इतर

कापसावरील खवले कीड

Icerya purchasi

किडा

थोडक्यात

  • प्रौढ आणि पिल्ले कळप करून झाडाचे रस शोषण करतात व मोठ्या प्रमाणात मधाळ स्त्राव सोडतात.
  • पान वाळतात आणि फांदी मर देखील पाहिली गेली आहे.
  • भरपूर मधाळ स्त्रावामुळे काळ्या काजळीच्या बुरशीला प्रोत्साहन मिळतो.
  • झाडाचा जोम कमी होतो आणि दाण्याच्या गुणवत्तेत आणि उत्पादनात घट येते.

मध्ये देखील मिळू शकते

5 पिके
लिंबूवर्गीय
पेरु
आंबा
गुलाब
अधिक

इतर

लक्षणे

प्रौढ आणि पिल्ले कळप करून झाडाचे रस शोषण करतात व मोठ्या प्रमाणात मधाळ स्त्राव सोडतात. संवेदनशील झाडाच्या फांद्या, पान, फुल आणि कोंबांनाही ते आच्छादित करताना पाहिले जातात. रस शोषला गेल्यामुळे पाने वाळतात आणि फांदी मर होते. रसशोषण करताना मोठ्या प्रमाणात मधाळ रस निर्माण करतात जो पानांना आच्छादित करतो आणि काळ्या काजळी बुरशीच्या वाढीला प्रोत्साहन देतो तसेच प्रकाश संश्र्लेषणाचा दर कमी होतो, त्यामुळे झाडाचा जोम कमी होतो आणि फळांची गुणवत्ता आणि उत्पादनात मोठी घट होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

लेडीबर्डस आणि लेसविंग्ज हे सर्वात विशेष उल्लेखनीय भक्षक आहेत. वेडालिया बीटल, रोडोलिया कार्डिनालिस ज्यांच्या अळ्या खवल्यांची अंडी खातात आणि प्रौढ खवल्यांच्या सर्व टप्प्यांवर त्यांना खातात हे खास नैसर्गिक शत्रु आहेत. परिजीवी माशा, क्रिप्टोचेटम इसेर्येसुद्धा खवल्यांवरील फार परिणामकारक परजीवी आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. खवले आणि सरपटणारी पिल्ले जाड मेणाच्या आच्छादनात असल्याने त्यांच्यावर रसायनिक उपचार करणे कठिण असते. एसिटामाइप्रिड आणि मॅलेथिऑनच्या सक्रिय घटक असणार्‍या उत्पादांचा वेळेवर वापराची या कीटक विरोधात शिफारस केली जाते. अंडी ऊबल्यानंतर लगेच पेट्रोलियम तेलाची फवारणी केल्यास सरपटणार्‍या पिल्लांना पळवुन लावता येते ज्यामुळे त्यांना झाडाचे भाग खाण्यापासुन प्रतिबंध होतो.

कशामुळे झाले

इसेऱ्या परचासी नावाच्या कापशी खवले किडने झाडांचे रससोषक केल्यामुळे ही लक्षणे उद्भवतात. काही भौगोलिक भागात इतर जातींचे उदा. प्लॅनोकोकस सिट्री वर्चस्व असु शकते. खवले सुमारे १०-१५ मि.मी. लांबीचे असतात आणि हवामान अनुकूल असल्यास ते आपले जीवनचक्र सुमारे २ महिन्यात पूर्ण करु शकतात. माद्या ओटीपोटावरील कापसासारख्या अंड्याच्या पिशवीत जवळपास १०००पर्यंत अंडी घालु शकतात आणि मग ती पानांवर ठेवली जातात. नविन ऊबुन बाहेर आलेली पिल्ले (सरपटणारी) पहिल्यांदा बहुधा शिरांच्या बाजुने पानांना आणि लहान फांद्यांवर उपद्रव करतात. जसजशा त्या मोठ्या होत जातात, त्यांना फांद्या आणि खोडावर देखील पाहिले जाऊ शकते पण क्वचितच त्या शेंगांवर दिसतात. त्यांना आर्द्र, थंड हवामान भावते आणि लिंबुवर्गीय झाडांच्या दाट झाडीत त्या चांगल्याच फोफावतात. जशा त्या वाढतात, त्या जाडसर कापसासारखे मेणाचे आच्छादन तयार करतात जे त्यांचे संरक्षण करते. मुंग्या त्यांनी सोडलेला मधाळ स्त्राव खातात आणि खवल्यांची तसेच पिल्लांची काळजी घेतात आणि नैसर्गिक शत्रुंची वर्दळ कमी करतात. मोरा, अॅकाशिया आणि रोजमारिनसच्या प्रजाती नोंद घेण्यासारखे पर्यायी यजमान आहेत पण ते बऱ्याच प्रकारच्या फळांना आणि जंगलातील झाडांना तसेच शोभेच्या झुडपांना नुकसान करु शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • खवल्यांच्या उपस्थितीसाठी बागेचे नियमित निरीक्षण करा.
  • प्रत्येक झाडातुन बर्‍याच हिरव्या लहान फांद्या निवडुन प्रौढांच्या खवल्यांबरोबर अंड्यांच्या पुंजक्यांसाठी निरीक्षण करा.
  • नैसर्गिक शत्रुंची जपणुक करण्यासाठी कीटनाशकांचा वापर सिमीत ठेवा.
  • झाडीत चांगली हवा खेळण्यासाठी झाडे छाटा.
  • झाडाचे मुनवे आणि जमिनीतील पीकाचे मृत अवशेष काढुन टाका.
  • अडथळे आणि सापळे वापरुन कापशी खवले किड्यांची काळजी घेणार्‍या मुंग्यांचे नियंत्रण करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा