Saissetia oleae
किडा
काळे खवले मोठ्या संख्येने पान आणि फांद्यांवर उपद्रव करतात आणि मोठ्या प्रमाणात रस शोषण करतात, ज्यामुळे झाड कमकुवत होतात आणि वाढ खुंटते. रससोषण करताना ते मोठ्या प्रमाणात मधाळ रस निर्माण करतात ज्याचे थेंब जवळपासच्या पानांवर आणि फळांवर पडतो आणि काळे आच्छादन तयार होते. मधाळ रसामुळे मुंग्या लागतात आणि त्यावर फोफावणारी काजळी बुरशी झपाट्याने घर करते ज्यामुळे प्रकाश संश्र्लेषण क्रियेचा दर कमी होतो. जास्त प्रादुर्भाव झालेली पाने अकाली गळु शकतात. जुने किडे गडद राखाडी ते तपकिरी ते काळ्या गाठींसारखे पानांच्या खालच्या बाजुला आणि फांद्यांवर विशेषपणे उठुन दिसतात.
स्क्युटेलिस्टा कारुले, डायव्हरसिनेर्व्हस एलेगान्स आणि मेटाफिकस हेलव्होलस सकट काही परजीवी वॅस्पस तसेच लेडीबर्डस (चिलोकोरस बायप्युस्ट्युलाटस)च्या काही प्रजाती योग्य परिस्थिती असल्यास काळ्या खवल्यांचा नाश करु शकतात. रहिवाशी असलेल्या नैसर्गिक शत्रुंना संरक्षण देण्यासाठी ब्रॉड स्पेक्ट्रम कीटनाशकांचा वापर वारंवार करु नका. कॅनोला तेल किंवा बुरशीतुन बनलेली जैविक कीटकनाशके वापरुन देखील काळ्या खवल्यांचे नियंत्रण केले जाऊ शकते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रांगणार्यांची उपस्थिती समजुन घेण्यासाठी दोन्हीकडुन चिकट असणारे सापळे, झाडाच्या फांद्यांवर लटकवा. जर मान्य संख्येपेक्षा जास्त असतील तर अरुंद श्रेणीचे खनिज असलेली पांढरी तेले फवारा किंवा किड्यांची वाढ सीमित करणारे पायरिप्रोक्झिफेनला रांगणारे (पिल्ले) दिसताच वापरा. क्लोरपायरीफॉस आणि कार्बारिल असणारे उत्पाद फवारा.
काळ्या खवल्याच्या माद्या सुमारे ५ मि.मी. व्यासाच्या आणि गडद तपकिरी किंवा काळ्या असुन पाठीवर H- आकाराचे उंचवटे असतात. शरद ऋतुत त्या फांद्यांवर स्थलांतरीत होतात आणि नंतर पूर्ण आयुष्यभर तिथेच रहातात. लहान खवले (रांगणारे) पिवळे ते नारिंगी असुन पानांवर आणि फांद्यांवर सापडतात. ते रांगत किंवा काही वेळेस वार्याबरोबर उडुन पानांच्या खालच्या बाजुच्या शिरांवर किंवा कोवळ्या कोंबांवर स्थिरावतात. वरच्या घनटाट, छाटणी न केलेल्या झाडाच्या भागात ते फोफावतात. या विरुद्ध मोकळी, चांगली हवा खेळणारी झाडे काळ्या खवल्यांच्या लोकसंख्येला प्रोत्साहन देत नाही. विपरित परिस्थितीत वर्षातुन फक्त एक किंवा दोन पिढ्या होतात, चांगले सिंचन केलेल्या बागेत यांच्या दोन पिढ्या होतात. लिंबुवर्गीय पिके, पिस्ते, पियर, स्टोन फळांची झाडे आणि डाळिंब यांच्या पर्यायी यजमानात मोडतात.