितीत नाही.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर नुकसानामुळे उत्पन्न फारच कमी होणार असेल तरच रसायने वापरायचा विचार करा. पायरेथ्रॉइड, लँब्डा-सिहॅलोथ्रिन किंवा डायमिथोएट गटातील कीटनाशक वापरुन उपद्रवाची लोकसंख्या कमी करता येते.

कशामुळे झाले

प्रौढ सुमारे ६ मि.मी. लांब, आणि गडद पिवळे ते लाल रंगाचे असतात. त्यांच्या पंखांवर वैशिष्ट्यपूर्ण आयताकार चिन्हे असतात आणि मानेच्या भागात काळे त्रिकोण असतात. प्रौढ माद्या रोपाच्या खोडाजवळील जमिनीच्या वरच्या २ इंच थरात अंडी घालतात. एक मादी सुमारे १२५ ते २५० अंडी तिच्या पूर्ण जीवनात घालते. जमिनीच्या तापमानाप्रमाणे अंडी सुमारे ४ ते १४ दिवसात ऊबतात. अळ्या पांढर्‍या रंगाच्या असुन गडद तपकिरी किंवा काळे डोके असते. सोयाबीन शेताच्या आजुबाजुला विविध निवासस्थानात प्रौढ सुप्तावस्थेत जातात. शेंगवर्गीय पानांवरील भुंगे भरपूर प्रकारच्या विषाणूंचे वाहकही आहेत.


प्रतिबंधक उपाय

  • नुकसान टाळण्यासाठी उशीरा लागवड करा.
  • किडे मोजा आणि हंगामात लवकर रोपाचे नुकसान परखा.
  • ओळींमध्ये जाळी लावल्यास किड्यांना अडथळा होतो.
  • खोल नांगरा आणि इतर शेंगावर्गीय पिके जवळपास लावणे टाळा.
  • मोठ्या प्रमाणावर पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा