Sparganothis pilleriana
किडा
एस. पिलेरिआनाचे सुरवंट कळ्यांमध्ये त्या वाढत असतानाच शिरतात आणि त्यांना आतुन पोकळ करतात. जर फुलोर्यानंतर हल्ला झाला तर ते पानांना, कोंबांना आणि फुलांना खूपच नुकसान करतात. काही पाने बारीक रेशमी धाग्यांनी गुंफली जातात आणि ह्या रचना अळ्या बाहेर पडुन दुसरी पाने खायीपर्यंत निवार्याचे काम करतात. गंभीर संसर्ग झाला असता, पानांच्या खालच्या बाजुला वैशिष्ट्यपूर्ण रुपेरी छटा दिसते आणि देठांवर लालसर रंगहीनता दिसते. नुकसान झालेले कोंब सुकतात आणि मरु लागतात, काही जास्त गंभीर वेळा पानगळतीही होते. द्राक्षांच्या घडांवरही हल्ला होऊ शकतो, अशा वेळी घडातील पुष्कळशी द्राक्षे रेशमी धाग्यांनी एकत्रित गुंफल्यासारखी दिसतात. जर सुरवंटांना विस्कळीत केले गेले उदा. पानांचे निवारे उघडुन तर ते उडी मारुन त्यांच्या शरीरातुन रेशमी धागा सोडुन जमिनीवर लटकत रहातात.
एस. पिलेरिआनाच्या नैसर्गिक शिकार्यांच्या लांब सूचीत येतात परजीवी वॅस्पस आणि माशा, लेडीबग्ज आणि काही पक्षी. ह्या शिकार्यांचा जीवनक्रम सर्वसामान्य कीटनाशके वापरुन बदलु नका. सेंद्रिय उपाय ज्यात स्पिनोसॅड असेल त्याची शिफारस करण्यात येत आहे. अळ्याावर ब्युव्हेरिया बॅसिआना बुरशी असलेले उपायही परिणाम करतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ज्या उत्पादात सक्रिय क्लोरपायरीफॉस, इमॅमेक्टिन, फ्ल्युफेनोक्झ्युरॉन, इनडोक्साकार्ब किंवा मेटॉक्सीफेनोसीडची फवारणी वेळेत केल्याने संख्येवर नियंत्रण करता येते.
लाँग-पॅल्प्ड टॉर्ट्रिक्स, स्पारगॅनोथिस पिलेरिआनाच्या सुरवंटामुळे ही लक्षणे दिसतात. प्रौढ पतंगांचे पुढचे पंख सुकलेल्या गवताच्या पिवळ्या रंगाचे असुन त्यावर ३ लालसर तपकिरी आरपार पट्टे असतात आणि पाठचे पंख एकसारख्या राखाडी रंगाचे असुन झालरीसारखे असतात. एका वर्षात ह्यांची एकच पिढी होते आणि वेलींवर ताव मारणार्या इतर पतंगांच्या तुलनेत ह्यांना कमी तापमान चांगले वाटते. माद्या पानांच्या वरच्या बाजुला एकेक अंडे संध्याकाळी घालतात. सुरवंट राखाडीसर, हिरवट किंवा लालसर असतात, त्यांची लांबी २०-३० मि.मी असते आणि शरीरावर केस असतात. वेलीच्या खोडाखाली, आधारासाठी लावलेल्या काठ्यांमध्ये किंवा पर्यायी यजमानांच्या पानांच्या खाली छोट्या रेशमी कोषात ते विश्रांती घेतात. वसंताच्या मध्यावर ते बाहेर येतात आणि ४०-५५ दिवस ते खाण्याचे काम चालू ठेवतात नंतर ते पानांना रेशमी तंतुनी गुंडाळुन त्यात शिरतात. २-३ अठवड्यांनी पतंग बाहेर पडतो, बहुधा उन्हाळ्याच्या मध्यावर. एस. पिलेरिआना जवळपास १०० पेक्षा जास्त यजमानांना बाधीत करु शकतो. उदा. काळी द्राक्षे, शिंगाडे, कडक बिया असणारी फळे जसे कि चेरी, क्विन्स आणि ब्लॅक एल्डर