लिंबूवर्गीय

लिंबुवर्गीय पिकांवरील तुडतुडे

Metcalfa pruinosa

किडा

थोडक्यात

  • पांढरा लोकरीसारखा आणि मेणचट पदार्थ पानांच्या खालच्या बाजुला, फांद्या आणि फळांवर दिसतो.
  • प्रौढांना बहुधा हावर्‍यासारखे खाताना पाहिले जाऊ शकते आणि त्यांनी खाताना जास्तीची साखर मधाळ स्त्रावातुन सोडल्यामुळे काजळी बुरशीला प्रोत्साहन मिळतो.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

तुडतुड्याची उपस्थिती पांढर्‍या लोकरीसारखा आणि मेणचट पदार्थ पानाखाली, फांद्या आणि फळांवर असण्याने समजुन येते. या पदार्थांना पिल्ले तयार करतात, काही वेळा याची गल्लत कापशी खवले किड किंवा मिलिबग्जच्या संक्रमणाशी (जे खूपच हानीकारक आहेत) केली जाऊ शकते. जर शंका असेल तर त्यांच्या विरुद्ध जर झाड हलविले तर तुडतुडे उड्या मारताना दिसतात. प्रौढ आणि पिल्ले यांना सुईसारखी सोंड असते जी ते झाडाच्या भागात खुपसुन रससोषण करतात. प्रौढ आधाशासारखे खातात आणि जास्तीची साखर मधाळ रसातुन सोडतात ज्याने काजळी बुरशीला प्रोत्साहन मिळतो. जर या किड्यांची संख्या जास्त असली तर संधीसाधु बुरशीमुळे थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या नविन कोंबांची वाढ खुंटते आणि झाडाचा जोम जातो. इतर संवेदनशील यजमान झाडात, लक्षणे नाटकीय असु शकतात, जसे कि पाने पिवळी पडून करपणे, कोवळे कोंब वाळणे आणि बियाणे विकृत आकाराची आणि आक्रसलेली असणे होय.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ड्रायिनिड कुटुंबातील परजीवी वॅस्पस सिलोड्रिनस टिफ्लोसायबे, त्यांची अंडी मेटकाफा प्रुइनोसाच्या पिल्लांवर घालतात आणि त्यामुळे लोकसंख्या कमी होण्यात मदत होते. पिल्लाच्या टप्प्यांवरच जर साबणाचे द्रावण वापरले तर पिल्ले पानांवरुन घसरुन जमिनीवर पडतात आणि यामुळे पानांवरील काजळी बुरशी घर करणारा मधाळ स्त्राव देखील धुतला जातो. तथापी कीटनाशकांच्या उपचारांच्या अभावात किडे परत येतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. प्रौढांचे रासायनिक नियंत्रण त्यांच्या गतिशीलतेमुळे अवघड आहे. किड्यांची दाट लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी पिल्लांचे नियंत्रण वेळेत कीटनाशके वापरुन करणे उत्तम मार्ग आहे. काजळी बुरशीचे नियंत्रण करणे खूप कामाचे ठरते कारण यामुळेच सर्वात जास्त नुकसान होते. जिथे परवानगी आहे तिथे, पान किंवा फळांवर डेल्टामेथ्रिन, पायरेथ्रॉइड किंवा डायमिथोएट असणार्‍या द्रावणांची फवारणी शेताच्या कडेने केल्यास या किड्यांचे नियंत्रण चांगले होते.

कशामुळे झाले

मेटकाफा प्रुइनोसा तुडतुड्याच्या प्रौढ आणि पिल्लांमुळे लक्षणे उद्भवतात, ज्याचे यजमान भरपूर प्रकारचे आहेत आणि लिंबुवर्गीय पिके त्यातीलच एक आहेत. हा किडा फारच जुळवुन घेणारा आहे, म्हणुन तो विविध प्रकारच्या हवामानात जगु शकतो. तो उडुन छोट्या अंतरापर्यंत जाऊ शकतो आणि प्रकाशाकडे चांगलाच आकर्षित होतो. शेतीच्या वाईट सवयी आणि मानवी हस्तक्षेपामुळे त्यांच्या लांब अंतरावर पसरण्यात हातभार लागतो. प्रौढ तपकिरी ते राखाडी रंगाचे असतात आणि त्यांचे डोळे वैशिष्ट्यपूर्ण ठळक, चकचकीत नारिंगी रंगाचे असतात आणि पुढचे पंख त्रिकोणाकार असुन त्यांवर पांढरट ठिपके विखुरलेले असतात. त्यांना पहिल्या दृष्टीक्षेपात पतंग समजले जाऊ शकते. प्रौढ आणि पिल्लांवर भरपूर प्रमाणात निळसर पांढरे मेणचट आवरण असते जे घनदाट पांढर्‍या केसांच्या पुंजक्यांसारखे पिल्लांमध्ये दिसु शकते. माद्या सुमारे १०० अंडी शरद ऋतुत बहुधा झाडाच्या फांदीच्या सालीला आधीच झालेल्या जखमात किंवा मऊ खोडात छिद्र पाडुन त्यात घालतात. वसंत ऋतुत जेव्हा हवामान अनुकूल असते तेव्हा अंडी ऊबुन पिल्ले झाडाच्या भागांना उपद्रव करू लागतात. ते सहसा फारच कमी नुकसान करतात परंतु उदाहरणार्थ पूर्वी गोठलेल्या झाडांना त्रास होऊ शकतो.


प्रतिबंधक उपाय

  • काही देशात ही प्रजाती क्वारंटाईन नियमात येऊ शकते.
  • प्रकाश सापळे वापरुन प्रौढांना आकर्षित करुन त्यांच्या संख्येचा अंदाज घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा