ऊस

ऊसावरील कांडीकीड

Diatraea saccharalis

किडा

थोडक्यात

  • ऊसावरील कांडीकीड उसाच्या खोडांतील पेशींना खाते.
  • अखेरीस पूर्ण रोपावरच टोचल्याची छिद्रे सापडतात.
  • प्रौढ रोपे जमिनदोस्त होतात किंवा तुटतात.

मध्ये देखील मिळू शकते


ऊस

लक्षणे

"पिनहोल" (अतिशय लहान छिद्रे) आणि खोडांवरील छिद्रेही अळ्यांनी खाण्याच्या नुकसानाने दिसतात. कोवळ्या रोपात खोडाचा आतील भाग खाल्ला जातो ह्या लक्षणाला मृत हृदय असे म्हणतात. जुन्या रोपांवर लहान अळ्या स्वत:ला पर्णकोषात आणि अॅक्झिलमध्ये छिद्रे करुन आत शिरवितात. जशा अळ्या मोठ्या होतात त्या खोडात बोगदे करायला लागतात. जास्त लागण झालेली रोपे अशक्त होतात आणि त्यांची वाढ खुंटते, आणि जेव्हा हवामान अनुकूल नसते तेव्हा अखेरीस तुटतात किंवा जमिनदोस्त होतात. शेवटी पूर्ण रोपावरच छिद्रे दिसतात आणि पीक कमी येते आणि रसाची प्रतही कमी भरते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ऊसाच्या बियाणाला २५.६ डिग्री सेल्शियस तापमानाच्या पाण्यात ७२ तासांपर्यंत भिजवुन ठेवा ज्याने २७-१००% कांडीकीडीची अंडी मरतील. ह्या उपचारानंतर रुजण्यावर परिणाम होत नाही आणि भिजविलेल्या ऊसामुळे चांगल्या कांड्या येतात. डी. सॅचॅरालिसची लोकसंख्या विविध परजीवी आणि शिकार्‍यांद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते. मुंग्यांचा खास करुन लाल आग्या मुंग्यांचा सोलेनोप्सिस इनव्हिक्टाचा वापर करा. किंवा ट्रिकोग्रॅमा परजीवी वॅस्पसच्या जातींचा वापर करुन अंड्याची संख्या कमी करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. शेताचे आर्थिक नुकसान होऊ शकेल अशा ह्यांच्या जास्त संख्येसाठी निरीक्षण करा. क्लोरान्ट्रानिलिप्रोल, फ्ल्युबेनडियामाइड असणारी कीटनाशके किंवा कीड वाढ नियंत्रकांचा वापर जुन्या अळ्यांना खोडात बोगदे बनविण्यापासुन प्रतिबंध करण्यासाठी केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

ह्यांच्या जीवनचक्राची लांबी ही हवामानावर अवलंबुन असते. अळ्यांना वाढीसाठी उष्ण हवामानात २५ ते ३० दिवस लागतात आणि थंड हवामानात ५ दिवस जास्त लागतात. थंडीच्या मोसमातील जास्त पाऊस आणि कमी तापमानात कांडीकीडीची लोकसंख्या कमी होते. न नांगरता केलेली शेती ह्या कीड्यांना पीकाच्या अवशेषात सुप्तावस्थेत रहाण्यास सहाय्य करते. ह्यांचे नैसर्गिक शिकारी नाहीत. नत्र खताचे उच्च दरही ह्यांच्या जगण्यास अनुकूल असतात.


प्रतिबंधक उपाय

  • सहनशील आणि प्रतिरोधक वाण लावा.
  • कांडीकीडीने नुकसान केलेले ऊसाचे बियाणे वापरणे टाळा.
  • जमिनीत सिलिकॉन घाला ज्यामुळे कांडीकीडीचे जगणे आणि जखमा कमी होतील.
  • पीक घेण्यापूर्वी ऊस जाळा ज्यामुळे ह्या कांडीकीडीची लोकसंख्या कमी होईल.
  • पीक घेतल्यानंतर झटकन पीकाचे अवशेष जाळुन, डिस्किंगने किंवा पाणी भरुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा