Autographa nigrisigna
किडा
उंटअळी पाने आणि शेंगा खाते. कोवळ्या अळ्या पाने कुरतडतात व मोठ्या अळ्या कोंब, फुल आणि शेंगांवर उपद्रव करून शेंगांचा बुडाचा भाग देठासकट तसेच सोडतात. शेंगा खात असताना, अळी शेंगांच्या टरफलांना खडबडीत करून अनियमित नुकसान करते. पाने छिद्रित दिसतात आणि गंभीर प्रादुर्भावात पानांचा सांगाडा केला जाऊ शकतो. गंभीर प्रदुर्भावात झाडांची संपूर्ण पानगळ होऊ शकते. शक्यतो लक्षणे पक्ष्यांच्या नुकसानीसह गोंधळे जाऊ शकतात.
कीटकनाशकांचा वापर टाळून कोळी, लेस विंग्स, मुंग्या आणि इतर नैसर्गिक शत्रूसारख्या शिकारी प्रजातींना प्रोत्साहन द्या. अठवड्याच्या अंतराने हेक्टरी दीड लाख ट्रायकोग्रामा चिलॉनिस चार आठवड्यांसाठी सोडा. एनपीव्ही (न्यूक्लियो पॉलि हेड्रो व्हायरस), बॅसिलस थुरिंजिन्सिस किंवा ब्यूव्हेरिया बॅसियानावर आधारित जैविक कीटकनाशके देखील उंटअळीला नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. निंबोळी अर्क आणि लसूण किंवा मिरचीचे अर्क सारखे सेंद्रीय कीटकनाशकांची झाडांवर फवारणी करून या उपद्रवाचे नियंत्रण केले जाऊ शकते. फुलधारणेच्या सुरुवातीपासून दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने टीपोल ०.१% आणि गुळा ०.५% सह एनपीव्ही २५० एलई प्रती हेक्टर वापरा. निमतेल किंवा पनगम तेल ८० ईसी २ मिली प्रती लिटर याप्रमणे वापरा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर २ पेक्षा जास्त अळ्या दर १० झाडात आढळ्यास आपण नियंत्रणाचे उपाय सुरु करावेत. क्लोरोपायरीफॉस आणि क्विनाल्फॉसला उंटअळीची संख्या कमी करण्यासाठी सूचित केले आहे.
नुकसान ऑटोग्राफा निग्रिसिग्नाच्या अळीमुळे होते. उंटअळीच्या पतंगाचे पुढचे पंख नक्षीदार असतात. अंडी गोलाकार असतात आणि पानांवर ४० च्या समूहाने अंडी घातली जातात. उंटअळीच्या अळ्या हिरव्या रंगाच्या असतात. एक पिढीला ४ अठवडे लागतात. अंडी अवस्था सुमारे ३ ते ६ दिवसांची, अळी अवस्था ८ ते ३० दिवसांची आणि कोषावस्था ५ ते १० दिवसांची असते.