ऊस

लवकर येणारा खोडकिडा

Chilo infuscatellus

किडा

थोडक्यात

  • खोडांवर आणि पानांवर खाल्ल्याने नुकसान होते.
  • कोवळ्या रोपात आतील भाग नासतो.
  • नुकसान झालेल्या कांड्यातुन घाणेरडा वास येतो.
  • प्रौढांचे शरीर गव्हाळ असते, गवती रंगाचे पुढील पंख आणि पांढुरके पाठचे पंख असतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

ऊस

लक्षणे

सफेद चपटी अंडी सुमारे ६० च्या गुच्छाने ३-५ ओळीत पर्णकोषाच्या खालच्या पृष्ठभागावर सापडतात. तरुणअळ्या पानांत छोटी छिद्रे करतात, खास करुन पर्णकोषात. मोठ्या अळ्या खोडाच्या बुडाशी भोके पाडतात, रोपाच्या आत शिरुन आतील भाग खातात ज्यामुळे रोपाचा आतील भाग नासतो. संक्रमित रोपाच्या पानाच्या मध्यभाग सुकतो. संक्रमित पेशींमधुन घाणेरडा वास सुटतो. खोडकिडा सांध्यामधल्या जागेत भोके पाडतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पेरणीनंतर पहिल्या महिन्यात अंडी खाणारे परजीवी ट्रिकोग्रामा चिलोनिसना सात ते दहा दिवसांच्या अंतराने पीक घेण्याच्या एक महिना आधीपर्यंत शेतात सोडा. पेरणीनंतर ३०-४५ दिवसांनी स्टरमियोप्सि इनफेरेन्सच्या माद्यांना शेतात सोडा. किंवा पीक वाढीच्या ३०व्या, ४५व्या आणि ६०व्या दिवशी ऊसाच्या खोडकिड्याचे ग्रॅन्युलोसिस रोगजंतु आठ ते दहा रोगजंतुंच्या केंद्रीकरणाचे प्रति मिलीलीटरमध्ये घालुन वापरावे. रोगजंतुंना संध्याकाळी सिंचन केल्यानंतर वापरले पाहिजे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कीटनाशकांची गरज भासल्यास क्लोरॅन्ट्रानिलोप्रोल, फिप्रोनिल किंवा क्विनॅलफॉस असणार्‍या उत्पादांचे फवारे मारावेत. पेरणीच्या वेळी आणी वाढीच्या काळात कार्टाप हायड्रोक्लोराइडची खडी वापरली असताही संक्रमण कमी होते.

कशामुळे झाले

१-३ महिन्यांची पीके जास्त संवेदनशील असतात. माद्या पांढरी चपटी अंडी सुमारे ६० च्या गुच्छाने तीन ते पाच ओळीत पर्णकोषाच्या खालच्या पृष्ठभागावर घालतात. एक ते सहा दिवसात अळ्या बाहेर येऊन सगळीकडे पसरतात आणि खोडात जमिनीला लागुन भोके पाडुन आत शिरतात. अशाच तर्‍हेने अळ्या पुष्कळशा कोंबांवर हल्ला करतात. २५ ते ३० दिवसात त्यांची वाढ पूर्ण होते आणि खोडात त्या कोषात जातात. प्रौढ पतंग सहा ते आठ दिवसांनी बाहेर येतो. एकुण जीवनचक्र ३५ ते ४० दिवसांत पूर्ण होते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिरोधक किंवा सहनशील वाण लावा.
  • पर्यायी यजमान (श्वाँक, डब गवत, मका) ऊसाच्या शेताजवळ लावु नका.
  • संक्रमण टाळण्यासाठी मोसमात लवकर पेरणी करा.
  • कामगंध सापळे किंवा प्रकाश सापळे वापरुन पकडा.
  • पीक घेतल्यानंतर सुकलेली पाने आणि रोपाचे अवशेष काढुन नष्ट करा.
  • हिरवे चणे, काळे चणे, डाइन्चा (अगाथी)ची आंतरपीके घेतल्यानेही प्रौढांना प्रतिबंध करण्यास मदत होते.
  • नत्र खतांचा जास्त वापर टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा