भात

भातावरील पिवळा खोड किडा

Scirpophaga incertulas

किडा

थोडक्यात

  • फांद्यांवर आणि नविन कोंब उगवण्याच्या जागी अळ्यांनी उपद्रव केल्याने कांड्यावर गाभा जळणे आढळते.
  • प्रादुर्भावग्रस्त खोड आणि कांड्यावर बारीक छिद्र आणि विष्ठा आढळून येते.
  • पानाच्या पात्याच्या टोकावर अंड्यांच्या पुंजक्यांचे अंडाकृती धब्बे दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

किडीचा प्रादुर्भाव जर रोपाच्या बुडाशी झाला तर मधला गाभा वरून खाली सुकत येतो, याला 'गाभा जळणे' असे म्हणतात आणि दाणे न भरलेल्या पांढऱ्या ओंब्या बाहेर पडतात, त्याला 'पळीज' म्हणतात. उबुन बाहेर आल्यानंतर अळ्या पानात छिद्रे करुन शिरतात आणि कांड्याचे आतील भाग खातात. प्रादुर्भावग्रस्त खोड आणि कांड्यावर बारीक छिद्र आणि विष्ठा आढळून येते. अळ्या एका पेऱ्यातून दुसऱ्या पेऱ्यात जाऊन उपद्रव करतात. वाढीच्या काळात अळ्यांनी वारंवार खाल्ल्याने दृष्य असे जास्त नुकसान होत नाही कारण झाड ती उणीव नविन कांड्या उत्पादन करून भरुन काढते पण यासाठी जास्त उर्जा खर्च होते ज्यामुळे उत्पादनात घट होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

उपचारात येतात जीवाणू आणि बुरशी असणारे उत्पाद जे अळ्यांवर (खोडात शिरण्यापूर्वी) परिणाम करतात. निंबोळी अर्क देखील या हेतुसाठी (१५ मि.ली/ली पाणी) वापरला जाऊ शकतो. प्रकाश सापळे वापरुन पतंगांना आकर्षित केले जाऊ शकते. रोपणीनंतर १५ दिवसांनी कामगंध सापळे किंवा मास सापळे (क्रमश: ८/एकरी किंवा ३/एकरी दराने) वापरावेत. रोपणीनंतर यांना २५, ४६ आणि ५७ व्या दिवशी बदलावे. अखेरीस अंड्यावर परजीवीपणा करणारे ट्रायकोग्रामा जापोनिकम (१००,०००/हे) चे ५ ते ६ साचे, पेरणीनंतर १५ दिवसांनी सोडावेत. नैसर्गिक भक्षक आणि परजीवीही खूप आहेत आणि त्यात मुंग्या, बीटल्स, नाकतोडे, माशा, वॅस्पस, सूत्रकृमी, कोळी, इयरविग्ज, पक्षी, चतुर, डॅमसेल माशा आणि कोळी यांच्या अनेक प्रजाती येतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. लागवडीपूर्वी रोपांच्या मुळांना ०.०२% क्लोरपायरिफॉस मध्ये १२-१४ तास बुडवुन ठेवणे (खोड किड्यापासुन ३० दिवसांपर्यंत संरक्षण मिळते) हे प्रतिबंधक उपचारात येते. फिप्रोनिल ०.३६ (२५ किलो/हे), क्लोरपायरिफॉस किंवा क्लोरपायरिफॉस मिथिल १० ग्रॅ (१० किलो/हे) किंवा क्लोरँट्रानिलिप्रोल १० किलो/हे याप्रमाणे दाणेदार कीटनाशके वापरावीत. जर (२५-३० नर पतंग/सापळा/अठवडा) सीमा ओलांडली गेली तर क्लोरपायरिफॉस २० इसी किंवा (२००० मि.ली/हे) किंवा फिप्रोनिल ५ एससी (८०० मि.ली/हे) किंवा क्लोरँट्रानिलिप्रोल (०,३ मि.ली./ली) ची फवारणी करावी. विस्तृत श्रेणीच्या कीटनाशकांचा वापर उपद्रवासाठी करु नका.

कशामुळे झाले

स्किर्पोफेगा इन्सर्ट्युलाज नावाच्या पिवळ्या खोडकिड्याच्या अळ्यांमुळे नुकसान होते जो पाण्याने भरलेल्या भातशेतीवरील उपद्रव आहे. हे जलीय वातावरणात जेथे सतत पाणी भरलेले राहते तिथल्या धसकटावरच्या पानांवर किंवा रोपांवर आढळतात. छोट्या अळ्या स्वत:ला पानात गुंडाळुन घेतात मग पानापासुन वेगळी होउन खाली पडतात. तिथुन ती नविन कांड्यावर चिटकून खोडात छिद्र करुन प्रवेश करते. नत्रचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनी यांना खूप अनुकूल असतात. हंगामात उशिरा लागवड केलेल्या शेतात या किड्यांचा उपद्रव जास्त होतो कारण त्यांची संख्या आधी लागवड केलेल्या शेतातुन वाढलेली असते. तुलनेसाठी लवकर लागवड केलेल्या भातशेतीत अळ्या सुमारे २०% उत्पादनाचे नुकसान करतात तर उशीरा लगवड केलेल्या भातशेतीत ८०% नुकसान होते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक वाण लावा.
  • जास्त नुकसान टाळण्यासाठी हंगामात लवकर पेरणी करा.
  • शेजारच्या शेतकर्‍यांबरोबरच रोपणी करा.
  • रोपणीपूर्वी अंड्यांचे वहन न होण्यासाठी पानांचे शेंडे कापा.
  • दाट लागवड टाळा.
  • रोपवाटिका आणि शेतात नियमित लक्ष ठेवा.
  • लागवडीच्या वेळेस रोपवाटीकेतील आढळून आलेले अंड्याचे पुंजके वेचून नष्ट करा.
  • रोपणीनंतर १५ दिवसांनी कामगंध सापळे किंवा मोठ्या संख्येने पकडण्याचे सापळे (३ प्रति एकरी किंवा ८ प्रति एकरी, क्रमश:) लावावेत.
  • शेतातील आणि आजुबाजुचे तण आणि स्वयंभू रोपे नियंत्रित करा.
  • संक्रमित रोपे उपटुन नष्ट करा.
  • खते हंगामात विभागुन द्या.
  • अंड्यांचा नाश करण्यासाठी ठराविक कालांतराने सिंचनाच्या पाण्याची पातळी वाढवा.
  • नत्रयुक्त खते आणि शेणखताचा उपयोग सीमित करा.
  • विस्तृत श्रेणीची कीटनाशके वापरु नका.
  • कापणी जमिनीलगत करा व धसकटातील अळ्या काढुन नष्ट करा.
  • काढणीनंतर धसकटे आणि रोपांचे अवशेष नष्ट करा.
  • काढणीनंतर उरलेल्या अळ्यांना बुडवुन मारण्यासाठी नांगरणी करून पाणी भरा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा