Eupoecilia ambiguella
किडा
कोवळ्या अळ्या कळ्यांना छिद्रे पाडुन आतुन खातात, ज्यामुळे द्राक्षे बाजारात विकण्याजोगी रहात नाहीत. ह्या काळात खाते वेळी, ते पुष्कळशा कळ्यांना रेशमी धाग्यांनी एकत्र गुंफतात व अखेरीस एका जाळ्यासारखा निवारा तयार करुन तिथे वाढतात. दुसर्या पिढीचे सुरवंट जास्त नुकसान करतात कारण ते त्यांच्या निवार्याच्या आजुबाजुस वाढत असणार्या मण्यांवर ताव मारतात आणि भरपूर विष्ठा टाकतात. एक अळी जवळपास एक डझनभर मणी खाऊ शकते त्यामुळे भरपूर नुकसान होत. दुसर्या पिढीच्या उपद्रवाचे नुकसान खूपच जास्त होते कारण त्यांनी केलेल्या जखमांमध्ये बोट्रीटीस सिनेरे नावाच्या राखाडी बुरशीची दुय्यम लागणही होते. उपद्रव ना झालेले शेजारचे मणी सुद्धा प्रभावित होऊन तपकिरी रंगात बदलून बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकते. हा पतंग युरोप आणि आशियामधील वाइन तयार करणार्या भागात गंभीर लागणीचा म्हणुन मानला जातो. युरोप आणि आशियातील अनेक मद्य-उत्पादक क्षेत्रांमध्ये हा पतंग एक अतिशय गंभीर कीटक मानला जातो.
ट्रायकोग्रामा कॅकोशिया आणि ट्रायकोग्रामा इव्हानेस्केन्स नावाचे परजीवी वॅस्प्स ह्या कीटकांच्या अंड्यात अंडी घालतात आणि त्यामुळे बागातील द्राक्षांच्या कळ्यांवरील पतंगांची लागण खूपच कमी करतात. ह्या मित्राकिड्यांची संख्या सर्वसामान्य कीटनाशकाच्या जास्त वापराने कमी होणार नाही ह्याची काळजी घ्या. स्पिनोसॅड आणि नैसर्गिक पायरेथ्रिनवर आधारीत उत्पाद ह्या किड्यांच्या उत्तम नियंत्रणासाठी परिणामकारक आहेत. फवारणीची संख्या प्रादुर्भावग्रस्त मण्यांच्या संख्येवर अवलंबून आहे.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सिंथेटिक पायरेथ्रिन आणि कार्बारिल हे दोन परिणामकारक किटकनाशक उपलब्ध आहेत. जिथे उपद्रवाची पुनरावृत्ती होण्याची समस्या आहे, एक फुलोर्यानंतर पहिली कीटकनाशक फवारणी आवश्यक असू शकते, आणि उशीरा उन्हाळ्यात दुसरी फवारणी दुसऱ्या पीढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असू शकते. फवारणीची संख्या प्रादुर्भावग्रस्त मण्यांच्या संख्येवर अवलंबून आहे. तापमान आणि आद्रता हे सुरवंटच्या दुसर्या पिढीच्या उदयास येण्यासाठी निर्णायक घटक आहेत.
युपोसिलिया अॅम्बिग्युएला नावाच्या द्राक्षांच्या कळ्यांवरील सुरवंट्यांच्या खाद्य क्रियाकलापांमुळे आणि बोट्रीटिस सेनेरे नावाच्या बुरशीने घर केल्यामुळे ही लक्षणे दिसतात. प्रौढ पतंगांचे पुढचे पंख पिवळे तपकिरी असतात त्यावर विशिष्ट गडद तपकिरी पट्टे असतात आणि पाठचे पंख झालरवाले असतात. माद्या (सुमारे १०० अंडी प्रति मादी) एकट्याच कळ्यांवर किंवा फुलाला लागुन देठावर, वसंतात उशीरा किंवा उन्हाळ्याच्या मध्यावर मण्यांवर अंडी घालतात. अळ्या ८-१२ दिवसात बाहेर येतात. त्या तपकिरीसर पिवळ्या, १२ मि.मी.लांबीच्या व केसाळ असतात. दुसर्या पिढीच्या कोषात जे खोडाच्या चिरांमध्ये किंवा सोयीस्कर जागी आपली सुप्तावस्था घालवतात. पतंगाचे जीवनचक्र तापामानावर आणि आद्रतेवर अवलंबुन असते. हे सहसा थंड आणि दमट भागात आढळतात, आणि दरवर्षी फक्त दोन पिढ्या तयार होतात. ह्यांच्या उत्कृष्ट वाढीसाठी आद्रता पातळी ७०% किंवा जास्त आणि तपमान 18 ते 25 ° C दरम्यान असणे गरजेचे असते. ह्यापेक्षा कमी आद्रता पातळी आणि तापमान असल्यास अंडी बरोबर उबत नाहीत.