तूर

पाने विणणारा किडा

Eucosma critica

किडा

थोडक्यात

  • पर्णकोष एकमेकात विणले जातात.
  • फुले आणि फळे प्रभावित होतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

तूर

लक्षणे

पर्णकोष एकत्र विणले जातात. शेंडे बहुधा त्या जाळ्यात असतात ज्यामुळे त्यांची वाढ होत नाही. पाने पांढरी पडुन वाळतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

आजतागायत, या किडींविरुद्ध कोणत्याही जैविक नियंत्रण माहितीत नाहीत. जर आपणांस याच्या लक्षणांची गंभीरता कमी करणारी कोणतीही यशस्वी पद्धत माहिती असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विस्तृत श्रेणीच्या कीटकनाशकांचा वापर टाळायला हवा कारण यामुळे मित्र किडी मरु शकतात. हेलिकॉर्व्हेपा सुरवंट, शेंगा पोखरणारा ठिपकेदार किडा किंवा प्ल्यूम पतंगास नियंत्रित करणारी रसायने पाने विणणार्‍या किड्यांचेही नियंत्रण करतात.

कशामुळे झाले

युकोस्मा क्रिटिका (ज्यास पूर्वी ग्राफोलोथा क्रिटिका म्हणत) च्या अळ्यांमुळे नुकसान होते. माद्या पतंग रंगाने तपकिरी असतात, त्यांची अंडी पानांच्या फुटव्यांवर आणि कोवळ्या पानांवर घालतात. फिकट पिवळ्या अळ्या मग पानांना एकत्र विणतात आणि त्या जाळ्यात राहून शेंड्याना खातात. याच विणलेल्या पानांच्या जाळ्यात कोषावस्थाही जाते. पूर्ण हंगामात झाडे प्रभावित होतात. जर रोपावस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पिकावरही गंभीर प्रभाव पडतो. उपद्रवास २३ ते ३० अंश तापमान अनुकूल असते. हा त्यामानाने तसा छोटा उपद्रव आहे आणि यामुळे जास्त आर्थिक नुकसान होत नाही.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक किंवा सहनशील वाण लावा.
  • झेंडू किंवा एरंडीसारख्या पिकांचे आंतरपीक घ्या.
  • विणलेली पाने शोधण्यासाठी शेताचे निरीक्षण करत चला.
  • प्रभावित झाडांचे अवशेष गोळा करुन नष्ट करा.
  • किडींच्या लोकसंख्येला आळा घालणार्‍या नैसर्गिक भक्षकांचे आणि परजीवींचे संगोपन करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा