इतर

घेवडा वरील सुरवंट

Anticarsia gemmatalis

किडा

थोडक्यात

  • झाडीला आणि पूर्ण पानांना खाल्ल्याने नुकसान होते.
  • कळ्या, लहान शेंगा आणि फांद्या यांना देखील खाल्याने नुकसान होते.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

वेल्व्हेटबीन पतंगाचे सुरवंट यजमानांच्या पानांवर हल्ला करतात. पहिल्यांदा लहान अळ्या कोवळे मऊ भाग खातात. मोठ्या अळ्या शिरांसकट पूर्ण पान खातात व कालांतराने अळ्या, कळ्या, लहान शेंगा आणि फांद्या खातात. त्या बहुधा रात्रीच्या वेळी सक्रिय असतात. ते फार मोठ्या संख्येने येतात आणि जर नियंत्रण केले गेले नाही तर घेवडा किंवा इतर शेंगवर्गीय पीकांना एका अठवड्याच्या आत पूर्णपणे उध्वस्त करतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

युप्लेक्ट्रस पुट्लेरी आणि मेटियोरस ऑटोग्राफे सारख्या परजीवी वॅस्पसच्या बऱ्याच प्रजाती वेल्व्हेटबीन पतंगचे नैसर्गिक भक्षक आहेत, त्यांचा वापर करावा. जमिनीवरील भुंगे, लाल आग्या मुंग्या किंवा टॅचिनिड माशा विंथेमिया रुफोपिक्टा हे इतर भक्षकात पाहिले गेले आहेत. पक्षी, बेडुक आणि उंदीर सारखे कणा असणारे भक्षक देखील वेल्व्हेटबीन सुरवंटची संख्या कमी करतात. किंवा बॅसिलस थुरिंगिएनसिस सारखे जंतु वापरुन देखील वेल्व्हेटबीन सुरवंटची संख्या कमी करता येते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. या उपद्रवाचे नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकांचा प्रतिबंधक वापर चांगले परिणाम देतो.

कशामुळे झाले

अँटिकारसिया गेमाटालिसच्या प्रौढ पतंगांच्या पंखांचा पल्ला ३०-४० मि.मी. लांबीचा असतो. पुढचे पंख राखाडी ते फिकट पिवळसर तपकिरी किंवा गडद लालसर तपकिरी असतात. पाठचे पंख फिकट तपकिरी असुन त्यावर कडांजवळ फिकट रंगांच्या ठिपक्यांच्या ओळी असतात. पूर्ण पंखांना छेदणारी गडद रंगाची रेषा दोन्ही पंख पूर्ण पसरल्यावर दिसते. अंडी किंचित अंडाकृती, उंच सखल भागांची आणि ऊबण्याच्या थोड आधीपर्यंत पांढरी असतात, ऊबण्याच्या वेळी ती गुलाबी होतात. ती एकेकटी पानांच्या खालच्या बाजुला घातली जातात. ३-७ दिवसात अंडी ऊबुन बाहेर येणार्‍या अळ्या त्या अंड्याच्या टरफलालाच खातात. वे॑ल्व्हेटबीन पतंगच्या अळ्या त्यांच्या वेगवेगळ्या जीवन टप्प्यात वेगवेगळे रंग आणि चिन्ह असलेल्या असू शकतात. कोवळ्या अळ्यांची काही वेळेस सोयाबीनवरील तुडतुड्याशी (स्युडोप्लुसिया इन्क्लुडेन्स) गल्लत होते. कोषात जाण्याआधी अळ्या आक्रसुन सुमारे २५ मि.मी. लांबीच्या आणि महोगनी लाकडाच्या तपकिरी रंगाच्या होतात. कोष फिकट हिरव्यापासुन ते तपकिरी रंगापर्यंत बदलतात आणि सुमारे २० मि.मी. लांब असतात. ते जमिनीच्या पृष्ठभागाखालीच असतात. उन्हाळ्यात जीवनचक्र पूर्ण होण्यास सुमारे ४ अठवडे पुरतात. जेव्हा तापमान कमी होते तेव्हा जीवनचक्र पूर्ण होण्यास जास्त वेळ लागतो. एका वर्षात किती पिढ्या होतील हे प्रदेशांप्रमाणे बदलते.


प्रतिबंधक उपाय

  • संवेदनक्षम वाण लावा.
  • लवकर तयार होणारे वाण निवडा.
  • लवकर काढणी करण्यासाठी लवकर लागवड करा.
  • झाडांचे काळजीपूर्वक निरीक्षण करुन किड्यांची संख्या कीट व्यवस्थापनाचे उपाय करण्याइतकी आहे का ते तपासा.
  • कामगंध सापळे वापरा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा