ऑलिव्ह

ऑलिव्ह झाडाच्या सालीवरील भुंगा

Phloeotribus scarabaeoides

किडा

थोडक्यात

  • झाडाच्या सालीत आत शिरल्याची छिद्रे दिसतात.
  • सालीच्या खालुन, लागुन गेलेले बोगदे असतात.
  • काटक्या आणि फांद्या वेढल्या जाऊन वाळतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
ऑलिव्ह

ऑलिव्ह

लक्षणे

प्रौढ माद्या झाडाच्या सालीत अनेक छिद्र करतात आणि कोणत्याही एका छिद्राच्या कोणत्याही बाजुने सालीच्या थेट खाली पोखरुन बोगदे करतात. काटकी किंवा फांदीच्या आतच माद्या सुमारे ६० पर्यंत अंडी घालतात, आणि ती अंडी ऊबताच अळ्या, वर किंवा खाली परत पोखरुन आतील मांसल भागापर्यंत पोचतात. जर ह्या छिद्रांजवळची साल कापली तर हे सर्व स्पष्ट दिसते. खाण्याच्या ह्या क्रियेमुळे काटकी किंवा फांदी पूर्ण वेढली जाते ज्यामुळे काटकी किंवा फांदीची मूलभूत रचना कमकुवत होते तसेच वाहक भागांनाही नुकसान होते. अळ्या ह्या खाण्याच्या बोगद्यात राहूनच कोषात जातात. ऑलिव्ह व्यतिरिक्त हे भुंगे ओलँडर (नेरियम ओलँडर), क्वचित अॅश (फ्रॅक्झिनस एक्सेलशियर) आणि लिलॅक (सिरिंगा व्हलगॅरिस)ला ही खातात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पुष्कळशा कुटुंबातील असंख्य प्रजातींचे परजीवी वॅस्पस भुंग्यांचे भक्षक आहेत. ह्यातील कोणत्याही एका प्रजातीचा उपयोग नियंत्रणासाठी करताना प्रत्येक वर्षी मिळणारा नियंत्रण प्रभाव विभिन्न असतो. ऑलिव्ह झाडाच्या सालीवरील भुंग्यांचा प्रबळ नैसर्गिक शत्रु हा चेइरोपॅचस क्वाड्रम नावाचा परजीवी वॅस्प आहे जो भुंग्यांची लोकसंख्या ३०-५०%नी कमी करु शकतो. पायरेथ्रॉइडसवर आधारीत कीटकनाशकांच्या वापराने ह्या नैसर्गिक शत्रुंवर विपरित परिणाम होऊ शकतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. इथिलिनवर आधारीत कामगंध सापळे वापरुन भुंग्यांना आकर्षित करण्याची शिफारस केली जाते. डेल्टामेथ्रिन सारख्या पायरेथ्रॉइडसवर आधारीत कीटकनाशकांच्या वापराने भुंग्यांची लोकसंख्या खूप कमी होते असे सिद्ध झाले आहे. दोन्ही पद्धतींना एकीकृत दृष्टीकोनाचा भाग म्हणुन वापरल्यास चांगले परिणाम मिळतात.

कशामुळे झाले

ऑलिव्ह झाडाच्या सालीवरील भुंग्यामुळे लक्षणे उद्भवतात, ज्यांच्या, हवामान परिस्थितीप्रमाणे प्रति वर्षी २-४ पिढ्या निर्माण होतात. वसंत ऋतु आणि उन्हाळ्याच्या सुरवातीला प्रौढ, जिवंत झाडांऐवजी छाटणी केलेल्या फांद्यांवर आणि ऑलिव्हच्या जळणीसाठी रचलेल्या लाकडांवर अंडी घालतात. अळ्या झायलोफॅगल म्हणजेच फक्त लाकुड खाणार्‍या असतात. किडी स्थानिकरीत्या उडुन नविन लागवडीच्या भागातजाऊ शकतात. प्रभावित लाकुड किंवा जिवंत झाडाच्या भागांचे परिवहन सुदूर अंतरावर झाल्याने ह्यांचे वहनही होऊ शकते. गंभीर प्रादुर्भावामुळे फुल व फळ संख्या कमी भरु शकते ज्यामुळे पिकाचे नुकसान ७०%पर्यंत पोचु शकते. असे प्रादुर्भाव झाल्यास ऑलिव्हच्या बागा ५ वर्षात पूर्ण नापिक होऊ शकतात. कोवळी झाडे, खोडास वेढले जाण्यास जास्त संवेदनशील असतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रभावित फांद्या काढुन बागेपासुन दूर नेऊन खोल गाडा किंवा जाळा.
  • झाडाच्या अवशेषांसाठी आणि छाटणी केलेल्या अवशेषांचेही तसेच करा.
  • किडींच्या चिन्हांसाठी ऑलिव्ह झाडाचे निरीक्षण करत चला.
  • फांदीच्या प्रति मीटरवर जर ३ किडींचे बोगदे दिसले तर ऑलिव्हच्या उत्पन्नात घट अपेक्षित असते.
  • ऑलिव्ह झाडाच्या सालीतील भुंग्याचे पर्यायी यजमान बागेच्या जवळपास नाहीत याची खात्री करा.
  • ऑलिव्ह झाडाच्या सालीतील भुंग्याचा सामना करण्यासाठी संतुलित खत देऊन झाडाची नैसर्गिक प्रतिकार क्षमता वाढवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा