इतर

द्राक्षाच्या माण्यांवरील पतंग

Lobesia botrana

किडा

थोडक्यात

  • कोवळ्या अळ्या फुलांना खातात आणि ग्लोमेरुल्स नावाची रेशमी धाग्याची रचना तयार करतात.
  • प्रौढ सुरवंट हे मण्यांमध्ये शिरून आतील सर्व गर खाऊन त्यांना पोकळ करतात त्यामुळे त्या मणीची साल व बियाच शिल्लक राहतात.
  • दोन मण्यांमध्ये मुबलक प्रमाणात रेशीम धागे आढळतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
द्राक्षे
ऑलिव्ह

इतर

लक्षणे

पहिल्या पिढीच्या अळ्या एकाच कळीवर वसंत ऋतुच्या शेवटी किंवा उन्हाळ्याच्या सुरवातीला ताव मारतात व नंतर प्रत्येक अळी पुष्कळशा कळ्यांना रेशमी धाग्यात गुंफते, त्या रचनेला " ग्लोमेरुल्स" असे म्हणतात, ज्याला आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. अळ्या ह्या रचनेच्या आत फुलांना खात बसतात आणि भरपूर विष्ठा टाकतात. दुसर्‍या पिढीच्या अळ्या (उन्हाळ्याच्या मध्यावर) बाहेर येऊन हिरव्या मण्यांवर ताव मारतात व आतील घटक खाऊन त्यांना पोकळ करत असल्याने फक्त साल व बियाच उरतात. तिसर्‍या पिढीच्या अळ्या (उन्हाळ्याच्या शेवटी) मण्यांना आणि घडांना आतुन खाऊन मोठे नुकसान करतात व जास्त प्रादुर्भाव झालेले मणी शेवटी सुकुन जातात. मण्यांना ते रेशमी धाग्यांनी गुंफत असल्याने त्यांची गळ होत नाही. उपद्रवाने झालेल्या जखमांमुळे पुष्कळ प्रकारच्या संधीसाधु बुरशी किंवा किडे उदा. द्राक्षाचा पतंग (कॅड्रा फिग्युलिलेला), फ़ळमाशी आणि मुंग्या यांचा प्रादुर्भाव होत असतो. नवीन फुट, फांद्या व पानांवर शक्यतो ह्या अळीने केलेले नुकसान आढळत नाही.

शिफारशी

जैविक नियंत्रण

द्राक्षावरील ह्या कीटकांच्या लोकसंख्येवर नियंत्रण करण्यासाठी बर्‍याच सेंद्रीय कीटकनाशकांची शिफारस केली जाते. ह्यात त्यात बॅसिलस थुरिंजिनेसिसवर आधारित द्रावणे, नैसर्गिक कीटक वाढीची संप्रेरके व स्पिनोसिंस समाविष्ट आहेत. टेकिनिड माशांच्या काही प्रजाती व परजीवी वॅस्पसच्या पुष्कळ जाती (१०० च्यावर) ह्यांचा परिणामकारक वापर एल बोट्रानाच्या संख्येला आळा घालु शकतो व त्यांच्या अळीचे ७०% पर्यंत नियंत्रण करू शकतो. अशा प्रजातींना बागेत सोडणे गरजेचे झालेले आहे. कामगंध पसरवल्याने किड्यांच्या संभोगाचे प्रमाण कमी होते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अनेक ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशके (ऑरगॅनोक्लोराइन्, कार्बामेटस, ऑरगॅनोफॉस्फेटस आणि पारेथ्रॉइडस) बाजारात पुष्कळ उपलब्ध आहेत ज्यांचा वापर एल. बोट्रानाच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो, पण ह्यामुळे ह्या पतंग आणि त्यांच्या अळ्यांवर उपजिविका करणारे मित्र किड्यांच्या प्रजातीं देखील मारल्या जातील. हे नियंत्रण शक्यतो जैविक व रसायनिक अशा एकत्र उपायांच्या माध्यमातून केले गेले पाहिजेत.

कशामुळे झाले

लोबेशिया बोट्रानाच्या सुरवंटांनी उपाद्रव केल्यामुळे ही लक्षणे उद्भवतात. हे आपली कोषावस्था रेशमी कोषात खोडाखाली, सुकलेल्या पानांच्या खालच्या बाजुला, जमिनीतील भेगांत किंवा वेलींच्या सर्पणात घालवतात. प्रौढांच्या पुढच्या पंखांवर राखाडी, तपकिरी आणि काळे चट्टेदार संरचना असते. पंखांची दुसरी जोडी राखाडी असुन त्यांची कडा झालरीसारखी असते. पहिल्या पिढीतील प्रौढ जेव्हा १०-१२ दिवसांच्या कालावधीसाठी तापमान १० डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक होते तेव्हा बाहेर येतात. तापमान २६-२९ डिग्री सेल्शियस आणि आद्रता ४०-७०% अशा वातावरणात ह्यांची वाढ उत्कृष्ट होते. अळ्या फुलांना छिद्रे पाडुन कळ्यांच्या आत व घडांच्या देठामध्ये शिरत असल्याने संपूर्ण घड वाळून जातो. मोठे सुरवंट मण्यांना रेशमी धाग्यांनी गुंफतात व नंतर त्यांना कुरतडतात किंवा आत शिरतात. उन्हाळ्याच्या कालावधीनुसार ह्या पतंगांच्या २-४ पिढ्या एका वर्षात होतात.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या देशातील क्वारंटाईन नियम जाणुन घ्या.
  • निरोगी रोपे किंवा कलम वापरण्याची खात्री करा.
  • जर आपल्या भागात उपलब्ध असेल तर संवेदनक्षम जात निवडा.
  • वसंत ऋतुच्या शेवटापासुन द्राक्षाच्या वेलींचे दर अठवड्याला निरीक्षण करा.
  • उपस्थित असलेल्या पतंगांची संख्या निर्धारित करण्यासाठी कामगंध सापळे वापरा.
  • बागेमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे अशा प्रकारे कॅनोपी व्यवस्थापन केले गेले पाहिजे.
  • पुरेसे पाणी द्या.
  • खोडाच्या खालच्या बाजुला भर दिल्याने दव विरुद्ध संरक्षण मिळविता येईल.
  • बाग तण मुक्त ठेवा.
  • छाटणीची वेळ काळजीपूर्वक ठरवा जेणेकरुन कीड्यांची जास्त लोकसंख्या टाळता येईल.
  • ज्या कीटनाशकांच्या वापरामुळे मित्रकिड्यांच्या जातीही मारल्या जातील, त्यांचा वापर टाळा.
  • बाधीत रोपांची सामग्री बागांमधुन नेण्याचे टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा