हरभरा

हरभर्‍यावरील घाटे पोखारणारी अळी

Helicoverpa armigera

किडा

थोडक्यात

  • अळ्या मुख्यतः फुल आणि शेंगा खातात.
  • शेंगांवर काळी छिद्र दिसतात आणि अळ्या त्या छिद्रातून बाहेर लोंबकळताना दिसतात.
  • पाने आणि खोडांवर खाण्याने नुकसान झाल्यास पानगळ होऊ शकते.

मध्ये देखील मिळू शकते


हरभरा

लक्षणे

अळ्या झाडाचे सर्व भाग खातात पण त्यांना फुले आणि शेंगा जास्त आवडतात. शेंगांवर काळी छिद्र दिसतात. काहीवेळा अळ्या शेंगा खात असताना शेंगातुन लोंबकळताना दिसतात. जर फुले किंवा शेंगा उपलब्ध नसतील तर अळ्या पाने आणि कोंबही खातात. जास्त उपद्रवाने पानगळ होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

हा दृष्टीकोन कोणते पीक घेत आहात त्यावर जास्तकरुन अबलंबुन आहे. मित्रकिडी जे हेलिकोवेर्पावर हल्ला करतात किंवा त्यांवर परजीवी म्हणुन जगतात त्यांची संख्या आपल्या शेताच्या आजुबाजुला वाढवा. ट्रायकोग्रामा वॅस्पस, मायक्रोप्लिटिस, हेटेरोपेल्मा, नेटेलिया, भक्षक किडी जसे बिग आइड बग, ग्लॉसी शिल्ड बग आणि स्पाइन्ड प्रिडेटरी शिल्ड बग त्यांची वाढ थांबवितात. मुंग्या आणि कोळी अळ्यांवर हल्ला करतात. एनपीव्ही (न्युक्लिओपॉलीहेड्रोवायरस), मेटारहिझियम अॅनिसोप्लिया, ब्युव्हेरिया बसियाना आणि बॅसिलस थुरिंजिएनसिस वर आधारीत जैव कीटनाशकसुद्धा वापरले जाऊ शकतात. वनस्पती अर्क जसे कि लिंबोळी अर्क, मिरची किंवा लसणीचा अर्क यासारख्या वनस्पतींवर आधारीत उत्पादांची फवारणी केल्याने देखील ह्या किड्यांवर नियंत्रण ठेवता येईल.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कीटकांच्या संख्येवर बारीक लक्ष ठेवा म्हणजे गरज भासल्यास रसायनिक दृष्टीकोनही विचारात घेता येईल. या कीटकांनी पायरेथ्रॉइड गटातील कीटनाशकाविरुद्ध काही प्रमाणात प्रतिकार निर्माण केला आहे.

कशामुळे झाले

प्रौढ १.५ से.मी. लांबीचे असतात आणि त्यांचे पंख ४ सें.मी.चे असतात. त्यांचे शरीर राखाडी, तपकिरीसर असते तर छाती केसाळ असते आणि पुढचे पंख हलक्या तपकिरी रंगाचे असुन त्यावर कडेला गडद तपकिरी रंगाचे पट्टे काळसर ठिपक्यांसह असतात. पाठचे पंख पांढरे असुन त्याला पिवळसर पांढरी किनार असते आणि कडेला काळा रुंद पट्टा असून त्यावर फिकट धब्बा असतो. माद्या पिवळसर पांढरी अंडी फुले असलेल्या झाडांवर किंवा ज्या झाडांना फुले येणार आहेत त्यावर घालतात. अळ्यांचे पैलु त्यांच्या विकासाच्या टप्प्यांवर अवलंबुन असतात पण त्या सर्वांचे पोट फिकट रंगाचे असते. त्या जशा वाढतात, त्यांच्या छातीवर काळे ठिपके आणि दोन चमकदार पांढरे किंवा पिवळे पट्टे येतात. विविध जीवन टप्प्यांचा कालावधी हा हवामानाच्या परिस्थितीशी जोडलेला आहे, जास्त करुन तापमान आणि अन्न उपलब्धता.


प्रतिबंधक उपाय

  • सहनशील वाणाची निवड करा.
  • लागवडीत रोपातील अंतर किमान ठेवा.
  • शेताचे वारंवार निरीक्षण करुन अळ्यांची उपस्थिती तपासा.
  • चांगली खतयोजना करुन आपली रोपे चांगली मोठी आणि जोमदार राखा. फायदेशीर किड्यांची संख्या जास्त राखण्याचा प्रयत्न करा.
  • जास्त पाणी देणे टाळा कारण ते घाटे अळीसाठी अनुकूल असते.
  • काढणी झाल्या नंतर शेत नांगरून अळ्यांना उघडे पाडा जेणेकरून भक्षक किडी त्यांना खातील.
  • किड्यांची वाढ थांबविण्यासाठी यजमान नसणारी पिके आंतरपीक म्हणून लावा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा