ऑलिव्ह

ऑलिव्ह सिलिड

Euphyllura olivina

किडा

थोडक्यात

  • सिलिड कळ्यांना, फुलांना, कोवळ्या कोंबांना आणि छोट्या फळांना खाऊन त्यांच्या भागांचे नुकसान करतात.
  • त्यांनी सोडलेल्या मधाळ रसामुळे काळी काजळी बुरशी आकर्षित होते आणि प्रकाश संश्र्लेषण सीमित होते.
  • मेणचट स्त्रावामुळे फुले आणि छोटी फळे अकाली गळतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
ऑलिव्ह

ऑलिव्ह

लक्षणे

ऑलिव्ह सिलिड ऑलिव्ह झाडाला तीन प्रकारे प्रभावित करतात: पहिला प्रभाव त्यांच्या थेट कळ्या, फुले, कोवळे कोंब आणि छोटी फळे खाण्याने पडतो; दुसरा, ते ह्या भागातुन गोड रस शोषताना भरपूर प्रमाणात मधाळ रस सोडतात, परिणामी ज्यावर काळ्या काजळी बुरशीची वाढ होते आणि पानांची प्रकाश संश्र्लेषण क्रिया कमी होते. शेवटी ऑलिव्हची फुल आणि फळ धारणा होत असताना, पिल्लांनी सोडलेल्या मेणचट स्त्रावामुळे फुले आणि छोटी फळे अकाली गळतात. ह्यांची जास्त लोकसंख्या कोवळ्या रोपांची वाढ खुंटविते आणि पिकाचे चांगलेच नुकसान होते. ज्या झाडांवर भरपूर संक्रमण झालेले आहे त्यांचे उत्पन्न ३०-६०% नुकसान दर्शवु शकते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

परजीवी वॅस्प सिलेफॅगस युफिल्युरे, पायरेट बग, अँथोकोरिस नेमोरालिस, लेसविंग क्रिसोपर्ला कारने आणि लेडी बीटल कोचिनेल्ला सपटेम्प्युक्टाटा सारखे शिकारी किडे ऑलिव्ह सिलिडची लोकसंख्या कमी करतात. सामान्यपणे, विस्तृत श्रेणीची कीटनाशके वापरुन ह्या जातींचा नायनाट होणार नाही याची काळजी घ्या. सिलिड विरुद्ध अवशिष्ट मागे न सोडणारे सेंद्रिय संपर्क कीटनाशक जे काम करतात ते आहेत नीम तेल आणि बागायती तेलावर आधारीत कीटनाशक साबण. ह्यांचा वापर किड्यांनी त्यांचे सुरक्षा देणारे मेणचट स्त्राव सोडायच्या आधी केला पाहिजे. झाडीत वारा चांगला खेळता रहाण्यासाठी आणि ऑलिव्ह सिलिडना ऊन्हात आणण्यासाठी संक्रमित भाग छाटलाही जाऊ शकतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सिलिडसविरुद्ध कीटनाशकांचे फवारे वेळशीर वापरल्यास परिणाम मिळतो पण त्यांचा उपयोग दुसरा काहीच उपाय शिल्लक रहात नाही तेव्हाच करावा. ह्या उत्पादांचा उपयोग किड्यांनी मेणचट स्त्राव सोडुन आवरण घेण्यापूर्वी करावा कारण हे आवरण त्यांना काही प्रमाणात प्रतिकार प्रदान करते.

कशामुळे झाले

युफिल्युरा ऑलिव्हिना नावाच्या ऑलिव्ह सिलिडच्या खाण्याच्या क्रियेमुळे लक्षणे उद्भवतात. प्रौढ ऑलिव्हच्या खोडावरील सुरक्षित जागी विश्रांती घेतात. त्यांचे शरीर गव्हाळ रंगाचे, लांबी सुमारे २.५ मि.मी. आणि पुढच्या पंखांवर थोडेच छोटे गडद डाग असतात. माद्या सुमारे १००० पर्यंत अंडी नविन कोंबांवर आणि कळ्यांवर वसंत ऋतुत घालते. पिल्ले चपटी, हिरवी ते गव्हाळ, आणि पांढरा मेणचट पदार्थ सोडतात ज्याच्या आवरणाखाली ती सुरक्षित असतात. २०-२५ अंशाचे तापमान असल्यात त्यांचे जीवनचक्र पूर्ण होण्यास सुमारे ३ महिने पुरतात आणि अशा हवामान परिस्थितीत प्रतिवर्षी त्यांच्या ३ पर्यंत पिढ्या होऊ शकतात. ऊबदार तापमानात (२७ अंशावरील), सिलिड कमी सक्रिय असतात आणि ३२ अंशावर त्यांचा मृत्युदर वाढतो. पिल्ले आणि प्रौढांनी खाल्ल्यामुळे रोपाचे भाग फाटतात आणि रोपाची सगळ्या भागात पोषके पुरविण्याची क्षमता कमी होते. फुलधारणेच्या काळात जर ऑलिव्ह सिलिडने हल्ला केला तर ती मोठी समस्या होऊ शकते कारण त्याचा परिणाम थेट फळ धारणेवर आणि उत्पन्नावर होतो.


प्रतिबंधक उपाय

  • वसंत ऋतु्च्या सुरवातीपासुन ऑलिव्ह सिलिडची लोकसंख्या तपासण्यासाठी रोपांचे नियमित निरीक्षण करा.
  • सिलिडना पकडण्यासाठी चिकट सापळ्यांची शिफारस केली जाते.
  • विस्तृत श्रेणीचे कीटनाशक वापरुन सिलिडच्या शिकारी किड्यांचा नायनाट न होण्याची काळजी घ्या.
  • रोपांमध्ये पुरेसे अंतर ठेवा.
  • झाडीला चांगले ऊन मिळेल आणि हवाही चांगली खेळती राहील याची काळजी घ्या ज्यामुळे सिलिडसाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल.

प्लँटिक्स डाऊनलोड करा