Hylesinus toranio
किडा
खोडाच्या किंवा फांद्यांच्या सालीवर छिद्रे असणे, रंगहीनता आणि खोल फटी दिसणे ही विशेष लक्षणे आहेत. जर ह्या छिद्रांजवळच्या सालीला कापुन काढले तर आतील लाकडात अगदी सालीच्या खाली केलेले भरपूर बोगदे नजरेस पडतात. लालसर छटा किंवा गॅलरीज असणार्या ठिकाणी कँकर्सची उपस्थिती ही साल कुजण्याची लक्षणे दर्शवितात. प्रभावित फांद्यातुन हळुहळु जोम कमी होत जातो, वाळतात आणि रोपे अशक्त होतात. सशक्त झाडासाठी बहुधा खाण्याच्या जागा जास्त नुकसानदायक नसतात पण त्यामुळे ज्या फांद्या बु्रशीमुळे किंवा इतर ताणामुळे आधीच अशक्त झालेल्या असतात त्या मरतात. हा ऑलिव्ह झाडावरील मोठा उपद्रव नाही आहे पण ह्यामुळे तरीही चांगलेच नुकसान होऊ शकते.
ऑलिव्हला पोखरणार्यांची लोकसंख्या कमी करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन म्हणुन चेइरोपॅचस क्वाँड्रम, रॅफिटेलस मॅक्युलेटस किंवा युरिटोमा मोरियो सारख्या परजीवी वॅस्पसच्या प्रजातींना बागेत सोडले जाऊ शकते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ऑरगॅनो फॉस्फेट कीटनाशक डायमेथोएटचे फवारे जेव्हा प्रौढ लाकडात असतात तेव्हाच क्षेत्रियरीत्या मारले जाऊ शकतात. ह्या उपचारांमुळे मित्र किड्यांवरही प्रभाव पडु शकतो म्हणुन काळजी घ्यावी.
हिलेसिनस टोरानियो नावाच्या बीटलमुळे ऑलिव्ह झाडावर लक्षणे उद्भवतात. ह्या किड्यांच्या अळ्या झायलोफॅगस म्हणजे सालीच्या खालुन आतील रसाळ लाकडाला खातात. प्रौढ निस्तेज काळे किंवा गडद हिरव्या रंगाचे असतात, दोन नारिंगी मिशा असतात आणि पिवळ्या चामड्यासारख्या केसाळ ओळी पाठीवर असतात. माद्या बहुधा अशक्त झाड शोधुन सालीत छिद्र करुन रसाळ लाकडात पोखरतात. ह्या मुख्य गॅलरीच्या बाजुने अंडी घातली जातात. ऊबल्यानंतर अळ्या मुख्य गॅलरीला काटकोनात छोटे अरुंद बोगदे पोखरतात. झाडाच्या वहनप्रणालीच्या भागांना नुकसान झाल्यामुळे पोषके आणि पाण्याचे वहन होत नाही ज्यामुळे फांद्या वाळतात आणि फळे गळतात. संक्रमणामुळे झाडे आणखीन अशक्त होतात ज्यामुळे बागेला उतरती कळा लागते. ह्याचे पर्यायी यजमान ओक, अॅश, बीच, अक्रोड आणि पाईनची झाडे आहेत.